उकडलेले हिरवे मूग खाण्याचे फायदे जाणून तुम्ही व्हाल थक्क, कसे सेवन करावे?

आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये स्वत:ला निरोगी ठेवायचे असेल आणि प्रथिने आणि जीवनसत्त्वांचा चांगला स्त्रोत शोधत असाल तर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात उकडलेले हिरवे मूग समावेश करू शकता. याचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत.

उकडलेले हिरवे मूग खाण्याचे फायदे जाणून तुम्ही व्हाल थक्क, कसे सेवन करावे?
हिरवे मूग खाण्याचे फायदे
Follow us
| Updated on: Jan 13, 2025 | 7:15 AM

रोजच्या धावपळीत अनेकदा योग्य आहार घेतला जात नाहीत. त्यामुळे अनेकांना प्रथिने आणि जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे आजार उद्भवू शकतात व अश्याने या कमतरता भरून काढण्यासाठी अनेक औषधे घ्यावी लागतात. मात्र जर तुम्ही तुमच्या आहारात कडधान्यांचा समावेश केला तर तुमच्या शरीरात योग्य प्रमाणात प्रथिने आणि जीवनसत्त्वे राहतील. तसे तर यात , प्रथिने आणि जीवनसत्त्वांव्यतिरिक्त असे अनेक पोषक घटक आहेत जे तुमच्या शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्वाचे आहेत. अशावेळी कडधान्यांचे योग्य सेवन केल्यास तुम्हाला आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतील.

सर्व कडधान्य व त्यापासून तयार होणाऱ्या डाळींमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक घटक असले तरी यातील हिरव्या मुगाचे सेवन सर्वात फायदेशीर आहे. कारण हिरव्या मुगामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॉपर सारखे पोषक घटक असतात. तसेच यात कॅलरी कमी असून प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचा उच्च स्रोत आहे. यामुळे तुम्ही जर तुमच्या आहारात हिरवे मूग उकडवून खाल्ल्यास त्याचे फायदे अधिकच वाढतात.

जाणून घ्या उकडलेली हिरवे मूग खाण्याचे फायदे

तुम्ही जर तुमच्या आहारात हिरवे मूग उकडून त्याचे सेवन केल्यास शरीराला चांगल्या प्रमाणात प्रथिने मिळतात, ज्यामुळे स्नायूंची ताकद वाढण्यास मदत होते. एवढेच नाही तर उकडलेले मूग तुमच्या स्नायूंना निरोगी ठेवण्यास मदत करते. याशिवाय ज्या लोकांचे वजन कमी आहे आणि बारिकसुद्धा त्यांच्यासाठीही उकडलेला मूग खाणे फायदेशीर ठरते.

हिरवी मूग हे ब्रेन बूस्टर आहे. अशावेळी हिरव्या मुगाचे सेवन केल्यास तुमची विचार करण्याची क्षमता देखील सुधारते. तसेच हे तुमचे न्यूरो आरोग्य सुधारते आणि तुम्हाला बऱ्याच समस्यांपासून वाचवते. याशिवाय मुगामध्ये असलेले प्रोटीन तुमचे हार्मोनल हेल्थ सुधारते.

उकडलेला हिरवे मूग पोटासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. यात फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे पचनक्रिया वेगवान होण्यास मदत होते. तसेच याच्या सेवनाने तुमचे चयापचय दर वाढते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या टाळया जातात. याशिवाय ज्यांची पचनक्रिया कमकुवत आहे आणि ज्यांना गॅस आणि अपचनाची समस्या आहे त्यांच्यासाठीही उकडलेले हिरवे मूग खाणे चांगले आहे.

उकडलेली हिरवी मूग डाळ कशी खावी?

उकडलेली हिरवी मूग चवदार बनवण्यासाठी सर्वप्रथम हिरवे मूग रात्रभर पाण्यात भिजत घालावे. यानंतर सकाळी त्यामधील पाणी काढून स्वच्छ धुऊन घ्यावे, व नंतर कुकरमध्ये २ शिट्ट्या घ्या. यानंतर कुकर थंड झाल्यावर उकडलेली मूग काढून आता त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, काळे मीठ, सेंधा मीठ आणि जिरे पूड घालून चांगले मिक्स करावे. आता ते खायला तयार झाले आहे. तुम्हाला आवडत असल्यास त्यात लिंबू देखील पिळू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले.
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.