Lemon Tea | कडाक्याच्या थंडीत हंगामी आजारांपासून बचाव करेल ‘लेमन टी’, वाचा याचे फायदे…
दुधाच्या चहाऐवजी नियमितपणे लिंबूयुक्त चहा घेतल्यास आरोग्याशी निगडीत बऱ्याच अडचणींपासून मुक्त होऊ शकता.
मुंबई : ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, त्यांच्यात बऱ्याचदा आरोग्याशीसंबंधित बऱ्याच समस्यांचा त्रास सहन करावा लागतो. विशेषत: हिवाळ्याच्या काळात सर्दी, खोकला अशा समस्या उद्भवल्यास त्या लवकर बरे होण्याचे नाव घेत नाहीत. परंतु, जर आपण आपल्याला खाण्याच्या सवयीमध्ये काही सुधारणा केली तर, आपण निश्चितच आपली प्रतिकारशक्ती सुधारू शकता. यात ‘लेमन टी’चे नियमित सेवन फायदेशीर ठरू शकते. जर आपण दुधाच्या चहाऐवजी नियमितपणे लिंबूयुक्त चहा घेतल्यास आरोग्याशी निगडीत बऱ्याच अडचणींपासून मुक्त होऊ शकता. चला तर या आरोग्यवर्धक ‘लेमन टी’चे फायदे जाणून घेऊया…( Benefits of Lemon tea during winter season)
हंगामी रोगांपासून आराम मिळेल.
जर रोगप्रतिकारक शक्ती चांगली नसेल, तर हवामान बदलल्यामुळे लोकांना त्रास होऊ लागतो. अशा लोकांना हिवाळ्यात ताप, सर्दी, खोकला येणे, घसा खवखवणे, छातीत श्लेष्मा, कफ यासारखे त्रास उद्भवू लागतात. यावर आले आणि लिंबू घातलेला चहा गुणकारी ठरतो. आले-लिंबूयुक्त चहा या समस्यांपासून आपले संरक्षण करतो आणि आपली रोगप्रतिकार शक्ती सुधारतो.
पोटाचा त्रास
काही लोकांना अॅसिडिटी, गॅस, अपचन यासारख्या समस्या नेहमीच उद्भवत असतात. दुधाचा चहा या समस्या आणखी वाढवतो. परंतु, आपल्या नेहमीच्या चहाऐवजी आपण लेमन टी घेतल्यास, यामुळे पोटाच्या अनेक समस्या दूर होतील आणि तुमची पचन क्रिया सुधारेल.
विषारी घटकांचे उत्सर्जन
लिंबाचा चहा प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. या चहात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत. तसेच हा चहा एक नैसर्गिक अँटी-सेप्टिक देखील आहे. म्हणुनच हा चहा लोकांना सर्व रोग आणि संक्रमणांपासून दूर ठेवतो (Benefits of Lemon tea during winter season).
त्वचेसाठीही उपयुक्त
लिंबूयुक्त चहा शरीरातील व्हिटामिन सीची कमतरता पूर्ण करतो. यामुळे त्वचेच्या सर्व समस्यांपासून संरक्षण होते, तसेच त्वचा चमकदार बनते.
वजन नियंत्रण
वजन कमी करण्यासाठी लेमन टीचे सेवन करणे फायदेशीर ठरते. व्यायामासोबत योग्य आहार ठेवला तर वजन नियंत्रणात राहते. त्यामुळे सकाळी उठल्यावर व्यायाम करण्याआधी लेमन टी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच भूकेचेही प्रमाण नियंत्रित राहते.
सुस्ती उडते
लेमन टीमुळे पोट साफ राहते. त्यासोबतच जीवनशैलीतील ताणतणावामुळे आपल्या शरीरात टॉक्सिन्स वाढतात. त्यामुळे दिवसातून किमान एकदा तरी लेमन टी प्यायल्याने ताणतणावामुळे होणारी डोकेदुखी, थकवा, सुस्ती नाहीशी होते.
(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)
(Benefits of Lemon tea during winter season)
हेही वाचा :
Lemon Benefits | लिंबाचा सुगंध मूड करेल फ्रेश, शरीरालाही होतील प्रचंड फायदे, संशोधकांचा दावा!https://t.co/gCPTFuYHZw#LEMONADE #lemon #Lemonfragrance
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 15, 2020