Chanakya niti : पार्टनरला खूष ठेवायचं असेल तर उंटाच्या या सवयी हव्यात…
आचार्य चाणक्य यांचे नितीशास्र आजही लागू पडते आचार्य चाणक्यांच्या मते जीवनात आपल्या पार्टनरला खूष ठेवायचे असेल तर पाच गुण आपल्यात असायलाच हवेत. त्यामुळे मनुष्याला जीवनात यश मिळेल.
आचार्य चाणक्यांनी आर्थिक आणि परराष्ट्र धोरणाविषयी आणि राजकीय तसेच कौटुंबिक जीवनाविषयी देखील आपले विचार मांडले आहेत. आचार्य चाणक्यांनी भूतकाळात जे सांगितले त्याचा वापर आजही समाजाला होतो आहे. चाणक्य नितीमध्ये आर्थिक संबंधा सोबत मानवी नातेसंबंधाबद्दल देखील भाष्य केले आहे. आपल्या पार्टनरला खूश ठेवण्यासाठी आपल्याकडे पाच गुण असायलाच हवेत.
जर कोणताही पुरुष उंटाकडील पाच गुण आत्मसात करेल तर त्याची नक्कीच प्रगती होईल असे म्हटले जात आहे. हे उंट प्राण्याचे पाच गुण ज्याकडे असतील त्याची पत्नी किंवा पार्टनर त्याच्यावर नक्कीच फीदा होईल, असे गुण असणारे पुरुष महिलांना आवडतात. आणि पहिल्या प्रयत्नातच आपण आपल्या पार्टनरला खूश करण्यात यशस्वी होऊ असे चाणक्यांनी म्हटले आहे.
1.आचार्य चाणक्य यांच्या मते मनुष्याला मेहनत करावीच लागेल. कठोर मेहनतीनेच पैसा मिळतो. आपण आर्थिक सक्षम असल्याशिवाय आपल्या कौटुंबिक इच्छा पूर्ण करु शकणार नाही.कष्ठ करण्याची तयारी असणार माणूसच जीवनात यशस्वी होतो.
2.आचार्य चाणक्यांच्या मते उंट हा प्राणी झोपतानाही सावध झोपतो.त्याच प्रकारे मनुष्याला कुटुंब आणि कर्तव्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.त्यांना नेहमीच जागृत राहावे लागणार आहे.कुटुंबाची सुरक्षा संपूर्णपणे पुरुषावर असते. त्यामुळे कौटुंबिक सदस्यांची काळजी घेणार्या पुरुषावर पत्नी खूष असते.
3.एक म्हण आहे की उंटाच्या ईमानदारीवर संशय करु नये. उंट कायम आपल्या मालकांबद्दल प्रामाणिक असतो. तशाच प्रकारे पुरुष देखील आपल्या पत्नीच्या प्रति इमानदार असायला हवा. त्याने पत्नी शिवाय अन्य कुठल्याही स्रीशी अनैतिक संबंध ठेवून धोका द्यायला नको.इमानदार पतीमुळे जीवनसाथी नेहमीच आनंदी राहाते
4.उंट एक बहादूर आणि हुशार प्राणी आहे. पुरुषांमध्ये देखील आव्हानाचा सामना करण्याची ताकद असायला हवी. आचार्य चाणक्याच्या मते मनुष्याला त्याच्या पत्नी आणि मुलांची रक्षा करण्यासाठी त्याच्याकडे शौर्याचा गुण असायला हवा.
5.चाणक्य यांच्या नितीशास्रानूसार पुरुषाने आपल्या पत्नीला हरप्रकारे खूश ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा.एक महिला आपल्या पार्टनर बरोबर शारीरिक आणि मानसिक रुपाने संतुष्ट राहायला हवी,ही त्या पुरुषाची पहीली जबाबदारी आहे. ज्याच्या जवळ लाईफ पार्टनर आहे त्याने आपल्या पार्टनरसाठी वेळ काढायला हवा, हा गुण त्याच्याकडे असायलाच हवा.तर जीवनसाथी खूष राहील.