बसून खा, वर्षाला 40 लाख कमवा; बिस्कीटं चाखण्याच्या कामासाठी तगडा पगार

'बॉर्डर बिस्कीट्स' कंपनी बिस्कीटांची चव चाखण्यासाठी 40 लाखांचं पॅकेज देत आहे. याशिवाय वर्षाला 35 दिवसांची सुट्टीही मिळेल आणि रोज मोफत बिस्कीटंही

बसून खा, वर्षाला 40 लाख कमवा; बिस्कीटं चाखण्याच्या कामासाठी तगडा पगार
Follow us
| Updated on: Oct 19, 2020 | 4:08 PM

Border Biscuits Hunts For Master Biscuitier : आरामाची नोकरी करुन रग्गड पैसा कमवावा, असं स्वप्न कित्येक जण उराशी बाळगून असतात. स्कॉटलंडमधील (Scotland) ‘बॉर्डर बिस्कीट्स’ (Border Biscuits) ही नामवंत कंपनी बसल्या जागी ‘खाऊन’ पैसे कमवण्याची संधी देत आहे. बिस्कीट चाखण्यासाठी वर्षाकाठी तब्बल 40 हजार पाऊंड म्हणजे अंदाजे 40 लाख रुपयांची जॉब ऑफर ‘बॉर्डर बिस्कीट्स’ देत आहे. (Border Biscuits Hunts For Master Biscuitier offers 40 lakh package per annum)

‘बॉर्डर बिस्कीट्स’ कंपनी मास्टर बिस्कीटरचा शोध घेत असून त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ‘एडिनबरा न्यूज‘ वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार ‘बॉर्डर बिस्कीट्स’ ही बिस्कीटांची चव चाखण्यासाठी 40 लाखांचं पॅकेज देत आहे. याशिवाय वर्षाला 35 दिवसांची सुट्टीही मिळेल… आणि रोज मोफत बिस्कीटं खायला मिळणार, हे वेगळंच!

अर्जदाराला चव आणि बिस्कीट निर्मितीविषयी सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. यासोबत नेतृत्वगुण आणि संवादकौशल्यही आत्मसात असणे गरजेचे आहे. ग्राहकांशी संबंध दृढ करण्यासाठी इंटरेस्टिंग उपाय सुचवणाऱ्या उमेदवाराला नोकरीत प्राधान्य दिले जाईल, अशी अट आहे.

ग्रेट ब्रिटनच्या बिस्कीट इंडस्ट्रीमध्ये रस असणाऱ्या व्यक्तींसाठी ही सुवर्णसंधी असल्याचं ‘बॉर्डर बिस्कीट्स’चे व्यवस्थापकीय संचालक पॉल पार्किस यांनी सांगितले. मास्टर बिस्कीटरच्या ज्ञानाचा उपयोग करुन प्रत्येकाच्या पसंतीस उतरतील, अशी बिस्कीटं तयार करण्याचा कंपनीचा मानस आहे.

“आम्ही देशभरातील व्यक्तींना अर्ज करण्यास प्रोत्साहन देत आहोत. काही चांगल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. बॉर्डर बिस्कीटचे ब्रँड हेड सुझी कार्लाव्ह म्हणाले की, कंपनी उत्कृष्ट स्वाद आणि दर्जेदार बिस्किट्सची सेवा ग्राहकांना देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. या कामासाठी आम्ही मास्टर बिस्किटर शोधत असल्याचं त्यांनी सांगितलं.

(Border Biscuits Hunts For Master Biscuitier offers 40 lakh package per annum)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.