दुधामध्ये ‘हा’ एक पदार्थ घातल्याने चमकतो चेहरा, पिंपल्सपासूनही मिळते सुटका; जाणून घ्या कोणता आहे हा पदार्थ?
अनेक वेळा प्रदूषण आणि इतर कारणांमुळे चेहऱ्याची त्वचा मृत आणि निस्तेज होऊ लागते किंवा त्वचेवर पिंपल्स येऊ लागतात, ज्यामुळे तुमचे सौंदर्य बिघडते. तुम्हाला पिंपल्समुक्त चेहरा हवा असेल तर दूध आणि हळदीचा वापर करू शकता.
नवी दिल्ली – आपण रोजच्या जीवनात अशा अनेक पदार्थांचा वापर करतो, जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. दूध आणि हळदीचा (milk and turmeric) आपण रोज वापर करू शकतो. दुधामुळे हाडं मजबूत होतात, तर स्वयंपाकघरात नेहमी उपलब्ध असणारी हळद ही जेवणापासून, सौंदर्य प्रसाधनांपर्यंत सर्वत्र वापरली जाते. त्याचा औषध म्हणूनही वापर केला जाऊ शकतो. हीच हळद आणि दूध आपल्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर (beneficial for skin) असते हे तुम्हाला माहीत आहे का ? अनेक वेळा धूळ, प्रदूषण आणि इतर कारणांमुळे चेहऱ्याची त्वचा मृत आणि निस्तेज (dead skin) होते. अशा वेळी हळद व दुधाच्या वापराने त्वचेची चमक पुन्हा येण्यास मदत होते.
प्रत्येक व्यक्तीला चमकणारा आणि सुंदर चेहरा हवा असतो आणि यासाठी लोक विविध प्रकारची रसायने आणि इतर उत्पादने वापरतात, परंतु केमिकलयुक्त उत्पादने कधीकधी आपल्या त्वचेचे खूप नुकसान करतात. म्हणूनच चेहऱ्याचे सौंदर्य बिघडवणारे कोणतेही पदार्थ आपण टाळले पाहिजेत. दूध आणि हळद हे दोन्ही नैसर्गिक घटक आहेत आणि ते त्वचेच्या सौंदर्यासाठी खूप फायदेशीर आहेत. दूध आणि हळदीचे मिश्रण चेहऱ्याचे सौंदर्य कसे वाढवते ते जाणून घेऊया…
दुधात हळद मिसळा : कोरड्या आणि शुष्क त्वचेसाठी तुम्ही दूध आणि हळद थेट चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी एका भांड्यात 2-3 चमचे दूध घ्या आणि त्यात चिमूटभर हळद घाला. दोन्ही नीट मिसळा. आता कापसाचा एक छोटा तुकडा घ्या आणि तो दूध-हळदीच्या मिश्रणात बुडवून चेहऱ्यावर लावावे. हे थोडा वेळ चेहऱ्यावर राहू द्यावे. वाळल्यावनंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
हळद-दुधाचा फेसपॅक वापरा : निस्तेज चेहऱ्यावरील चमक पुन्हा मिळवण्यासाठी तुम्ही हळद आणि दुधाचा फेस पॅक देखील वापरू शकता. हे त्वचेतून घाण आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करेल. फेस पॅक तयार करण्यासाठी, एका भांड्यात एक चमचा चंदन पावडर किंवा मुलतानी माती घ्यावी, त्यात 2-3 चमचे दूध मिसळा आणि त्यात चिमूटभर हळद घाला. मिक्स केल्यानंतर मिश्रण तयार करा. फेस मास्क लावण्यापूर्वी चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. हा फेस पॅक सुमारे 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा.
स्क्रबप्रमाणे करा वापर : डेड स्किन तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य बिघडवत असेल तर ते दूर करण्यासाठी तुम्ही हळद आणि दुधाचाही वापर करू शकता. यासाठी तुम्ही हळद आणि दूध घालून स्क्रब तयार करू शकता. यासाठी एका भांड्यात एक चमचा ओटमीलची पावडर घालावी. त्यात आवश्यकतेनुसार दूध घाला. त्यामध्ये थोडी हळद मिसळा. मिश्रण थोडं फुगू द्या. आता याचा वापर चेहऱ्यावर स्क्रब म्हणून करू शकता. हे मिश्रण चेहऱ्याला लावून मसाज करा आणि 5-10 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्यावे. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. नंतर आठवणीने मॉयश्चरायझर लावा.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)