मुंबईः तुम्हाला कधीही, कुठेही गाढ झोप लागू शकते का ? याचे उत्तर हो असेल तर तुम्हाला झोपून झोपून पैसे कमावण्याची चांगली संधी आहे. अमेरिकेतील एक कंपनी (American Company) अशा खूप झोपाळू लोकांच्या शोधात असून त्यांना नोकरी देण्यासही तयार आहे. काम एकच, कंपनीत कामावर यायचं आणि झोप काढायची. ‘कॅस्पर’ (Casper) या अमेरिकन मॅट्रेस कंपनीने या अनोख्या नोकरीची ऑफर आणली आहे. ज्या लोकांना कुठेही गाढ झोप लागू शकते, (company looking for candidates with ability of deep sleep) अशा व्यक्ती या नोकरीसाठी आदर्श उमेदवार ठरतील. तसेच कंपनीने या कामासाठीचा ड्रेसकोड ( गणवेश) एकदम वेगळा, कूल ठेवला आहे. पायजमा घालूनही तुम्ही या ठिकाणी कामाला येऊ शकता. न्यूयॉर्कमधील कॅस्पर या मॅट्रेस कंपनीची स्थापना 2014 साली होती. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर या नोकरीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
yup. it’s a real thing. apply to join our team of #CasperSleepers in the link here.https://t.co/LYp7jJblBd
(accepting until 8/11) pic.twitter.com/uZVVOHSr3g— Casper (@Casper) July 28, 2022
ज्या व्यक्ती या पदासाठी अर्ज करतील, त्यांच्यामध्ये झोप येण्याची असामान्य क्षमता असली पाहिजे, असा निकष यासाठी लावण्यात आला आहे. त्याशिवाय टिकटॉक व्हिडीओ बनवून ते कॅस्पर कंपनीच्या सोशल मीडिया चॅनेलवरही पोस्ट करावे लागतील. त्या व्हिडीओमध्ये उमेदवारांना कॅस्पच्या मॅट्रेसवर झोपण्याचा अनुभव कसा होता, हे शेअर करावे लागेल. ही नोकरी करण्यासाठी जे उमेदवार इच्छुक असतील ते 11 ऑगस्ट पर्यंत त्यांचा अर्ज दाखल करू शकतात. या संदर्भात त्यांनी ट्विटरवरील कंपनीच्या अधिकृत अकाऊंटवरही पोस्ट शेअर केली आहे.
कॅस्पर कंपनीच्या सांगण्यानुसार, या कामासाठी ज्या उमेदवारांची निवड करण्यात येईल ते कामावर येताना पायजमाही घालू शकतात. त्याशिवाय त्यांना कंपनीचे काही प्रॉडक्टसही मोफत वापरता येतील. विशेष म्हणजे ही नोकरी करणाऱ्यांना कामाच्या वेळेतही सवलत मिळेल. ज्या व्यक्ती स्वत:ला या नोकरीयोग्य समजतात, त्यांनी त्यांच्या ‘स्लीप स्किल’चा एक टिकटॉक व्हिडीओ बनवून अर्जासह शेअर करावा.
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी 11 ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे, उमेदवारांचे वयय 18 वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे. या नोकरीसाठी मुख्य योग्यता हीच, की उमेदवार कोणत्याही परिस्थितीमध्ये असामान्य रितीने झोप घेऊ शकला पाहिजे. न्यूयॉर्कमधील लोकांनी नोकरीसाठी अर्ज करणे अधिक चांगले ठरेल, मात्र इतर शहरातील लोकही अर्ज दाखल करू शकतात, असे कंपनीतर्फे नमूद करण्यात आले आहे.