Saffron Benefits | सुंदर दिसायचेय, तर मग ‘ब्युटी रूटीन’मध्ये केशर वापरा आणि चमत्कार पहा

त्वचासंबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी केशर उपयुक्त आहे. तसेच त्वचेला चमकदार बनविण्यातही मदत करते. (If you want to look beautiful, then use saffron in your beauty routine and see the miracles)

Saffron Benefits | सुंदर दिसायचेय, तर मग 'ब्युटी रूटीन'मध्ये केशर वापरा आणि चमत्कार पहा
सुंदर दिसायचेय, तर मग 'ब्युटी रूटीन'मध्ये केशर वापरा आणि चमत्कार पहा
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 7:55 AM

मुंबई : केशर हा जगातील सर्वात मौल्यवान मसाल्यांपैकी एक आहे. बर्‍याच प्रकारचे डिशमध्ये याचा वापर केला जातो. आपले सौंदर्य उत्तम ठेवण्यासाठी केशरचे बरेच फायदे आहेत. त्वचासंबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी केशर उपयुक्त आहे. तसेच त्वचेला चमकदार बनविण्यातही मदत करते. (If you want to look beautiful, then use saffron in your beauty routine and see the miracles)

मुरुम काढून टाकण्यासाठी

केशरमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. हे मुरुम काढून टाकण्यास मदत करतात. केशरमध्ये विविध औषधी गुणधर्म आहेत, जे मुरुम असलेली त्वचा साफ करण्यास मदत करतात. यासाठी आपल्याला 5 ताजी तुळशीची पाने आणि 10 केशर धागे आवश्यक आहेत. त्यांना स्वच्छ पाण्यात भिजवा, त्याची पेस्ट बनवून घ्या आणि त्यानंतर ते चेहऱ्यावर लावा आणि काही मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. तुम्हाला नक्की केशरचा चमत्कार लक्षात येईल.

रंगद्रव्य काढून टाकण्यासाठी

रंगद्रव्य काढून टाकण्यासाठी तुम्ही केशरचा वापर करू शकता. यासाठी केशरचे काही धागे स्वच्छ पाण्यात भिजवावेत. त्यात 2 चमचे हळद घालून पेस्ट बनवा. रंगद्रव्य आणि गडद डाग कमी करण्यासाठी ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा. तुम्हाला काही वेळातच त्याचा सकारात्मक परिणाम होत असल्याचे पाहायला मिळेल.

चट्टे कमी करण्यासाठी

केशरमध्ये उपचार करण्याचे गुणधर्म आहेत, जे त्वचा बरे करण्याच्या प्रक्रियेस वेगवान बनवू शकतात. जखमेच्या किंवा जखम झालेल्या त्वचेवर केशर लावल्यास जखम लवकर बरी होते. केशर जुन्या जखमांचे व्रण कमी करण्यासदेखील मदत करते. पाण्यात भिजवलेले 2 चमचे केशरची पेस्ट बनवा. त्यात खोबरेल तेलाचे काही थेंब घाला आणि हे मिश्रण त्वचेवरील डागांवर लावा. नियमित वापराने चट्टे बरे होतात.

चमकदार त्वचेसाठी

प्रदूषण तसेच वातावरणातील बदलांमुळे त्वचा निर्जीव आणि निस्तेज होते. केशराचा नियमित वापर केल्याने त्वचा चमकत राहते. यासाठी केशर अर्धा कप कच्च्या दुधात भिजवा आणि हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा. ते वापरल्याने तुमच्या चेहऱ्याला नैसर्गिक चमक येईल.

सनटॅन हटवण्यासाठी

सनटॅन हटवण्यासाठी तुम्ही केशर वापरू शकता. दुधात भिजलेले केशर धागे लावून टॅनिंग काढून टाकेल आणि तुमची त्वचा चमकदार बनेल.

त्वचा टोनर

केशर आपल्या त्वचेचे पोषण तसेच त्वचा तजेलदार बनवण्याचे चांगल्या प्रकारे कार्य करते. यासाठी तुम्ही गुलाबाच्या पाण्यात केशर घाला आणि ते मिश्रण त्वचेवर लावा. (If you want to look beautiful, then use saffron in your beauty routine and see the miracles)

इतर बातम्या

सांगलीसह 5 गावाची डोकेदुखी वाढली, महापूर नाही, तर ‘या’ कारणाने धोका वाढला

Ambil Odha : बिल्डरवर कारवाई करा, अन्यथा पोलीस आयुक्तांविरोधात मानवी हक्क आयोगाकडे जाणार, प्रकाश आंबेडकरांचा इशारा

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.