झोप लागत नाही? हा घ्या जालीम उपाय.. मधुमेहासह हे 6 आजार होतील दूर

घरात मसाल्याच्या डब्यामध्ये तमालपत्र नेहमी दिसून येते. जेवणाची चव वाढवण्यासाठी याचा वापर होत असतो. परंतु तमालपत्राच्या माध्यमातून आपण अनेक आजारांनाही आपल्या शरीरापासून दूर ठेवू शकतो.

झोप लागत नाही? हा घ्या जालीम उपाय.. मधुमेहासह हे 6 आजार होतील दूर
Bay leaf
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 9:51 AM

मुंबई :  आपण रोज अशा अनेक घटकांचा वापर करतो ज्यांचा बहुगुणी उपयोग कसा करावा याची आपल्याला पुरेशी माहिती नसते. अनेक घटकांमध्ये औषधी गुणधर्म असतात. त्याच्या योग्य वापरातून आपण अनेक आजारांपासून लांब राहू शकतो. प्रचंड आणि असंख्य गुणधर्मांनी भरलेली अशीच एक वनस्पती म्हणजे तमालपत्र. (Bay leaf) तमालपत्राचा स्वयंपाकासाठी नेहमी वापर केला जातो. तमालपत्र जेवणाची चव तर वाढवतातच, पण त्यातील पोषकतत्त्वे आपल्याला अनेक आजारांवर फायदेशीर ठरत असतात. तमालपत्रात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत आणि म्हणूनच ते अनेक काळापासून नैसर्गिक (Natural) औषधांमध्ये वापरले जात आहेत. तमालपत्र ‘लॉरेल’ नावाच्या सदाहरित वनस्पतीपासून तयार होते. या औषधी वनस्पतीची पाने आणि तेलदेखील औषध बनवण्यासाठी वापरले जाते. आयुर्वेदानुसार, तमालपत्रामुळे कफ आणि वात यापासून आराम मिळतो.

वेबएमडीनुसार, तमालपत्राचा वापर मधुमेह, कर्करोग, पोटाच्या समस्या आणि इतर अनेक कारणांसाठी केला जात असतो. अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की तमालपत्रापासून बनवलेला चहा पिल्याने चांगला कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढण्यास मदत होते. तमालपत्र जाळले किंवा त्याचा आहारात वापर केला तरीदेखील त्याचा चांगला परिणाम शरीरावर जाणवत असतो.

1) निद्रानाशाची समस्या होईल दूर

अनेकांना शांत झोप लागत नाही. यासाठी त्यांना उपचारदेखील घ्यावे लागत असतात. निद्रानाश ही बदलत्या जीवनपध्दतीमध्ये एक गंभीर समस्या आहे. तमालपत्र निद्रानाशावर एक जालीम उपाय म्हणून काम करते. झोपण्यापूर्वी, खोलीत चार तमालपत्र जाळून टाका किंवा पाण्यात तमालपत्र टाका आणि झोपण्यापूर्वी प्या, यातून तुमच्या मेंदूला शांतता मिळते व शांत झोप लागते.

2) मधुमेहावर परिणामकारी

तमालपत्र खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते आणि हृदयाचे आरोग्य सुधारू शकते. तमालपत्र हे अँटी-ऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे आणि इन्सुलिनच्या निर्मितीसाठी मदत करते. अशाप्रकारे ते टाइप 2 मधुमेहाचा सामना करण्यासाठी प्रभावी आहे.

3) मानसिक शांतता मिळते

तमालपत्रामध्ये लिनालूल हा घटक असतो. यातून मानसिक शांतता मिळून तणाव दूर होत असतो. फक्त 10 मिनिटे तमालपत्राचा सुगंध घेतल्याने तुम्हाला लगेच बरे वाटू शकते. मन शांत करण्याचेही काम तमालपत्राच्या माध्यमातून होत असते.

4) हृदय निरोगी राहते

तमालपत्रामध्ये रटीन आणि कॅफीक अँसिड सारखे तत्व असतात, जी हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतात. या गुणधर्मांमुळे हृदयाचे आरोग्य मजबूत ठेवण्यास मदत मिळत असते. तमालपत्रामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात, त्यामुळे ह्रदयविकाराचा धोका टाळता येतो.

5) रोगप्रतिकारक शक्ती वाढते

व्हिटॅमिन सी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महत्वाची भूमीका पार पाडत असते. तमालपत्रामध्ये ते भरपूर प्रमाणात असते. या शिवाय तमालपत्रामध्ये झिंक आणि व्हिटॅमिन ए देखील असते, यामुळे डोळे, नाक, घसा आणि पचनसंस्थाही सुधारत असते. यामुळे पोटाचे विकार दूर होत असतात.

6) कोंड्याची समस्या होते दूर

तमालपत्रामुळे केसांची समस्यादेखील दूर होते. आजकाल अनेकांना कोंड्याची समस्या असते. त्यावर तमालपत्र उपयोगी ठरते. केसांना कोंड्याची समस्या असेल तर तुम्ही तमालपत्राचे तेल देखील त्यावर लावू शकता. यासाठी तुमच्या शॅंपूमध्ये या तेलाचे काही थेंब मिसळा आणि मसाज करा, नंतर केस धूवावे, याने कोंड्याची समस्या मुळापासून दूर होईल.

संबंधित बातम्या

सिगरेट आणि दारुचे व्यसन पुरुषांपेक्षा महिलांसाठी जास्त घातक; गर्भाशयाचा कर्करोग होण्याची जास्त शक्यता

हाडांमध्ये दुखणे Blood cancer तर नाही? ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नको…

बदलत्या ऋतूत पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवायची असेल तर या पदार्थांचे नक्की सेवन करा!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.