रक्तदाब वाढणे आणि कमी होणे दोन्ही आहेत घातक! प्राणास मुकावे लागू शकते; जाणून घ्या, का होतो हा त्रास?
हाय ॲण्ड लो ब्लडप्रेशर (उच्च आणि कमी रक्तदाब) दोन्ही आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. सामान्यतः हायपरटेन्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उच्च रक्तदाबाबद्दल अधिक चर्चा केली जाते, परंतु तुम्हाला माहीत आहे का की, कमी रक्तदाब देखील तुम्हाला खूप गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतो. जाणून घ्या, का होतो कमी रक्तदाबाचा त्रास आणि त्याचे परिणाम.
उच्च आणि कमी रक्तदाब (High and low blood pressure) दोन्ही आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. सामान्यतः हायपरटेन्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उच्च रक्तदाबाबद्दल अधिक चर्चा केली जाते, परंतु तुम्हाला माहीत आहे का की, कमी रक्तदाब देखील तुम्हाला खूप गंभीर आरोग्य समस्या (Serious health problems ) निर्माण करू शकतो. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, कमी रक्तदाबाची समस्या काही परिस्थितीमध्ये प्राणघातकही ठरू शकते. हे शरीरात वाढणाऱ्या गंभीर स्थितीचे लक्षण म्हणूनही पाहिले जाऊ शकते. याबाबत सर्वांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. लो-ब्डप्रेशर च्या समस्येला सहज न घेता दखल घेणे चांगले. रक्तदाब 90/60 किंवा त्यापेक्षा कमी रीडिंग रक्तदाब किंवा हायपोटेन्शन म्हणून ओळखले जाते. ज्या लोकांना ही समस्या आहे त्यांना तीव्र थकवा आणि चक्कर (Fatigue and dizziness) येऊ शकतात. ही समस्या डिहायड्रेशन पासून गंभीर वैद्यकीय स्थितींपर्यंत असू शकते ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
डिहायड्रेशनमुळे रक्तदाब कमी होतो
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे कमी रक्तदाब ही सर्वात सामान्य समस्या आहे, ज्याला डिहायड्रेशन म्हणतात. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे, रक्ताचे प्रमाण कमी होते, परिणामी रक्तदाब कमी होऊ शकतो. ताप, उलट्या, जुलाब, लघवीचे प्रमाण वाढवणाऱ्या औषधांचा जास्त वापर आणि कठोर व्यायामामुळे डिहायड्रेशन(निर्जलीकरण) होऊ शकते. या कारणास्तव प्रत्येकाने दररोज 3-4 लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.
गंभीर संसर्ग किंवा ऍलर्जी
जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे गंभीर संसर्ग किंवा ऍलर्जीची समस्या असेल तर यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. काही लोकांमध्ये, या स्थितीत, रक्तदाब अचानक खूप खाली जातो, ज्यामुळे सेप्टिक शॉकचा धोका देखील असू शकतो. रक्तदाब कमी झाल्याच्या आधारावर आरोग्य तज्ञ शरीरातील संसर्गाच्या स्थितीचे निदान करतात. अशा परिस्थितीत त्वरित उपचार आवश्यक असतात.
हृदय रोगाची समस्या
उच्च किंवा कमी रक्तदाब दोन्ही तुमच्या हृदयाशी संबंधित समस्यांशी संबंधित आहेत. हृदयविकाराचा झटका, हृदय बंद होणे(हार्ट-फेल), हृदयाच्या झडपांचे आजार आणि हृदय गती कमी होणे (ब्रॅडीकार्डिया) देखील कमी रक्तदाब होऊ शकते. अशा सर्व परिस्थिती अत्यंत गंभीर आहेत आणि त्वरित वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे. तुम्हालाही कमी रक्तदाबाचा त्रास होत असेल, तर याबाबत तातडीने आरोग्य तज्ज्ञांशी संपर्क साधा.
रक्तदाब कमी झाल्यास काय करावे?
जर तुम्हालाही कमी रक्तदाबाची समस्या असेल तर त्यात मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो. मीठ वेगाने रक्तदाब वाढवू शकतो. तथापि, मिठाच्या सेवनासोबतच वेळोवेळी रक्तदाब तपासत राहा, कारण सोडियमच्या अतिरेकामुळे हृदयासाठी गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. मीठाव्यतिरिक्त, पाणी पिण्याने रक्तदाबाची स्थिती नियंत्रित ठेवण्यास देखील मदत होते. हे प्रारंभिक उपचार आहेत, त्यानंतर स्थितीचे योग्य निदान करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.