Oily Skin Care Tips : हिवाळ्यात ‘अशी घ्या’ तेलकट त्वचेची काळजी, अशी मिळेल नैसर्गिक चमक!

हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. अशा वेळी तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो. यामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक मिळेल.

Oily Skin Care Tips : हिवाळ्यात 'अशी घ्या' तेलकट त्वचेची काळजी, अशी मिळेल नैसर्गिक चमक!
हिवाळ्यात तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी टिप्सImage Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 1:20 PM

नवी दिल्ली – हिवाळ्यात आर्द्रतेच्या कमतरतेमुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना (skin care problem) तोंड द्यावे लागते. या ऋतूत केवळ कोरड्या त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे नाही, तर तेलकट त्वचेची काळजी घेणेही (oily skin care) तितकेच महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्सही तुम्ही अवलंबू शकता. या टिप्स तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक (natural glow) आणण्यासाठी काम करतील. यामुळे तुमची त्वचा मुलायम होण्यास मदत होईल.

क्लींजिग

दिवसातून कमीतकमी 2 वेळा आपली त्वचा स्वच्छ केली पाहिजे. चेहरा धुण्यासाठी नेहमी सौम्य क्लीन्झर वापरावे. सौम्य क्लींजर त्वचेवर साचलेले अतिरिक्त तेल काढून टाकण्याचे काम करते. तसेच त्वचेच्या छिद्रांमध्ये साचलेली धूळ साफ होते. म्हणूनच तुमच्या किटमध्ये नेहमी क्लिंजर असले पाहिजेय

हे सुद्धा वाचा

टोनर

चेहरा धुतल्यानंतर टोनर आवर्जून वापरावे. टोनर हे त्वचेची पीएच पातळी राखण्याचे काम करते. यामुळे तुमची त्वचा फ्रेश दिसते. तसेच त्वचा चमकदार होण्यासही मदत होते. टोनर म्हणून तुम्ही गुलाबपाणी देखील वापरू शकता. त्वचेसाठी ते खूप फायदेशीर आहे. म्हणूनच चेहरा धुतल्यानंतर टोनरचा वापर करावा.

सनस्क्रीन

त्वचेसाठी तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता. सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच नव्हे तर सर्व ऋतूंमध्ये, हिवाळ्यातही सनस्क्रीन वापरले पाहिजे. सनस्क्रीन तुमच्या त्वचेला हानिकारक UV (Ultraviolet) किरणांपासून वाचवण्यास मदत करते. तसेच टॅनिंगपासूनही त्वचेचे संरक्षण करण्यास सनस्क्रीनमुळे मदत होते. सनस्क्रीन त्वचेचा टोन असंतुलित करत नाही.

मॉयश्चरायजर

त्वचेसाठी नेहमी मॉयश्चरायजरचा वापर करावा. तेलकट त्वचा असलेले लोक जेल-आधारित मॉयश्चरायजर वापरू शकतात. ते तुमच्या त्वचेला पोषण देण्याचे काम करते. मॉयश्चरायजरमुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. तेलकट त्वचा असलेले बरेच लोक मॉयश्चरायजर वापरत नाहीत. पण यामुळे तुमची त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसते.

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....