Fitness Goals | ‘मूव्ह ऑफ द वीक’मध्ये मलायकाने सांगितले फिटनेस रहस्य, तुम्हीही ट्राय करू शकता ‘हे’ आसन!
बॉलिवूडची ‘फिटनेस क्वीन’ अभिनेत्री मलायका अरोरा बर्याचदा योगा आणि जिम सेशन्सच्या बाहेर स्पॉट केली जाते. यादरम्यान नेहमीच मलायकाचा लूक बर्यापैकी कॅज्युअल असतो.
मुंबई : बॉलिवूडची ‘फिटनेस क्वीन’ अभिनेत्री मलायका अरोरा बर्याचदा योगा आणि जिम सेशन्सच्या बाहेर स्पॉट केली जाते. यादरम्यान नेहमीच मलायकाचा लूक बर्यापैकी कॅज्युअल असतो. मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. ती अनेकदा आपल्या चाहत्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी प्रेरित करत असते. नुकताच तिने योगा करताना एक फोटो शेअर केला आहे. या फोटो आणि कॅप्शनमधून मलायाकाने तिच्या फिटनेसचं गुपित सांगितलं आहे (Bollywood Actress Malaika Arora Shares fitness tips ardha matsyendrasana photo).
हा फोटो पाहता अंदाज बांधता येतो की, मलायका या वयातही किती फिट आहे! या फोटोमध्ये तिने ब्लश पिंक स्पोर्ट्स टॉप आणि लॅव्हेंडर कट आऊट पॅन्ट परिधान केली आहे. मलायकाने ‘मूव्ह ऑफ द वीक’ या सीरीजच्या या आठवड्यातील भागासाठी अर्ध मत्स्येंद्रासन योगा केला आहे.
View this post on Instagram
फोटो शेअर करताना मलायाकाने लिहिले की, ‘सर्वांना नमस्कार, मलायकासोबत ‘मूव्ह ऑफ द वीक’मध्ये एक नवीन मूव्ह ट्राय करण्याची वेळ आहे.’ या फोटोत मलायका अर्ध मत्स्येंद्रासन करताना दिसत आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि रकुलप्रीत सिंह यांनाही मलायकाची ही पोस्ट आवडली आहे.
या आसनाचा फायदा
अर्ध मत्स्येंद्रासनाचे फायदे सांगताना मलायका म्हणाली की, हे आसन केल्याने शरीराचा खालचा भाग आणि हिप्स मजबूत होतात. तसेच हे आसन केल्याने मान, खांदे आणि हातांची लवचिकता वाढते. याच बरोबर हे आसन केल्याने पाचन तंत्र आणि यकृत देखील मजबूत होते.’ (Bollywood Actress Malaika Arora Shares fitness tips ardha matsyendrasana photo)
कसे करायचे अर्ध मत्स्येंद्रासन?
आसनाची पद्धत सांगताना मलायकाने लिहिले की, ‘सर्वप्रथम पाय सरळ करून दंडसनाच्या अवस्थेत बसा, आपले हात जमिनीवर ठेवा आणि आपल्या पाठीचे हाड सरळ रेषेत ठेवा. आपल्या डाव्या पायाने उजव्या बाजूने हिप्सला स्पर्श केला पाहिजे.’
‘तुमचा उजवा पाय तुमच्या डाव्या पायाच्या वर अशा प्रकारे ठेवा की तुमचा उजवा पाय तुमच्या डाव्या गुडघ्याच्या शेजारी असेल. आपला डावा कोपर आपल्या उजव्या गुडघाच्या बाहेर ठेवा. मग आपला हात पाठीच्या बाजूला करा. आता आपले वरचे शरीर किंचित वाकवा. आपला डावा हात आपल्या उजव्या हाताने पकडा किंवा इंटरलॉकने करून ठेवा. आपली हनुवटी उजव्या खांद्याच्या दिशेने ठेवा. सुमारे 10 ते 15 सेकंद या आसनात थांबा आणि मग आसन सोडा. मग अशाच प्रकारे दुसर्या पायाने पुन्हा ही क्रिया करा.’
(Bollywood Actress Malaika Arora Shares fitness tips ardha matsyendrasana photo)
हेही वाचा :
Fitness Mantra | केवळ व्यायामच नव्हे, तर तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी ‘या’ सवयी बदलण्याची गरज!https://t.co/xB7klVHrc0#health #HealthTips #fitness
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 19, 2020