घरच्या घरी तुमच्या केसांना काळे भोर ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या ट्रिक्स

केसांच्या निरोगी वाढीसाठी त्यांच्यावर अनेक प्रयोग केले जातात. केसांच्या योग्य वाढीसाठी तुमच्या दैनंदिन आहारामध्ये फयबर, प्रोटिन, मॅग्निशियम अशा घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे. त्यासोबतच केसांची योग्य काळजी घेणे देखील महत्त्वाचे असते. मार्केटमधील कृत्रिम शैम्पू आणि रसायनिक ब्युटी प्रोडक्ट्समुळे तुमच्या केसांवरील नैसर्गिक चमक निघून जाते. केसांची योग्या पद्धतीनं काळजी कशी घ्यावी चला जाणून घेऊया.

घरच्या घरी तुमच्या केसांना काळे भोर ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या ट्रिक्स
hair longImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 01, 2025 | 7:14 PM

निरोगी आणि काळे भोर केस कोणालला नको असतात! लांब, चमकदार आणि रेशमी केस सर्वांनाच आवडतात. परंतु आजकालच्या वातावरणामुळे आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे तुमच्या केसांचे आरोग्य निरोगी राहात नाही. आजकल अनेकजण भरपूर प्रमाणात जंक फूडचे सेवन करतात. जंक फूडमध्ये शरीराला पोषक घटक नसतात ज्यामुळे शरीराला काही फायदा होत नाही. शरीराला पुरेसं पोषण मिळत नाही. केसांकडे दुर्लक्ष केल्यामुळे तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात. केसांना योग्य पोषण नाही मिळाल्यामुळ केस गळती, केसांममध्ये कोंडा अशा अनेक समस्या उद्भवतात. केसांची निगा राखण्यासाठी विशेष काळजी घय्वी लागते.

केसांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. निरोगी केसांसाठी तुमच्या आहाराकडे विशेष देणे गरजेचे आहे. केसांच्या निरोगी वाढीसाठी तुमच्या दैनंदिन आहारामध्ये फायबर, मिनरल्स, पोटॅशियम आणि चांगले फॅट्स अशा गटकांचा समावेश करा. यामुळे तुमच्या केस गळतीची आणि कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया केसांच्या निरोगी वाढीसाठी केसांची काळजी कशी घ्यावी.

केसांना चमकदार आणि मुलायम ठेवण्यासाठी केसांना आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांना तेल लावा. केसांना तेल लावल्यामुळे केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच तेल लावल्यामुळे केसांमध्ये गुंता होत नाही आणि केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत होते. त्यानंतर आठवड्यातून २ वेळा केस धुतल्यामुळे तुमच्या केसांमधील चिकटपणा, धुळ आणि कोंडा निघुन जातो. त्यामुळे केसांना निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा केस धुणे महत्त्वाचे आहे.

केस धुतल्यानंतर त्यांना कंडीश्नर करणे देखील महत्त्वाचे असते. केसांना कंडिश्नर लावल्यामुळे केसांमध्ये गुंता होत नाही आणि केसगळतीची समस्या निघून जाते. त्याानंतर केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर न करता टॉवेलचा वापर करावा. हेअर ड्रायरच्या वापरामुळे केस डॅमेग होतात आणि त्यांच्यावरील नैसर्गिक चमक निघून जाते. तुमच्या केसांवर नेहमी जाड दातांचा कंगवा वापरा यामुळे कसे कमी प्रमाणात तुटतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे केसांना कोणत्याही प्रकारचे कृत्रिम प्रक्रिया केलेले तेल किंवा कंडिश्नर वापरू नये.

निरोगी केसांसाठी या गोष्टींची काळजी घ्या :

केस धुताना गरम पाण्याचा वापर करू नये. गरम पाण्याचा वापर केल्यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल निघुन जाते.

केसांवर रसायनिक शैम्पूचा वापर करू नये. त्यामुळे केसगळती, केसांमध्ये कोंडा यांच्या सारख्या समस्या होतात.

जास्त ताण आणि टेंशन घेतल्यामुळे तुम्हाला केसगळतीच्या समस्या होऊ शकतात.

कधीच चुकूनही केस धुताना मिठाच्या पाण्याचा वापर करू नये यामुळे अनेक समस्या होतात.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.