Tips and trick : घाणेरड्या बाथरूम टाइल्समुळे वैतागलात ? अशी करा सफाई, चमकेल तुमचे बाथरूम
बरीच लोकं बाथरूम टाईल्स साफ करण्यासाठी साबण किंवा डिटर्जंट पावडरचा वापर करतात. मात्र त्यामुळे जिद्दी डाग साफ होतातच असे नाही. काही साध्या उपायांनी हे डाग कायमचे घालवता येऊ शकतात, हे तुम्हाला माहीत आहे का ?
How To Clean Bathroom Tiles : आपण सकाळी उठल्यावर सर्वात पहिले बाथरूमचा (Bathroom) वापर करतो. पण बाथरूम घाणेरडं असेल तर त्यामुळे अनेक प्रकारचे आजार पसरून आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच बाथरूमची नीट स्वच्छता गरजेची असते. बहुतांश लोक हे बाथरूम साफ तर करतात, पण तेथील टाईल्सवरील (Bathroom Tiles) घाण तशीच राहते. त्यामुळे त्यांची चमकही कमी होते.
बरीच लोकं बाथरूम टाईल्स साफ करण्यासाठी साबण किंवा डिटर्जंट पावडरचा वापर करतात. पण त्यामुळे टाईल्सवरील हट्टी डाग स्वच्छ होतातच असे नाही ना. पण साधारण दिसणाऱ्या तीन गोष्टींमुळे टाईल्स स्वच्छ होऊन त्यावरील डागही जाऊ शकतात हे तुम्हाला माहीत आहे का ? तुम्हाला हा उपाय थोडा विचित्र वाटेल, पण जिद्दी डाग आणि घाण काढून टाकण्यासाठी तो खूप प्रभावी ठरू शकते. या 3 गोष्टींपासून तयार केलेले मिश्रण वापरल्याने टाईल्स पूर्वीसारख्या चमकू लागतील.
बाथरूम टाईल्स साफ करण्याचा प्रभावी उपाय
तीन गोष्टींनी तयार करा मिश्रण
जर तुम्हाला बाथरूमच्या टाइल्सवर साचलेली घाण साफ करायची इच्छा असेल तर हे मिश्रण तुमच्यासाठी अतिशय उपयोगी ठरेल. त्यासाठी एका बाऊलमध्ये प्रथम 2 चमचे बेकिंग सोडा घ्या व त्यात २ चमचे डिटर्जंट पावडर टाका. नंतर टाईल्सवर हार्पिक बाथरूम क्लीनर टाकून त्यावर बेकिंग सोडा व डिटर्जंटचे मिश्रण टाकावे व थोडा जोर लावून घासावे.
बेकिंग सोडा हा अनेक हट्टी डाग घालवतो. त्याच्या वापराने टाइल्स नव्या प्रमाणे चमकू लागतील. बेकिंग सोडा व डिटर्जंटचे मिश्रण एकत्र करू ठेवा. नंतर टाइल्सवर हार्पिक टाकावे व त्यावर बेकिंग सोडा व डिटर्जंटचे मिश्रण टाकून नीट पसरवावे. नंतर कपडे धुण्याच्या ब्रशने टाईल्स रगडून घासाव्यात व पाण्याने स्वच्छ धुवाव्यात. असे केल्याने टाइल्स चमकू लागतील.
हार्पिकमध्ये थोडे ॲसिड असते, जे चांगली स्वच्छता करते. तसेच बेकिंग सोडा व डिटर्जंटच्या मिश्रणामुळे ॲसिडची क्षमता वाढते. थोडा जर लावून घासल्यानंतर अतिशय हट्टी डागही सहज निघतात.
एक काळजी घ्या
मात्र तुम्ही बाथरूम साफ करण्याचा प्लान आखत असाल तर विशेष काळजीही घेतली पाहिजे. बाथरूमच्या टाईल्सना हे मिश्रण लावण्यापूर्वी हातात ग्लोव्ह्ज घालावेत. जेणेकरून हातांना त्रास होणार नाही.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)