Oily Skin Care Tips: थंडीत अशी घ्या तेलकट त्वचेची काळजी, मिळेल नैसर्गिक चमक
हिवाळ्यात त्वचेची खास काळजी घेणे महत्वाचे ठरते. अशा वेळी तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक टिप्स फॉलो करता येऊ शकतात. यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक येईल.
नवी दिल्ली – थंडीत आर्द्रतेच्या कमतरतेमुळे (moisture) त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या ऋतूत केवळ कोरड्या त्वचेची (dry skin) काळजी घेणे आवश्यक नाही तर तेलकट त्वचेचीही (oily skin) थंडीच्या दिवसात काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. हिवाळ्यात तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी याच्या काही टिप्स तुम्हीही फॉलो करू शकता. या टिप्स तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्याचे काम करतील. यामुळे तुमची त्वचा मुलायम होण्यास मदत होईल.
क्लीजिंग
आपली त्वचा दिवसातून कमीत कमी 2 वेळा स्वच्छ केली पाहिजे. चेहरा धुण्यासाठी माइल्ड क्लींजरचा आवर्जून वापर करा. त्वचेवर जमा झालेले अतिरिक्त तेल काढण्याचे काम माइल्ड क्लींजरद्वारे केले जाते. तसेच त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेले धुलीकणही स्वच्छ होतात. यामुळेच तुमच्या किटमध्ये क्लींजर नेहमी ठेवावा.
टोनर
चेहरा धुतल्यानंतर टोनर आवर्जून वापरावे. टोनर त्वचेची पीएच पातळी राखण्याचे काम करते. यामुळे तुमची त्वचा फ्रेश दिसते. तसेच तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होते. टोनर म्हणून तुम्ही गुलाबपाणी देखील वापरू शकता. त्वचेसाठी हे खूप फायदेशीर आहे. म्हणूनच चेहरा धुतल्यानंतर टोनर वापरावे.
सनस्क्रीन
त्वचेसाठी तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता. केवळ उन्हाळ्यातच सनस्क्रीन वापरणे आवश्यक नाही. हिवाळ्यातही तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता. सनस्क्रीनमुळे तुमच्या त्वचेचे हानिकारक यूव्ही (अतिनील) किरणांपासून संरक्षण होण्यास मदत होते. तसेच सनस्क्रीन हे तुमच्या त्वचेला टॅनिंगपासून वाचवण्याचे काम करते. सनस्क्रीन हे त्वचेचा टोन असंतुलित होऊ देत नाही.
मॉयश्चरायझर
त्वचेसाठी मॉयश्चरायझरचा वापर आवर्जून करावा. ज्यांची त्वचा तेलकट आहे ते जेल-आधारित मॉयश्चरायझर वापरू शकतात. ते तुमच्या त्वचेला पोषण देण्याचे काम करते. मॉयश्चरायझरमुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते. तेलकट त्वचा असलेले बरेच लोक मॉयश्चरायझर वापरत नाहीत. पण यामुळे तुमची त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसते.