Train Time Table | अमरावती-तिरुपती उत्सव विशेष गाडीला मुदतवाढ, मुंबई-गुवाहाटी/कामाख्या विशेष गाडी

| Updated on: Dec 16, 2020 | 3:25 PM

प्रवाशांच्या सुविधेकरिता मध्य रेल्वे अमरावती-तिरुपती द्वी-साप्ताहिक उत्सव विशेष गाडी आणि मुंबई ते कामाख्या/गुवाहाटी दरम्यान विशेष गाड्या चालवीत आहेत.

Train Time Table |  अमरावती-तिरुपती उत्सव विशेष गाडीला मुदतवाढ, मुंबई-गुवाहाटी/कामाख्या विशेष गाडी
Follow us on

मुंबई : प्रवाशांच्या सुविधेकरिता मध्य रेल्वे अमरावती-तिरुपती द्वी-साप्ताहिक उत्सव विशेष गाडी (Central Railway Festival Special Train) आणि मुंबई ते कामाख्या/गुवाहाटी दरम्यान विशेष गाड्या चालवीत आहेत. मध्य रेल्वेने अमरावती-तिरुपती द्वि-साप्ताहिक उत्सव विशेष गाडीला 18 जानेवारी 2021 पर्यंतची वाढ देण्यात आली आहे. सुरुवातीला या गाडीला 29 डिसेंबर 2020 पर्यंतची देण्यात आली होती (Central Railway Festival Special Train).

या विशेष गाड्यांमध्ये ज्यांचं आरक्षण कन्फर्म असेल फक्त त्यांनाच प्रवासाची परवानगी असेल. तसेच, प्रवाशांनी बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्य स्थानावर पोहोचल्या दरम्यान कोव्हिड-19 संबंधी सर्व नियमांचं पालन करणे अनिवार्य असेल.

विशेष गाड्यांचं वेळापत्रक

02765 – तिरुपती-अमरावती द्वी-साप्ताहिक उत्सव विशेष गाडी : ही गाडी दिनांक 02.01.2021 ते 16.01.2021 पर्यंत प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी तिरुपती येथून दुपारी 15.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 15.10 वाजता अमरावती येथे पोहोचेल.

02766 – अमरावती-तिरुपती द्वी-साप्ताहिक उत्सव विशेष गाडी : ही गाडी दिनांक 04.01.2021 ते 18.01.2021 पर्यंत प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी अमरावती येथून सकाळी 06.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 06.25 वाजता तिरुपती येथे पोहोचेल.

थांबा : बडनेरा, अकोला, वाशिम, हिंगोली, बसमत, पूर्णा, हजूर साहिब नांदेड, मुदखेड, धर्माबाद, निजामबाद, कामारेड्डी, काचीगुडा, महबूबनगर, गडवाल, कुरनूल सिटी, धोने, अनंतपुर, धर्मवरम, कदीरी, मदनपल्ली रोड पिलेर आणि पकाला

संरचना : एक एसी 2-टीअर, 2 एसी 3-टीअर, 8 स्लीपर क्लास, 6 सेकंड क्लास सीटिंग

Central Railway Festival Special Train

मुंबई-गुवाहाटी/कामाख्या विशेष गाडी

02256 – कामाख्या-मुंबई सुपरफास्ट विशेष (साप्ताहिक) : ही गाडी दिनांक 26.12.2020 पासून दर शनिवारी कामाख्या येथून सायंकाळी 18.00 वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसर्‍या दिवशी रात्री 21.30 वाजता पोहोचेल.

02255 – मुंबई-कामाख्या सुपरफास्ट विशेष (साप्ताहिक) : ही गाडी 29.12.2020 पासून दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 13.15 वाजता सुटेल आणि कामाख्याला तिसर्‍या दिवशी 15.25 वाजता पोहोचेल.

थांबा : कल्याण, मनमाड जंक्शन, भुसावळ जंक्शन, अकोला जंक्शन, नागपूर, गोंदिया, रायपूर, बिलासपूर, रायगढ, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खडगपूर, डानकुनी, बर्धमान, बोलपूर शांतीनिकेतन, रामपुरहाट, पाकूर, मालदा टाउन, न्यू जलपाईगुडी, सिलीगुड़ी जं., हसीमारा, अलीपूर द्वार , न्यू बोंगाईगाव.

05648 – गुवाहाटी-मुंबई विशेष (साप्ताहिक) : ही गाडी दिनांक 22.12.2020 पासून दर मंगळवारी गुवाहाटी येथून 15.00 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसर्‍या दिवशी 17.50 वाजता पोहोचेल.

05647 – मुंबई-गुवाहाटी विशेष (साप्ताहिक) : ही गाडी दिनांक 25.12.2020 पासून दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 8.05 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी सकाळी 13.00 वाजता गुवाहाटीला पोहोचेल.

थांबा : ठाणे (केवळ 05648 साठी), कल्याण, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, भुसावळ जंक्शन, बुरहानपूर, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाल उपाध्याय जं., दिलदार नगर जंक्शन, बक्सर, डुमरांव, आरा, दानापूर, पाटणा जंक्शन, पटना साहिब, फतुहा, खुसरोपूर, बख्तियारपुर जंक्शन., बाढ, मोकामा, हाथीदा जं., लक्खीसराय जंक्शन, किऊल जंक्शन, जमालपूर. जं., बरियारपुर, सुलतानगंज, भागलपूर, कहलगाव, साहिबगंज जंक्शन, बडहरवा जंक्शन, न्यू फरक्का जंक्शन, मालदा टाउन, किशनगंज, न्यू जलपाईगुडी, धुपगुरी, न्यू कूचबिहार, न्यू अलीपुर द्वार, न्यू बोंगागांव, बारपेटा रोड, रंगिया जं. कामाख्या जं.

Central Railway Festival Special Train

संबंधित बातम्या :

मुंबई-पुण्यातून रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांनी लक्ष द्या, 12 आणि 13 डिसेंबरला या गाड्यांच्या फेऱ्या रद्द

Indian Railway | रेल्वेच्या डब्यांवरील क्रमांकाचा नेमका अर्थ काय? कोचबद्दल खूप काही माहिती देतील ‘हे’ आकडे…