Apple Peel | सफरचंदाच्या सालीने नाहीशा होतील त्वचेच्या अनेक समस्या, नक्की वापरून पाहा!

केवळ सफरचंद खाणेच फायदेशीर नाही, तर त्याचे साल देखील अनेक प्रकारे उपयुक्त आहे. जर सफरचंदच्या सालाचा योग्य प्रकारे वापर केला, तर ते त्वचेच्या समस्या देखील दूर करू शकते. (Benefits of Apple Peel)

Apple Peel | सफरचंदाच्या सालीने नाहीशा होतील त्वचेच्या अनेक समस्या, नक्की वापरून पाहा!
आपल्या सर्वांना माहित आहे की सफरचंद खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सफरचंद आरोग्याबरोबरच आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. सफरचंदामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि लोह हे घटक मुबलक प्रमाणत आढळतात.
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 1:12 PM

मुंबई : दररोज सफरचंद खाण्याने आपला बर्‍याच आजारांपासून बचाव होतो, असे म्हटले जाते. परंतु आपणास हे माहित आहे का की, केवळ सफरचंद खाणेच फायदेशीर नाही, तर त्याचे साल देखील अनेक प्रकारे उपयुक्त आहे. बरेचदा असे दिसून येते की, लोक सफरचंद सोलतात आणि खातात. तसेच, सोललेली साल डस्टबिनमध्ये टाकून देतात. परंतु, हे जाणून आपल्याला आश्चर्य वाटेल की, या फळाची साल त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यात लाभदायी आहे (Skin Care Benefits of Apple Peel).

नेहमी आपण आपल्या त्वचेसाठी अनेक उत्पादने वापरता, ज्यांचे बरेच दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. परंतु, जर सफरचंदच्या सालाचा योग्य प्रकारे वापर केला, तर ते त्वचेच्या समस्या देखील दूर करू शकते.

‘व्हिटामिन सी’चा उत्तम स्त्रोत

सफरचंदच्या सालामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामिन सी आढळते. व्हिटामिन सी त्वचेतील अकाली वृद्धत्वाची लक्षणे प्रतिबंधित करते, तसेच आपल्या त्वचेची चमक वाढवते. सफरचंदच्या सालाचा वापर करून, अनेक प्रकारचे फेस पॅक बनवता येतात. चला तर, आपण सफरचंदची साले कशी वापरू शकता हे जाणून घेऊया, ज्यामुळे आपल्या त्वचेला मोठ्या प्रमाणात फायदा होईल (Skin Care Benefits of Apple Peel).

अशा प्रकारे वापरा ‘सफरचंदाची साल’

– सूर्यप्रकाशामध्ये सफरचंदांची साले व्यवस्थित वळवून घ्यावीत. वाळलेल्या सोलून बारीक करून घ्या. तिची पावडर तयार झाल्यावर ती एका भांड्यात काढा आणि त्यात कच्चे दूध घाला. आता हे दोन घटक चांगले मिसळा आणि त्याची पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट आपल्या मानेवर आणि चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. सुमारे 20-25 मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. आपण हा पॅक आठवड्यातून दोन दिवस वापरू शकता.

– सफरचंद फळाची साल सोलून घ्या. हे साल व टोमॅटोचे बारीक तुकडे घ्या आणि मिक्सरच्या सहाय्याने त्याची पेस्ट बनवून घ्या. आता ही पेस्ट चेहर्‍यावर आणि मानेवर व्यवस्थित लावा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे ठेवा. जेव्हा हा मास्क कोरडा होईल, तेव्हा चेहरा पाण्याने धुवा.

– सफरचंदाची साले सूर्यप्रकाशात वाळून घ्या आणि त्याची पूड बनवून एका भांड्यात ठेवा. आता या पावडरमध्ये दूध घाला व चांगली मिसळा आणि पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि 20 मिनिटांनी पाण्याने धुवा. यात ओट्स बारीक करून घालून आपण त्याने चेहरा स्क्रब देखील करू शकता.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Skin Care Benefits of Apple Peel)

हेही वाचा :

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.