फ्लिपकार्टवर फक्त एक रुपयात किराणा सामान खरेदी करा
मुंबई : आपण प्रत्येक महिन्याला ग्रोसरी सामान खरेदी करतो. सहाजिकच यावेळी आपण चांगल्या दर्जा सोबत पैशांची बचतही कमी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र एक गोष्ट नक्की आहे की, कोणतेही सामान किंवा एक किलो साखर, डाळ एक रुपयांत खरेदी करु शकत नाही. पण फ्लिपकार्ट तुम्हांला ही सुवर्णसंधी देत आहे. जिथे तुम्हाला एक रुपयामध्ये एक किलो डाळ, साखर […]
मुंबई : आपण प्रत्येक महिन्याला ग्रोसरी सामान खरेदी करतो. सहाजिकच यावेळी आपण चांगल्या दर्जा सोबत पैशांची बचतही कमी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र एक गोष्ट नक्की आहे की, कोणतेही सामान किंवा एक किलो साखर, डाळ एक रुपयांत खरेदी करु शकत नाही. पण फ्लिपकार्ट तुम्हांला ही सुवर्णसंधी देत आहे. जिथे तुम्हाला एक रुपयामध्ये एक किलो डाळ, साखर किंवा इतर वस्तू खरेदी करता येणार आहे.
एक रुपयात साखर, डाळ
प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला फ्लिपकार्टच्या ब्रँडेड कंपनीचे एक लीटर तेल, एक किलो डाळ आणि साखर 1-1 रुपयात आता खरेदी करु शकता. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये घरगुती वस्तूंवर डिस्काऊंट मिळत आहे. या ऑफरमध्ये तुम्ही पीठ, शॅम्प्यू, डाळ आणि तेल इतर बऱ्याच वस्तू कमी किंमतीत खरेदी करु शकता.
सध्या ग्रोसरी सेगमेंटमध्ये आणखी काही बदल करण्यासाठी फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि बिग बास्केटसह ग्रोफर्स ई-कॉमर्स बाजारात भागीदारी वाढवण्यासाठी नवीन प्रयोग करत आहे.
वस्तू खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्टची अट
सुपरमार्ट नावाच्या ग्रोसरी स्टोअरमध्ये तुम्ही एक रुपयात डाळ, तांदूळ, साखर, रिफाइंड तेल आणि पीठ खरेदी करु शकता. मात्र यासाठी फ्लिपकार्टने एक अट ठेवली आहे. या वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 599 रुपयांची खरेदी करावी लागणार आहे. 599 रुपयांची खरेदी केल्यावर तुम्ही एक रुपयात कोणत्याही तीन वस्तू खरेदी करु शकता.
अॅक्सिस बँकच्या कार्डवर डिस्काऊंट
सेलमध्ये तुम्ही तुमच्या अॅक्सिस बँकच्या कार्डवर डिस्काऊंट ऑफर मिळवू शकता. जर तुम्ही ग्रोसरीचा पेमेंट अॅक्सिस बँकच्या कार्डद्वारे केला तर तुम्हाला 15 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे. मात्र हा डिस्काऊंट मिळवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1,500 रुपयांची खरेदी करावी लागणार आहे. ग्रोसरीची खरेदी तुम्ही फ्लिपकार्टच्या वेबसाईटवरुन किंवा अॅपवरुन करु शकतात.