थंडीत लोकरीचे कपडे घातल्यानंतर ॲलर्जी होते? मग फॉलो करा ‘या’ टीप्स

हिवाळा ऋतू सुरु होताच आपण उबदार आणि लोकरीच्या कपड्यांकडे वळतो. थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहण्यासाठी लोकरीचे स्वेटर घालण्यास सुरुवात करतो. परंतु अनेकांना लोकरीच्या कपड्यांची ॲलर्जी होत असते. त्यामुळे शरीरात बारीक पुरळ होण्याच्या समस्या निर्माण होतात.

थंडीत लोकरीचे कपडे घातल्यानंतर ॲलर्जी होते? मग फॉलो करा 'या' टीप्स
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 7:45 AM

हिवाळा ऋतू सुरु होताच आपण उबदार आणि लोकरीच्या कपड्यांकडे वळतो. थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहण्यासाठी लोकरीचे स्वेटर घालण्यास सुरुवात करतो. परंतु अनेकांना लोकरीच्या कपड्यांची ॲलर्जी होत असते. त्यामुळे शरीरात बारीक पुरळ होण्याच्या समस्या निर्माण होतात. तसेच कपड्याच्या ॲलर्जीने अनेकांना सर्दी होते. लोकरीच्या कपड्यांची खास गोष्ट म्हणजे ते परिधान केल्याने शरीरात हवा जाऊ देत नाही आणि थंडीपासून बचाव होतो. पण ते परिधान करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. या लेखात आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगतो, ज्यानंतर तुम्ही लोकरीचे कपडे घातले तर ॲलर्जीचा त्रास होणार नाही.

कॉटन इनर घाला

जेव्हा तुम्ही लोकरीचे कपडे घालत असाल तेव्हा प्रथम पूर्ण स्लीव्ह कॉटन इनर घाला. यानंतर लोकरीचे कपडे घालावेत. यामुळे लोकरीचे कपडे त्वचेच्या थेट संपर्कात येणार नाहीत आणि पुरळ उठण्याची समस्याही उद्भवणार नाही.

मॉइश्चरायझर लावा

लोकरीचे कपडे घालताना जास्त त्रास होत असेल तर त्वचेतील कोरडेपणा हेदेखील एक कारण असू शकते. अशावेळी लोकरीचे कपडे घालण्यापूर्वी शरीरावर मॉइश्चरायझरचा वापर करावा. यामुळे पुरळ किंवा लालसरपणा देखील येणार नाही.

ऑलिव्ह ऑयल

थंडीमध्ये तुमच्या त्वचेवर खूप ॲलर्जीचा त्रास होत असेल तर ऑलिव्ह ऑईल लावा. याशिवाय रात्री झोपताना व्हिटॅमिन ई युक्त नाइट क्रीम शरीर आणि चेहऱ्यावर मॉइश्चरायझ करा.

फॅब्रिक्सची काळजी घ्या

लोकरीच्या कपड्यांमध्येही अनेक फॅब्रिक्स येतात. अशावेळी तुमच्या त्वचेनुसार लोकरीचे कपडे घाला. शुद्ध लोकर केसाळ असते. जास्त धागे सुटलेले लोकरीचे कपडे शक्यतो टाळा. त्वचेवर धागे घासने त्रास होऊ शकतो. अशावेळी त्वचेवर ताण पडतो व त्या ठिकाणी पुरळ येऊ लागतात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.