Special Story | लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा ट्रेकला जाण्याचा विचार करताय? चला तर मग भेट देऊया ‘सिंहगड’ला!

कोरोना काळात अनेक ट्रेकर्स घरात अडकून पडले आहेत. अनलॉक अंतर्गत आता काहीशी ढील मिळाल्यामुळे पुन्हा एकदा ट्रेकिंगला परवानगी देण्यात आली आहे.

Special Story | लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा ट्रेकला जाण्याचा विचार करताय? चला तर मग भेट देऊया ‘सिंहगड’ला!
सिंहगडाचा पुणे दरवाजा
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 7:22 AM

मुंबई : कोरोना काळात अनेक ट्रेकर्स घरात अडकून पडले आहेत. अनलॉक अंतर्गत आता काहीशी ढील मिळाल्यामुळे पुन्हा एकदा ट्रेकिंगला परवानगी देण्यात आली आहे. अशावेळी सगळ्या ट्रेकर्सचा आवडता किल्ला म्हणजे पुण्यातला ‘सिंहगड’. ट्रेकरचा धीर पाहणारा किल्ला, माथ्यावर मात्र विलक्षण सुख देऊन जातो. किल्ल्यावर चढाई करताना आलेला सगळा त्राण गडावर पोहोचताच नाहीसा होतो. चला तर जाणून घेऊया इतिहासाची जिवंत खुण असणाऱ्या या किल्ल्याबद्दल… (Best Trekking spot sinhagad fort at pune)

तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची आठवण करून देणारा हा ‘सिंहगड’ किल्ला पुणे शहराच्या नैऋत्य दिशेला आहे. सिंहगड किल्ला सह्याद्रीच्या भुलेश्वर या उपरांगेवर आहे. भुलेश्वराची उपरांग पुण्याच्या दक्षिणेला असून ती पुर्व पश्चिम अशी धावते. या रांगेमध्ये सिंहगड, सोनोरी आणि दौलतमंगळ असे तीन किल्ले आहेत.

सिंहगडाचे भौगोलिक महत्त्व

सिंहगड हा डोंगरी किल्ला असून याचे भौगोलिक स्थान अतिशय महत्वाचे आहे. सिंहगडावर जाण्यासाठी काही वेगवेगळे मार्ग आहे. पुर्वीच्या काळात सिंहगडावर जाण्यासाठी दक्षेणेकडील कल्याण दरवाजा मार्ग वापरण्यात येत असे. सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला कल्याण नावाचे छोटेसे गाव आहे. तेथून हा मार्ग गडावर येतो. कोंढणपूर या पुर्व पायथ्याच्या गावातून दमछाक करणार्‍या वाटेनेही सिंहगडावर चढता येते. उत्तरेकडील खानापूर येथूनही सिंहगडावर चढाई करता येते, मात्र हा मार्ग म्हणजे लांब पल्ला. सिंहगडावर जाणार्‍या या मार्गाशिवाय सर्रास वापरला जाणारा सर्वात सोपा मार्ग म्हणजे उत्तर पायथ्याचा अतकरवाडीचा मार्ग.

पुण्याच्या दिशेला असल्यामुळे सिंहगडाच्या या दरवाजांना पुणे दरवाजे असे नाव मिळाले आहे. हे एका पाठोपाठ काही अंतरावर असलेले तीन दरवाजे आहेत. वेगवेगळ्या कालखंडामध्ये बांधलेले हे दरवाजे कड्याच्या वर आहेत.

पुणे दरवाजापर्यंत जाण्यास मोटाररस्ता आहे. याचा नामोल्लेख कागदोपत्री कुंधाना,कोंढाणा, बक्षिंदाबक्ष, सिंहगड वगैरे भिन्न नावांनी आढळतो. त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 1316 मीटर व पायथ्यापासून 701 मीटर असून आकार एखाद्या त्रिकोणी फरशी कुऱ्हाडीसारखा आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे 70000 चौरस मीटर आहे(Best Trekking spot sinhagad fort at pune).

कोंढाण्याचा झाला ‘सिंहगड’

आज सिंहगड नावाने ओळखला जाणार कोंढाणा किल्ला पुरंदरच्या तहानंतर 1665 साली मुघलांना दिला गेला होता. या तहात 23 किल्ले मुघलांना दिले होते. कोंढाणा पुण्याकडे तोंड करून होता. प्रत्येक शहराचा एक किल्ला होता. शिवाजी महाराजांना तो किल्ला परत हवा होता. ही जबाबदारी त्यांनी तानाजी मालुसरेंकडे सोपवली. हा तह झाल्यानंतर महाराज आग्र्याला गेले होते आणि तिथून त्यांनी पलायन केले. तिथून आल्यावर शिवाजी महाराजांनी या तहाविरोधात बंड पुकारले.

महाराजांच्या आदेशानुसार ‘नरवीर’ तानाजी मालुसरे यांनी भाऊ सूर्याजी मालुसरे आणि मावळ्यांसह कोंढाण्यावर चढाई केली. यावेळेस लढाई लढताना ते धारातीर्थी पडले. मात्र, हा किल्ला त्यांनी पुन्हा एकदा स्वराज्यात सामील केला. तानाजींच्या मृत्यूचे वृत्त कळताच महाराजांनी ‘गड आला पण सिंह गेला’, असे उद्गार काढले. यावरूनच पुढे कोंढाण्याचे नाव बदलून ‘सिंहगड’ झाले.

गडावर जाऊन काय पाहाल?

गडावर चढत असतानाच वाटेत अनेक चविष्ट गोष्टी चाखायला मिळतात. झुणका-भाकरी, मटका दही, रानमेवा, मका, भजी, वांग्याचं भरीत, ताक अशा अनेक स्वादिष्ट गोष्टी चाखायला मिळतात(Best Trekking spot sinhagad fort at pune).

पूर्वी सिंहगडावर एकूण 48 टाकी होत्या. त्यांपैकी चार-पाच सोडता सर्वांत पाणी होते. गणेश, राजाराम, देव आदी टाकी आजही प्रसिद्ध असून, यातील देवटाके व सुरुंगाचे पाणीटाके यांत भरपूर पाणी असते. याशिवाय तीन तळी व एक विहीर देखील आहे. गडावर बालेकिल्ला व त्याची सदर, राजमंदिर, थोरली व धाकटी सदर, त्यापुढील बंगला, राजवाडा, जवाहीरखान्यासह सरकारवाडा, अंमलदाराचा वाडा, पुणे वाडा, इस्तादकोठी, भातखळ्याची कोठी, दोन अंबरखाने, दारुखाना, कल्याण दरवाजा, यशवंत, झुंझार, आले व खांदकडा असे चार भक्कम बुरुज, चौक्या, अमृतेश्वर भैरव, कोंढाणेश्वर, गणपती, नरसिंह इ. मंदिरे, राजाराम व तानाजी यांच्या समाध्या, उदयभानचे थडगे, शृंगारचौकी इत्यादी अनेक वास्तू होत्या. त्यांपैकी बऱ्याच 1771मध्ये दारुखान्यावर वीज पडल्याने स्फोट होऊन जमीनदोस्त झाल्या. काहींची दुरुस्ती झाली आणि काही नवीन बांधण्यात आल्या.

त्यांत लोकमान्य टिळकांचा बंगला आजही येथे आहे. आज यांतील थोड्या वास्तू सुस्थितीत पाहायला मिळतात. त्यांपैकी छत्रपती राजाराम महराजांची समाधी, तानाजींची समाधी, जवाहीरखाना, दारुखाना, राजवाड्याचे अवशेष आणि कोंढाणेश्वर व अमृतेश्वर भैरव ही दोन मंदिरे प्रेक्षणीय आहेत. दरवर्षी फाल्गुन वद्य नवमीला येथे उत्सव असतो.

कसे जाल?

पुणे शहरापासून 35-40 किलोमीटर दूर असणाऱ्या या गडाजवळ जाण्यासाठी पुणे रेल्वेस्थानकापासून बस, रिक्षा किंवा स्थानिक वाहने सहज उपलब्ध होतात. ट्रेकिंगची इच्छा असल्यास गडाच्या पायथ्याशी उतरता येते. तर गडाच्या मुख्य दरवाज्यापर्यंत वाहनाने देखील पोहोचता येते. गडावर तंबू टाकून अथवा स्थानिकांची मदत घेऊन मुक्काम देखील करून शकता. एका दिवसाच्या ‘शॉर्ट ट्रीप’साठी हे उत्तम ठिकाण आहे.

(Best Trekking spot sinhagad fort at pune)

हेही वाचा :

मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.