Menstrual Cramps | मासिक पाळी दरम्यान का होतात वेदना? वेदनाशामक गोळ्यांनी होऊ शकते नुकसान!
काही स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान खूप वेदना होतात, तर काहींना अगदी सामान्य वेदना होतात. वेदनांची ही अवस्था स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अवलंबून असते.
मुंबई : काही स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान खूप वेदना होतात, तर काहींना अगदी सामान्य वेदना होतात. वेदनांची ही अवस्था स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अवलंबून असते. काही स्त्रिया या वेदनांमुळे इतक्या असह्य होतात की, त्या कमी करण्यासाठी त्यांना औषध खावे लागते. आपण देखील अशा वेदना कमी करण्यासाठी औषधं खात असाल, तर सर्वात आधी ते बंद करा (Causes and home remedies for Menstrual Cramps).
बहुतेक तज्ज्ञ पीरियड्स दरम्यान वेदनाशामक औषधे टाळण्याची शिफारस करतात. त्याऐवजी आपण वेदना कमी करण्यासाठी नैसर्गिक उपायांचा अवलंब करू शकता. काही वेळा एखाद्या आजारामुळे देखील असह्य वेदना होऊ शकतात. अशा परिस्थितीत, एखाद्या तज्ज्ञाला किंवा डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे.
का होतात वेदना ते जाणून घ्या..
पीरियड्स दरम्यान वेदनांचे मुख्य कारण स्त्रियांच्या शरीरात तयार होणारे प्रोस्टाग्लॅंडिन रसायन हे आहे. हे गर्भाशयाच्या स्नायूंमधील आकुंचन वाढवते. एखाद्या स्त्रीच्या शरीरात जितके जास्त प्रोस्टाग्लॅंडिन तयार होते तितकेच गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये आकुचन वाढते. जितके जास्त स्नायूंचे आकुंचन होते तितकाच स्त्रीला जास्त त्रास सहन करावा लागतो.
वेदनांची ‘ही’ देखील कारणे
स्त्रियांमधील वेदना काही वेळा काही समस्या किंवा विकारांमुळे देखील उद्भवू शकतात. जर फाइब्रॉयड्स, पेल्विक इंफ्लेमेटरी डिसिज किंवा एंडोमेट्रिओसिस सारखा एखादा आजार असेल, तर यामुळे देखील स्त्रीला असह्य वेदना होतात. या व्यतिरिक्त, अंडाशयामध्ये सिस्ट किंवा गर्भाशय ग्रीवा संकुचित होण्याने तीव्र वेदना होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणूनच, तीव्र वेदना होण्याच्या समस्येमध्ये औषधे घेण्याऐवजी एकदा तज्ज्ञाचा सल्ला घ्या (Causes and home remedies for Menstrual Cramps).
पेनकिलरमुळे होते मोठे नुकसान!
प्रत्येक पेनकिलरचा काहीना काही दुष्परिणाम होतो. आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या तज्ज्ञाच्या सल्ल्याने हे घ्यावे लागेल तर काही हरकत नाही, परंतु आपण प्रत्येक वेळी या वेदनेदरम्यान औषध घेतल्यास आपल्याला गॅस, हृदयाच्या ठोक्यात अनियमितता, उलट्या होणे किंवा मळमळ, छातीत घट्टपणा, चक्कर येणे, पोटात गोळा येणे आणि पोटात अल्सर यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
‘हे’ उपाय आहेत सुरक्षित
– मासिक पाळीदरम्यान वेदना कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग पोट गरम पाण्याच्या पिशवीने शेकणे, जेणेकरून स्नायूंचे आकुंचन कमी होईल.
– हळद दुधासह आपण गुळ, ओवा किंवा सुंठ मिसळून खाऊ शकता. यामुळे खूप विश्रांती मिळेल.
– दिवसभर शक्य असल्यास कोमट पाणी प्यावे. तसेच, ओवा पाण्यात उकळून दोन ते तीन वेळा चहासारखा प्या.
– काही स्त्रिया पाळी दरम्यान भूक लागत नाही किंवा अन्न पोटात जात नाही. यामुळे देखील वेदना आणि पोटातील वायू वाढतात. म्हणून, या काळात अन्न खा आणि शक्य असल्यास व्हिटामिन सी, ई आणि बी असलेला आहार घ्या.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Causes and home remedies for Menstrual Cramps)
हेही वाचा :
Depression | डिप्रेशनचे संकेत असू शकतात जीवनातील ‘हे’ बदल, जाणून घ्या नेमकं काय आहे नैराश्य?https://t.co/pmwbEedL3o#depression
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 22, 2020