डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी स्वंयपाकघरातील ‘ही’ वस्तू फायदेशीर, आठवडाभरात दिसेल फरक

डोळ्यांखालील काळी वर्तुळे चेहऱ्यावरील तेज कमी करतात. अशावेळी यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करून पाहू शकता.

डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी स्वंयपाकघरातील 'ही' वस्तू फायदेशीर, आठवडाभरात दिसेल फरक
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 11:13 AM

आपली रोजची दैनंदिन दिनचर्या एवढी धावपळीची असते की आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही. यातच रोजचे धकाधकीचे जीवन, ताणतणाव आणि कमी झोप यामुळे डार्क सर्कलची समस्या आता सामान्य बनली आहे. ही समस्या केवळ वृद्ध लोकांमध्येच नाही तर तरुण वर्गातही झपाट्याने वाढत आहे. त्यातच असे काही नैसर्गिक उपाय आहेत जे ही काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करतात.

तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी बाजारातील महागड्या वस्तूंचा वापर न करता घरगुती उपयोग करू शकता. यासाठी तुम्ही कॉफीचा वापर करू शकता. विशेष म्हणजे तुम्हाला कोणत्याही महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सची गरज नाही, तर तुम्हाला फक्त कॉफी आणि इतर काही गोष्टी मिसळून स्वत:चा नॅचरल फेसपॅक तयार करावा लागणार आहे.

कॉफी डार्क सर्कल्स कमी करण्यास उपयुक्त

कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, कॅफिन आणि टॅनिन सारखे घटक असतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि जळजळ कमी होते, ज्यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात. त्याचबरोबर कॉफीमध्ये असलेले कॅफिन त्वचेची छिद्रे संकुचित करते, ज्यामुळे डोळ्यांच्या सभोवतालची त्वचा घट्ट आणि चमकदार दिसते.

कॉफी फेस पॅक कसा बनवावा?

💠साहित्य

  • 1 चमचा कॉफी पावडर
  • 1 टीस्पून मध
  • 1 टीस्पून नारळ तेल किंवा दूध

💠बनवण्याची पद्धत

१. सर्वप्रथम एका बाऊलमध्ये एक चमचा कॉफी पावडर घाला.

२. आता त्यात एक चमचा मध घाला, ज्यामुळे त्वचा हायड्रेट होते आणि ती मऊ होते.

3. त्यानंतर खोबरेल तेल किंवा दुध यातील कोणतेही एक घटक घाला.

४. या सर्व गोष्टी नीट मिक्स करून जाड पेस्ट तयार करा.

💠कसे वापराल?

हा पॅक हलक्या हातांनी डोळ्यांखालील आणि आजूबाजूच्या त्वचेवर लावा. हे 15-20 मिनिटे ठेवा, जेणेकरून ते त्वचेत चांगले शोषून घेऊ शकेल. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. असे काही दिवस केल्याने तुमच्या डोळ्याखालील वर्तुळे कमी होतील आणि त्वचा देखील मुलायम होईल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल.
विधानसभेतील यशानंतर भाजपच मिशन BMC, मुंबई महापालिका निवडणुकीवर परिणाम?
विधानसभेतील यशानंतर भाजपच मिशन BMC, मुंबई महापालिका निवडणुकीवर परिणाम?.
अजमेर शरीफ दर्ग्यात शिव मंदीर? कोणी दाखल केली याचिका? काय केला दावा?
अजमेर शरीफ दर्ग्यात शिव मंदीर? कोणी दाखल केली याचिका? काय केला दावा?.
'कॉमन मॅन' शिंदे पुढे कोणत्या भूमिकेत? DCM की पक्षाची धुरा सांभाळणार?
'कॉमन मॅन' शिंदे पुढे कोणत्या भूमिकेत? DCM की पक्षाची धुरा सांभाळणार?.
मुख्यमंत्री भाजपचाच होणार, फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी दावा सोडला
मुख्यमंत्री भाजपचाच होणार, फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी दावा सोडला.
ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?
ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?.
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.