ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टीत जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही ठिकाणं असतील बेस्ट
लोकांना ख्रिसमस आणि नवीन वर्ष आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत साजरे करायचे आहे. या काळात लोक सुट्ट्या घेऊन आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत फिरण्याचा बेत आखतात. जर तुम्हीही ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्टीत जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करू शकता.
आता काही दिवसांवर ख्रिसमस सेलिब्रेट केले जाणार असून नवीन वर्षाचे देखील आगमन होणार आहे . त्यात या दिवसांमध्ये मुलांना सुट्ट्या असल्याने अनेकजण हे दिवस साजरे करण्यासाठी आपल्या कुटुंबासह किंवा मित्रांसह फिरायला जाण्याचा बेत आखतात. तर काही लोकांना हिरवळ किंवा समुद्रकिनाऱ्याच्या ठिकाणी जाणे आवडते, तर काही लोकांना बर्फाच्छादित पर्वतांवर जाऊन बर्फात ऍक्टिव्हिटी करायला आवडतात. हिमाचल, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर सारख्या ठिकाणी बर्फाच्छादित टेकड्या, सुंदर स्कीइंग रिसॉर्ट्स आणि शांत वातावरणाचा आनंद घेता येतो. त्यातच तुम्हाला निवांत क्षण समुद्रकिनारी घालवता आले तर.
जर तुम्हालाही ख्रिसमस किंवा नवीन वर्ष सेलिब्रेशनच्या निमित्ताने आपल्या कुटुंबासोबत 4 ते 5 दिवस कुठेतरी जायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला काही सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.
कूर्ग
तुम्ही जर साऊथ इंडियामध्ये फिरायला जायचं असेल तर कुर्ग हे शहर एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही. येथे अॅबी धबधबा, कुमार पर्वत हिल्स, ताडियादामोल शिखर, चेलावरा धबधबा, ब्रह्मगिरी हिल्स, निशानी मोटे ट्रेक, बारापोल नदी, डुबरे हत्ती कॅम्प, मल्लारी धबधबा, इरुप्पू धबधबा, पुष्पगिरी वन्यजीव, बुरुडे धबधबा, होन्नामेना केरे तलाव आणि पुष्पगिरी वन्यजीव अभयारण्य अशी अनेक ठिकाणे पाहता मिळतील. तसेच या ठिकाणी असलेली हिरवळ आणि धबधबे अशा नैसर्गिक सौंदर्याने मनाला भुरळ घालणाऱ्या वातावरणात मनसोक्त फिराल.
गोवा
समुद्रकिनाऱ्यावर फिरायचे असेल तर गोव्यालाही जाऊ शकता. ख्रिसमस आणि नववर्षाला गोव्यात अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तुम्ही तुमच्या मित्रांसह आपल्या सुट्ट्यांचा चांगला आनंद घेऊ शकता. या दिवसांमध्ये तुम्ही गोव्याला भेट देण्यासाठी उत्तम राहील. पालोलेम बीच, बागा बीच, अंजुना बीच ला तुम्ही इथे भेट देऊ शकता. ख्रिसमस आणि नववर्षाच्या काळात येथे बरीच सजावटही केली जाते. अनेक ठिकाणांहून येथे लोकं मोठ्या प्रमाणात येत असतात.
शिमला आणि मनाली
या वेळी ख्रिसमस किंवा नववर्षाचं सेलिब्रेशन तुम्हला बर्फवृष्टीचा आनंद घेत करायचा असेल तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड किंवा जम्मू-काश्मीर सारख्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करू शकता. बर्फाच्छादित पर्वतांवर तुम्हाला स्कीइंग, स्लेजिंग, आऊटडोअर स्केटिंग आणि स्नोबॉल फाइट सारखे ऍक्टिव्हिटी करण्याची संधी मिळू शकते. मनाली, शिमला आणि गुलमर्ग सारख्या ठिकाणी ख्रिसमस आणि नवीन वर्षात विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यासांरख्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मस्तपैकी हे दिवस एन्जॉय करू शकता.