‘ही’ रोड ट्रिप तुमच्या कुटुंब आणि एकट्याने प्रवास करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय, तुमच्या आठवणींमध्ये राहील कायम
ज्यांना ऑफबीट किंवा थोडे वेगळे प्रवास करायला आवडते त्यांच्यासाठी भारतात असे अनेक मार्ग आणि डेस्टिनेशन आहेत जे एका अद्भुत रोड ट्रिपसाठी योग्य आहेत. देशातील काही सुंदर रोड ट्रिपबद्दल आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत.

प्रत्येकजण रोजच्या धावपळीच्या जीवनात आराम मिळावा तसेच मन शांत करण्यासाठी बाहेर फिरायला जाण्यासाठी बहुतेक लो्क लॉंग ड्राईव्हला जाण्याचा बेत आखतात. अशातच बदलत्या जीवनशैली बरोबर आता प्रवास करण्याचे मार्गही बदलले आहेत. पूर्वीच्या काळात आपल्या कुटुंबातील मुले उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट पाहत असत. जेणेकरून संपुर्ण कुटुंब फिरायला जाण्यासाठी प्लॅनिंग करायचे आणि मनसोक्त फिरून यायचे. पण आता बहुतेक लोकं एकट्याने बाहेर फिरायला जाण्याचे ठरवतात. अशात तुम्ही सुद्धा एकट्याने किंवा कुटुंबासह बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखत असाल तर लाँग रोड ट्रिप हा प्रवासाचा आनंद घेण्याचा एक मजेदार मार्ग आहे. या ट्रिपमध्ये तुम्हाला अनोळखी लोकांशी बोलण्यासाठी वेळ मिळतो. प्रत्येक ठिकाणांची माहिती मिळते. चला तर मग आम्ही तुम्हाला अशा रोड ट्रिपबद्दल सांगतो, जिथे तुम्ही मनमोहक दृश्य पाहू शकता तसेच निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवू शकता.
मुंबई-पुणे रोड ट्रिप
मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा महाराष्ट्रातील एक अतिशय सुंदर मार्ग आहे. इथे जाताना लागणारा पश्चिम घाट आहे. आणि तेथील डोळ्याचे पारणे फेडणारा व मन तृप्त होणारा दृश्य पाहण्यासारखे आहे. आयुष्यात एकदा तरी या रोड ट्रिपची योजना नक्की करा. तुम्ही मुंबई-पनवेल-लोणावळा-एमबी व्हॅली-पुणे हा मार्ग घेऊ शकता, जो 200 किमी अंतराचा आहे.




बंगळुरू-म्हैसूर रोड ट्रिप
बंगळुरू हे आयटी हब आहे. इथे लोक बहुतेक फक्त आठवड्याच्या शेवटी मोकळे असतात. बंगळुरू-म्हैसूर रोड ट्रिप फक्त ५ तासांचा प्रवास आहे पण खूप अद्भुत आणि सुंदर आहे. या मार्गावरील निसर्गाचे मनमोहक दृश्य तसेच हिरवळ पाहून तुमचे मनही आनंदी होईल. तुम्ही बंगळुरू- रामनगर- चन्नपटण- श्रीरंगपटण- म्हैसूर हा मार्ग घेऊ शकता. त्याचे अंतर 145 किलोमीटर आहे.
जयपूर ते अजमेर रोड ट्रिप
राजधानीपासून ते रजवाडेपर्यंत, हा मार्ग प्रत्येकाच्या पसंतीच्या यादीत आहे. हा प्रवास खूप वेगळा आहे, तुम्हाला असंख्य रंगांपासून ते वाळवंटांपर्यंत सर्व काही या ट्रिप मध्ये तुम्हाला दिसेल. रस्ते खूप स्वच्छ आहेत. 175 किमीच्या या मार्गावर, तुम्ही जयपूर-सांभर-रूपणगड-किशनगड मार्गने जात तुम्ही अजमेरला पोहोचाल.
मुंबई ते गोवा रोड ट्रिप
जर तुम्हाला गाडी चालवायला आवडत असेल तर मुंबईहून गोवा प्रवास करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पश्चिम घाटातून जाणे. गगनचुंबी इमारतींमधून जाणारा रस्ता अचानक हिरव्या रंगाच्या छटांनी भरतो. हिरवीगार शेते, नद्या आणि धबधबे यामुळे हा मार्ग अद्भुत बनतो. येथे पोहोचण्यासाठी तुम्ही मुंबई-पुणे-सातारा-कोल्हापूर-संकेश्वर-सावंतवाडी-गोवा हा मार्ग घेऊ शकता.