Beauty Tips | डोक्याला खाज येतेय, त्रस्त आहात?, ‘या’ आयुर्वेदिक टिप्स ट्राय करु शकता

काही खास आयुर्वेदिक टिप्स वापरल्या तर त्यांना या समस्येपासून मुक्तता मिळवता येऊ शकते. (home remedy hair beauty)

Beauty Tips | डोक्याला खाज येतेय, त्रस्त आहात?, 'या' आयुर्वेदिक टिप्स ट्राय करु शकता
हेअर मास्क
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 6:44 PM

मुंबई : प्रत्येकाला निरोगी, आणि दाट केस आवडतात. मात्र, या जगात बहुतांश लोकांना केसांशी संबंधित एकतरी आजार असतो. डँड्रफ, केसगळती या समस्या तर अनेकांना असतात. याबरोबरच डोक्याला खाज येण्याच्या समस्येने कित्येक जण त्रस्त असतात. त्यांनी काही खास आयुर्वेदिक टिप्स वापरल्या तर त्यांना या समस्येपासून मुक्तता मिळवता येऊ शकते. (home remedy for itchy scalp and hair beauty tips)

डोक्याला खाज सुटण्याचे कारण काय?

  • डोक्याला खाज सुटणे ही तशी सामान्य समस्या आहे. या समस्येपासून कित्येक जण त्रस्त असताना आपण पाहतो. केसांमध्ये कोरडेपणा, मानसिक तणाव, केसांसाठी हानिकारक असलेल्या प्रोडक्ट्सचा वापर, केसांची तसेच केसांखाली असलेल्या त्वचेची स्वच्छता न राखणे या कारणांमुळे केसांना तसेच केसांखाली असलेल्या त्वचेला खाज येते.
  • खाली दिलेले काही नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपाय ट्राय करुन तुम्ही डोक्यांला येत असेलल्या खाजेपासून स्वत:ची सुटका करु शकता.
  • केसांत ड्रायनेस झाल्यामुळे केसांखालच्या त्वचेला खाज सुटते. त्यामुळे केसांना तसेच केसांखालील त्वचेवर नियमित तेल लावणे महत्त्वाचे आहे.
  • केसांची नियमित काळजी घेताना केसांची मालिशही करावी. केसांची मसाज केल्यानंतर हलक्या हेअर कंडिशनरने केस धुवावेत. पॅराबेन (paraben) आणि सल्फेट नसलेले हेअर कंडिशनर केसांच्या स्वास्थ्यासाठी चांगले मानले जातात. हे घटक नसलेले हेअर कंडिशनर वापरावेत. एका आठवड्यात दोन ते तीन वेळा केस धुवावेत.

ट्राय करा हे आयुर्वेदिक उपचार

  • डोक्यावर नारळाचे तेल, लिंबाचा रस यांचे मिश्रण लावा. केसांची चांगल्या प्रकारे मालीश करा. त्यांनतर केस शॅम्पूने स्वच्छ धुवा
  • चहाचे दोन चमचे दही, एक चमचा लिंबाचा रस यांचे मिश्रण करा. डोक्यावर 20 मिनिटांसाठी लावा. त्यानंतर केस चांगल्या प्रकारे धुवून घ्या.
  • 5 ते 6 हिबिस्कसचे फूलं आणि पानं यांची पेस्ट तयार करा. त्यामध्ये 2 ते 3 चहाचे चमचे दही, थोडासा लिंबाचा रस त्या मिश्रणात टाका. हे मिश्रण डोक्यावर लावा. 15 ते 20 मिनिटांनंतर डोकं आणि केस स्वच्छ धुवून घ्या.
  • केसांखालच्या त्वचेवर कोमट ऑलिव्ह तेल लावल्याने केसांखालची स्कीन नरम पडते. यासाठी ऑलिव्ह तेल हातावर घेऊन हलक्या हातांनी डोक्यावरील त्वचेची मालीश करा. मालीश केल्यानंतर ऑलिव्ह तेल डोक्यावर काही तासांसाठी तसेच ठेवा. नंतर हर्बल शॅम्पूने केस धुवून घ्या.

या उपायंसोबत तुमच्या रोजच्या जगण्यात थोडा बदल केलात, तरी डोक्यावरील खाज कमी होऊ शकते. योग, ध्यान, व्यायाम करुन तणावाचे नियोजन केल्यानंतर फरक जाणवू शकतो. यासोबतच पौष्टिक आणि जीवनसत्वांनी युक्त असणाऱ्या अन्नाचे सेवन करावे. आहारात व्हिटॅमिन ए, सी, ई, अमिनो अॅसिड, बादाम, मेथी, हळद असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यानेसुद्धा या समस्येपासून मुक्तता मिळू शकते.

संबंधित बातम्या :

Health | केस विरळ होण्याची समस्या, काळजी घेण्याऐवजी तुम्हीही ‘या’ चुका करताय?

आजारांपासून दूर राहा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे 7 घरगुती उपाय

कोरोना काळात ‘हे’ पाच घटक वाढवतील रोगप्रतिकारक शक्ती!

(home remedy for itchy scalp and hair beauty tips)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.