Nail Biting : तुम्हीही सतत नखं खाता का ? या 4 उपायांनी सोडवा ही वाईट सवय
जर तुम्हालाही नखं चावण्याची किंवा नखं खायची सवय असेल तर काही उपायांनी तुम्ही ही सवय सोडवू शकता.
नवी दिल्ली – नखं चावण्याची किंवा नखं खाण्याची (nail biting) सवय लहान मुलांपासून ते अनेक प्रौढ व्यक्तींमध्ये दिसून येते. मात्र असे केल्याने हातातील बॅक्टेरिया (bacteria) तोंडातून पोटात जातात आणि अनेक आजार (many diseases) उद्भवू शकतात. पण त्यासोबतच या सवयीमुळे आत्मविश्वासावरही वाईट परिणाम होतो. वारंवार नखं चावल्याने त्यांचा आकार बिघडतो तसेच ती खडबडीतही होतात. आपल्या सुंदर हातांचे रूपही खराब होते. कोणाशी हात मिळवतानाही लाज वाटू शकते. मात्र काही उपायांनी तुम्ही ही सवय सोडवू शकता.
कारण ओळखा
नखं चावण्यामागे काय कारण असू शकते? तुम्हालाही असाच वाटत असेल तर जाणून घ्या की या छोट्या आणि सामान्य दिसणाऱ्या सवयीमागे अनेक ट्रिगर दडलेले असू शकतात. उदाहरणार्थ, जेव्हा एखादी व्यक्ती खूप तणावात असते किंवा तिला चिंता वाटत असते तेव्हा प्रतिक्रिया म्हणून किंवा स्वतःला शांत करण्यासाठी नखे चावण्याची सवय लागू शकते. म्हमूनच एखादा णाणूस तणावात असताना हात-पाय सतत हलवताना किंवा नखं चावताना दिसू शकतो.
ही वाईट सवय सोडवण्याचे उपाय
नेल पॉलिश लावा
नखांवर नेलपॉलिश लावा. यामुळे तुमची सवय सुटेल. नखांचा लूक पाहून तुम्ही ती तोंडात घालणार नाही. दुसरं म्हणजे, नेलपॉलिशची चव कडू असते, त्यामुळे तुम्ही नखं चावणे टाळाल. जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्ही पारदर्शक नेलपॉलिश वापरू शकता.
नखं छोटी ठेवा
तुमची नखं लहान ठेवा आणि त्यांना नियमितपणे ट्रिम करा. नखं लहान ठेवल्याने तुम्ही ते चावण्यापासून रोखले जाल, कारण छोटी नखं अजून चावल्यास दुखापत होण्याचा धोका वाढतो. ही वेदना टाळणे कोणालाही आवडेल.
नेल एक्सटेंशन
नेल एक्सटेंशनसाठी वेगवेगळे मटेरिअल वापरले जाते. ते खूप कठीण असते आणि महागही. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा विचार करून तुम्ही नखं चावणं थांबवा. किंवा तुम्ही नेल आर्टही करू शकता. लांब नखांवर केलेली कलाकुसर बिघडवायला कोणाला आवडेल, त्यामुळेही तुम्ही नख खाणारं नाही.
हे उपायही करू शकता
– काही लोकांना फक्त एकाच बोटाची नखे चावण्याची सवय असते. अशा वेळी त्या बोटावर बँड-एड लावावे.
– जेव्हा जेव्हा नखे चावण्याची तीव्र इच्छा होईल तेव्हा तोंडात बबलगम टाका व ते चावत रहावे.
– मॅनिक्युअर केल्याने नखे स्वच्छ आणि ट्रिम राहतात. त्यामुळे हातांनाही स्वच्छ लुक येतो.
– तुमच्या आजूबाजूच्या लोकांची मदत घ्या आणि जेव्हा तुम्ही तुमचे नखे चावायला लागाल तेव्हा त्यांना थांबवायला सांगा.