साबण की बॉडीवॉश ? दोन्हीपैकी कशाचा वापर ठरतो उत्तम ?
साबण हा त्वचेवरील मळ साफ करण्याचे काम करतो तर बॉडीवॉशमुळे शरीरावर असलेली अशुद्धताही स्वच्छ होते. मग साबण आणि बॉडीवॉश यापैकी कशाचा वापर उत्तम ठरतो ?
नवी दिल्ली | 29 जुलै 2023 : साबण (soap) आणि बॉडीवॉश (bodywash) यापैकी कशाची निवड करावी यामध्ये आजकाल बरेच जण कन्फ्यूझ असतात. आपल्या स्किनसाठी यापैकी कोणत्या प्रॉडक्टचा वापर जास्त फायदेशीर ठरू शकतो ? काही लोक साबणाचा जास्त वापर करतात तर काहींना साबणापेक्षा बॉडीवॉशचा वापर करणे चांगले वाटते.
साबण हा त्वचेवरील मळ साफ करण्याचे काम करतो तर बॉडीवॉशमुळे शरीरावर असलेली अशुद्धताही स्वच्छ होते. मग साबण आणि बॉडीवॉश यापैकी कशाचा वापर उत्तम ठरतो ? चला जाणून घेऊया.
जास्त लोकांची पसंती साबणाला !
बहुतांश लोक आजही साबणाचा वापर करतात. अंघोळीसाठी किंवा हात धुण्यासाठीही ते साबणच वापरतात. साबणाचा वापर करण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे त्याचा सुगंध स्ट्राँग असतो, ज्यामुळे तुम्हाला बराच काळापर्यंत फ्रेश वाटतं. पण बऱ्याच वेळेस साबणाचा जास्त वावर केल्याने आपली त्वचा कोरडी होऊ शकते.
आंघोळीच्या साबणात सोडियम लॉरील सल्फेट नावाचे रसायन असते, ज्यामुळे आपली त्वचा कोरडी होऊ शकते. साबणाच्या अतिवापरामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते. याशिवाय, साबण कमी स्वच्छ मानला जातो कारण तो उघडा राहतो, तो अनेक जीवाणूंच्या संपर्कात येऊ शकतो.
बरेचसे लोक बॉडीवॉश वापरण्यास देतात पसंती
मात्र, साबणासोबतच काही लोकं बॉडी वॉशचाही वापर करत आहेत. साबणापेक्षा बॉडी वॉश त्वचेसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो. बॉडी वॉशमध्ये साबणापेक्षा पीएच पातळी चांगली असते. तसेच त्यामध्ये साबणापेक्षा जास्त मॉयश्चरायझिंग गुणधर्म देखील असतात.
बॉडीवॉश कधी वापरावा ?
अंघोळीनंतर जर तुमची त्वचा कोरडी पडत असेल तर तुम्ही बॉडीवॉशचा वापर करण्यास सुरूवात करू शकता. याच्या वापराने त्वचा मॉयश्चराइज होते. तसेच तुम्हाला सोरायसिस, मुरूमे किंवा त्वचेशी संबंधित एखादी समस्या जाणवत असेल तर तुम्ही माइल्ड बॉडी वॉश वापरू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)