महिलांनो चेहऱ्यावरील केस काढण्याची योग्य पद्धत कोणती? कशी घ्याल खबरदारी?
प्रत्येक महिला चेहऱ्यावर नको असलेले केस काढण्यासाठी अनेकदा पार्लरमध्ये वळतात. मात्र अजूनही काही महिलांमध्ये याविषयी अनेक गैरसमज आहेत.
प्रत्येक महिलेला आपला चेहरा चमकदार दिसण्यासाठी चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून टाकतात. चेहऱ्यावर नको असलेले केस हाताळण्यासाठी महिला अनेकदा पार्लरकडे वळतात. मात्र अजूनही काही महिलांमध्ये याविषयी अनेक गैरसमज आहेत, जसे की यामुळे केस दाट येणे, चेहऱ्यावर काळेपणा येतो. यातच आपण नेमकी जाणून घेणार आहोत की महिलांसाठी चेहऱ्यावरील केस काढणे पूर्णपणे सुरक्षित आहे का आणि जर तुम्ही पूर्ण चेहरा रेझर करण्याचा विचार करत असाल तर काय लक्षात ठेवले पाहिजे? चला जाणून घेऊया.
फेस रेझर करण्याचे फायदे
- फेशियल रेझर केल्याने त्वचा मुलायम आणि गुळगुळीत होते.
- रेझर केल्यामुळे चेहऱ्यावर मेकअप चांगला दिसतो आणि जास्त काळ टिकतो.
- फेशिअल रेझर केल्याने वाढलेल्या केसांची समस्या दूर होते.
- फेस रेझर केल्याने त्वचेची काळजी घेणारी उत्पादने त्वचेवर चांगल्या प्रकारे शोषली जातात.
- फेशियल रेझरमुळे वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगचा त्रास टाळता येतो, कारण फेशिअल रेझर पूर्णपणे वेदना-मुक्त आहे. तसेच, यामुळे पुरळ आणि जळजळ होण्याचा धोका नसतो.
- फेशियल रेझरचे नुकसान
- तुम्ही जर तुमचा फेस नीट रेझर न केल्यास त्वचेची जळजळ होऊन त्वचेला लालसरपणा येऊ शकतो.
- जर तुम्ही केसांच्या विरुद्ध दिशेला रेझर केल्यास तर पुन्हा वाढलेल्या केसांची समस्या उद्भवू शकते.
‘ही’ खबरदारी घ्या
- फेशियल रेझरसाठी खास रेझर बाजारात सहज उपलब्ध आहेत. त्यासाठी महिलांनी फेस रेझरसाठी योग्य प्रतीचे रेझर वापरा. तसेच आपला चेहऱ्यावरील रेझर फार जुना वापरत नाही ना हे देखील लक्षात ठेवा.
- फेस रेझर करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा आणि चेहऱ्यावर क्रीम किंवा जेल वापरा. यामुळे त्वचा कट होण्याचा धोका कमी होतो आणि त्वचा गुळगुळीत राहते.
- हलक्या हातांनी चेहऱ्यावर रेझर वापरणे गरजेचे आहेत.
- त्वचेवर रेझर वापरल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझ करणं खूप गरजेचं आहे.
- तसेच आठवड्यातून एकदा तुमची त्वचा एक्सफोलिएट करा, जेणेकरून त्वचेच्या मृत पेशी काढून टाकल्या जातील आणि वाढलेल्या केसांची समस्या उद्भवणार नाही.
- तुमची त्वचा संवेदनशील असेल तर त्वचावर रेझर वापरण्यापूर्वी चेहऱ्यावरील काही केस काढून बघा. त्रास होत असल्यास चेहऱ्यावर रेझर वापरू नका.
चेहऱ्यावर रेझर वापरणे सुरक्षित आहे का?
चेहऱ्यावर नको असलेल्या केस काढण्यासाठी रेझर वापरणे पूर्णपणे सुरक्षित आहे. जर ते योग्य प्रकारे केले जात असेल, परंतु आपल्याला त्वचेची काही समस्या असेल तर रेझर वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. विशेषत: जर तुम्हाला मुरुमांची समस्या असेल. मुरुम असताना रेझर केल्याने संसर्ग होऊ शकतो आणि मुरुम देखील वाढू शकतात.
या गोष्टी लक्षात ठेवा
- रेझर केल्यानंतर लगेच मेकअप करू नका किंवा त्वचेची काळजी घेणारे कोणतेही प्रॉडक्ट वापरू नका.
- चेहऱ्यावर रेझर केल्यानंतर सनस्क्रीन वापरायला विसरू नका.
- प्रत्येक वापरापूर्वी आणि नंतर रेझर कोणत्याही अल्कोहोल स्वॅबने चांगले स्वच्छ करा.