Celeb Trends | दीपिका ते अनुष्का, लग्नसराईत वधूंना सेलिब्रेटींच्या पेहरावाची भुरळ, पाहा ‘या’ लेहेंग्यांची खासियत…
फॅशन जगात बहुतेक वेळा सेलिब्रिटींच्या स्टाईल स्टेटमेंटला फॉलो केले जाते. यातही शाही लग्न सोहोळ्यातले या सेलेब्सचे ब्राइडल लेहेंगे आजही समस्त वधू वर्गात लोकप्रिय आहेत.
मुंबई : फॅशन जगात बहुतेक वेळा सेलिब्रिटींच्या स्टाईल स्टेटमेंटला फॉलो केले जाते. यातही शाही लग्न सोहोळ्यातले या सेलेब्सचे ब्राइडल लेहेंगे आजही समस्त वधू वर्गात लोकप्रिय आहेत. नुकतेच फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी याच्या इंस्टाग्राम पेजवर नव वधूंचे फोटो शेअर केले गेले आहे. ज्यात या वधूंनी दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा यांच्यासारखा लेहेंगा परिधान केलेला आहे. एकच नव्हे तर, अशा अनेक वधूंनी सेलिब्रिटींच्या या पारंपारिक पोशाखांची आणि त्यांच्या या लेहेंग्यांच्या फॅशन फॉलो केली आहे. या प्रत्येक लेहेंग्यांची स्वतःची अशी एक ‘खासियत’ आहे… (Celebrities wedding lehenga become brides favorite)
दुपट्ट्यामुळे दीपिका पदुकोणच्या लेहेंग्याला पहिली पसंती!
दीपिकाचा लेहेंगा तिच्या दुपट्ट्यामुळे खूप लोकप्रिय झाला होता. या लेहेंग्यावर गोटा पट्टीची डिझाईन आणि दबका भरतकाम केले होते. याशिवाय या दुपट्ट्यावर सोन्याच्या धाग्याने ‘सदा सौभाग्यवती भवः’ असे लिहिले होते. सिमरत बोपारा यांचा हा लेहेंगा दीपिकाच्या लेहेंगाच्या कॉपी होती. या शिवाय तिच्या या ड्रेसची ड्रेपिंग दीपिकाच्या ड्रेस प्रमाणेच होती.
अनुष्काचचा लेहेंगाही प्रसिद्ध
काही काळापूर्वी, एका वधूने तिच्या संगीत समारंभात अनुष्काच्या बोहो स्टाईल लेहेंग्याची निवड केली. हा लेहेंगा नारंगी, जांभळा आणि आईस ब्लू रंगात डिझाइन केला गेला होता. यावर रंगीबेरंगी धाग्यांचा वापर करून भरतकाम केले गेले. याशिवाय अनुष्काच्या लग्नाचा लेहेंगादेखील वधूंच्या शॉपिंग लिस्टवर अग्रणी आहे (Celebrities wedding lehenga become brides favorite).
आलियाचा लाईम ग्रीन लेहेंगा
सोनम कपूरला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये फॅशन आयकॉन म्हणून पाहिले जात असले तरी तिच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या वेळी सोनमच्या ड्रेसपेक्षा आलियाचा लाइमग्रीन लेहेंगा जास्त चर्चेत होता. अनेकांना तिचा हा लेहेंगा खूप आवडला. हा लेहेंगा ऑर्गेन्झा आणि रेशीमने बनलेला होता. यावर चांदीच्या धाग्याने भरत काम केले होते. अनेक लग्न सोहळ्यांमध्ये आलियाच्या या लेहेंग्याची कॉपी करण्यात आली होती (Celebrities wedding lehenga become brides favorite).
Ekta Kapoor : ‘डेलीसोप क्वीन’ लग्नबंधनात अडकणार? एकता कपूरच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चा! https://t.co/ttBVfM2ti7@ektarkapoor #EktaKapoor #instagramposts
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 16, 2020