हळदीमध्ये मिसळा स्वयंपाकघरातील ‘हे’ पदार्थ; चेहऱ्यावर समस्यांपासून मिळेल सुटका
हळदीचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील हळदीचा वापर करू शकता.
भारतीय स्वयंपाकघरांमध्ये हळदीचा वापर केला जात आहे. हळदीचा वापर केवळ पदार्थाची चव आणि रंग वाढवण्याससाठी नाही तर त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे वाप केला जातो. हळदीचा वापर तुमची त्वचा उजळवण्यासाठी, तत्वचेवरील जळजळ कमी करण्यासाठी आणि चेहऱ्यावरील टॅनिंग कमी करण्यासाठी केला जातो. हळदीचे नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यासोबतच हळद तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते आणि तुमचे वजन कमी होते.
तुम्हाला जर नैसर्गिकरित्या वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात जास्त प्रमाणात हळदीचे सेवन करण्यास सुरुवात करा. हळदीचे दररोज सकाळी नियमित पाणी प्यायल्यामुळे तुमचं वजन कमी होईल त्यासोबतच तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो. हळदीमध्ये अँटि-इन्फ्लेमेट्री, अँटिबॅक्टिरीयल आणि अँटिऑक्सिडेंट्स यांच्यासारखे गुणधर्म असतात ज्यामुळे तुमच्या त्वचेवर त्याचे फायदे दिसून येतात.
हळदीचा योग्य वापर कसा करावा?
दही आणि हळद
दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आढळतं ज्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिक एक्सफोलिएट होते. दहीमुळे तुमच्या त्वचेवरील डेड सेल्स निघून जातात आणि तुमचा चेहरा फ्रेश दिसू लागतो. दही आणि हळदीची पेस्ट चोहऱ्यावर लावल्यामुळे तुमची त्वचा अणखी चमकदार होण्यास मदत होते.
बेसन आणि हळद
बेसनामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि पोषक घटक असतात ज्यांच्यामुळे तुमच्या त्वचेला पोषण मिळण्यास मदत होते. हळद आणि बेसनाची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने त्वचा घट्ट होते त्यासोबतच पिंपल्स आणि डाग कमी होण्यास ममददत होते.
हळद आणि मध
मधामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वं असतात ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील बॅक्टिरिया वाढत नाही. हळद आणि मधाची पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचा मॉइश्चरायझ होते आणि मऊ देखील होते.
हळद आणि कच्चे दूध
कच्च दुध चेहऱ्यावर लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येण्यास मदत होते. त्यासोबतच दुधामध्ये आणि हळदी मिसळल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होण्यास मदत होते.
हळद आणि कोरफड
कोरफडमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचेवरील जळजळ कमी होण्यास मदत होते. हळद आणि कोरफडीची पेस्ट लावल्यामुळेे त्वचेला पोषण मिळते आणि ती अधिक चमकदार बनते.
लिंबाचा रस आणि हळद
लिंबाचा रस नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करतो. लिंंबाचा रस चेहऱ्यावर लावल्यामुळे डाग कमी होण्यास मदत होते. हळद आणि लिंबाचा रस त्वचेला टोन आणि चमकदार बनवतो.
हळदीचा त्वचेवर वापर करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा :
- हळदीचा रंग त्वचेवर परिणाम करू शकतो, म्हणून ते लावण्यापूर्वी, लहान भागावर पॅच करा.
- जर तुम्हाला हळदीची ऍलर्जी असेल तर या पॅकचा वापर करू नये.
- हळदीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यानंतर नेहमी सनस्क्रीन लावा.
- हळदीच्या फेसपॅक चा वापर आठवड्यातून 2-3 वेळा करा.