सौदी अरेबियन महिलांचे गाल गुलाबी का असतात?; पाकिस्तानी डॉक्टरांनी सांगितलं गुपित
आपलेही गाल गुलाबी असावेत असं मुलींना वाटतं. त्यासाठी महागडे स्किनकेअर प्रोडक्ट्स वापरले जातात. किंवा होम रेमेडीजचा वापर करून सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न केला जातो.
प्रत्येक मुलीला आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं. आपली त्वचा सुंदर आणि मुलायम असावी असे वाटते. आपलेही गाल गुलाबी असावेत असं मुलींना वाटतं. त्यासाठी महागडे स्किनकेअर प्रोडक्ट्स वापरले जातात. किंवा होम रेमेडीजचा वापर करून सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न केला जातो. हळद, चंदन, बेसन आणि दही आदींच्या माध्यमातून चेहऱ्यांला ग्लो आणण्याचा प्रयत्न केला जातो. सौदी अरेबियन महिलांच्या गुलाबी गालांसारखे आपलेही गाल असावेत असं प्रत्येकीला वाटत असतं. पाकिस्तानच्या डॉक्टर शिरीन फातिमा यांनी अरेबियन महिलांच्या सौंदर्याचं गुपित सांगितलं आहे.
डॉक्चर फातिमाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी अरेबियन महिलांसारखी गुलाबी, उजळ आणि सॉफ्ट त्वचा कशी बनवायची याचं रहस्य सांगितलं आहे. फातिमा यांनी घरातील गोष्टींचाच वापर करून त्वचा कशी मुलायम होईल याची माहिती दिली आहे.
चेहरा गुलाबी दिसावा असं प्रत्येक तरुणीला वाटतं. त्यासाठी मुली होम रेमेडीजही ट्राय करतात. पण त्यांच्या चेहऱ्यावरून गुलाबीपणा निघून जातो. पाहिजे तसा चेहरा गुलाबी होत नाही. अशावेळी तुम्ही पाकिस्तानी डॉक्टर फातिमा यांनी सांगितलेला नुस्खा वापरू शकता. त्यासाठी काही गोष्टींची गरज आहे. हिबिस्कसचे फूल, तुमच्या पसंतीचे माइल्ड फेस सोप, एक चमचा तांदळाचं पीठ, एक चमच बीट रुट पावडर घ्या, एक चमचा मिल्क पावडर घ्या आणइ एक चमचा कॉर्नफ्लोर घ्या.
सोपी पद्धत
ही होम रेमेडीज बनवण्यासाठी एक ग्लास पाणी घ्या. त्यात हिबिस्कसचे फूल भिजू घाला. जवळपास एक ते दोन तास हे फूल भिजू द्या. आता एका कटोरीत आपल्या आवडत्या साबणाला किसून घ्या. त्यासाठी माइल्ड साबणच वापरा. चेहऱ्यावर लावता येईल असा हा साबण हवा. त्यानंतर साबणाच्या बाउलमध्ये तांदळाचे पीठ, बीट रुट पावडर, दूध पावडर आणि कॉर्नफ्लोर चांगले मिसळा. आता त्या पाण्यात हिबिस्कसचे फुलं भिजवले होते, त्या पाण्याचा वापर करून यामध्ये मिसळा. आता या सर्व गोष्टींना चांगले मिसळून एक पेस्ट तयार करा. पेस्ट तयार झाल्यावर ती आइस क्यूब ट्रेमध्ये ओता आणि सेट होण्यासाठी ठेवा. आता तुम्ही दररोज दोन आठवडे या मिश्रणाचा वापर करू शकता.
फायदा काय?
तयार झालेली आइस क्यूब्स तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये फेस वॉशसारखी वापरू शकता. रोज सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर एक आइस क्यूब चांगल्या पद्धतीने काही वेळासाठी मसाज करून लावा. त्यानंतर थोड्यावेळाने चेहरा धुवून टाका. काही दिवसानंतर तुमच्या चेहऱ्यावर ग्लोइंग येईल. गुलाबी रंग येईल. ही क्यूब्स लावल्यानंतर तुम्हाला आर्टिफिशियल ब्लश लावण्याची गरज पडणार नाही.