गाढ झोप येत नाही? मग हे पदार्थ खा, कुंभकर्णासारखी येईल झोप
हल्लीच्या धावपळीच्या जीवनात चांगली झोप मिळवणे कठीण झाले आहे. रात्रीच्या जेवणानंतर चहा पिणे हे एक साधे, परंतु प्रभावी उपाय असू शकते. चहा पचन सुधारतो, मानसिक ताण कमी करतो आणि शरीराचे विषारी घटक बाहेर काढतो. त्यामुळे चांगली, गाढ झोप येण्यास मदत होते. हे घरगुती उपाय अनेक आरोग्य समस्यांपासून बचाव करण्यासही मदत करू शकते.
हल्ली जीवनशैली बदलल्याने आपल्या जीवनाच्या अनेक गोष्टीही बदलल्या आहेत. आपण आपला आहार वेळेवर घेत नाही. व्यायाम, योगा आणि मेडिटेशनपासून दूर राहतो. त्यामुळे मग शरीर स्थुल बनतं. कमी वयात म्हातारपण येतं आणि आजारपण मागे लागल्याने औषधांची जंत्री घेऊनच फिरावं लागतं. काही लोकांना तर खराब जीवनशैलीमुळे रात्रीची झोपही चांगली येत नाही. कामाचा ताण, मानसिक दबाव किंवा मोबाईल, लॅपटॉपचा वापर यामुळे अनेक वेळा झोपेचं त्रांगडं होतं. चांगली झोप मिळवण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ अनेक सूचना देत असतात. त्या फॉलो केल्या पाहिजे.
चांगली झोप मिळवण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांनी काही टिप्स दिल्या आहेत. झोप घेण्यापूर्वी काही वेळ चालणे किंवा ध्यान करणे आरोग्यासाठी चांगलं असतं, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. आरोग्य तज्ज्ञांच्या या टिप्स अनेक लोक शक्य तितक्या प्रमाणात पाळतात. पण व्यस्त दिनचर्येमुळे अनेक लोकांना स्वत:कडेही लक्ष देता येत नाही. जर तुम्ही देखील व्यस्त जीवनशैलीमुळे या नियमांचे पालन करू शकत नसाल, तर एक साधा उपाय तुमच्यासाठी मदत ठरू शकतो.
तुमच्या घरात सहज उपलब्ध असलेला एक साधा पदार्थ तुमच्यासाठी औषधी काम करू शकतो. हा पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला गाढ आणि शांत झोप लागेल. अनेक लोक रात्री जेवणानंतर काही गोड खायची इच्छा व्यक्त करतात, तर काही लोक दूध पितात किंवा सुंठ खातात. याशिवाय, जेवणानंतर चहा पिण्याची सवय लावली पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, रात्री जेवणानंतर चहा प्यायल्यास शांत आणि गाढ झोप मिळवण्यास मदत होऊ शकते. चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत.
काय आहेत फायदे
चांगली झोप :
रात्री जेवणानंतर चहा प्यायल्यामुळे गॅस आणि अॅसिडिटीच्या समस्या होत नाहीत. काही लोक रात्री जेवणानंतर गॅस आणि अॅसिडिटीमुळे अस्वस्थ होतात. अशा परिस्थितीत जर चहा घेतला, तर त्यांना आराम मिळतो. चहा प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते. कारण तो गॅस्ट्रिक एंझाइम उत्पादनाला उत्तेजन देतो. त्याशिवाय, चहामध्ये असलेला बिटनिन झोपेसाठी आवश्यक हार्मोनच्या निर्मितीला मदत करतो, ज्यामुळे चांगली झोप लागते.
मानसिक ताण कमी होतो :
अनेक लोक रात्री मानसिक ताण तणावामुळे त्रस्त असतात. अशा परिस्थितीत चहा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. चहामध्ये अँटीऑक्सिडन्ट्स आणि नैसर्गिक फाइटोकेमिकल्स असतात. त्यामुळे मानसिक ताणतणाव कमी होतो. त्यामुळे तुम्हाला शिथिलता जाणवते आणि रात्री आरामात झोप येऊ शकते.
विषविमुक्त होणे :
रात्री चहा प्यायल्यामुळे शरीर विष मुक्त होते, म्हणजेच शरीरातून हानिकारक पदार्थ बाहेर पडतात. शरीर विषमुक्त झाल्याने व्यक्ती निरोगी राहतो. त्वचाही चांगली राहते. यासोबतच, चांगली झोप येण्यातही मदत होते.