New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर…

| Updated on: Dec 27, 2023 | 2:13 PM

नवीन वर्षानिमित्त लोक त्यांच्या जीवनात बदल करण्यासाठी अनेक संकल्प  ठरवतात. अशा परिस्थितीत आज अशा काही सवयींबद्दल जाणून घेऊ, ज्या तुम्हाला नवीन वर्षात निरोगी राहण्यास मदत करतील.

New year | नव्या वर्षात अंगी बाणवा या सवयी, आजार पळतील दूर...
Follow us on

New year habits | येत्या काही दिवसांतच नवीन वर्षाची सुरूवात होईल. 2024 हे नवीन वर्ष सुरू व्हायला आता जेमतेम काहीच दिवस उरलेत. नवीन वर्ष प्रत्येकासाठी आशेचा किरण घेऊन येत असतं. नवीन वर्षानिमित्त लोक त्यांच्या जीवनात बदल करण्यासाठी अनेक संकल्प  ठरवतात. अशा परिस्थितीत आज अशा काही सवयींबद्दल जाणून घेऊ, ज्या तुम्हाला नवीन वर्षात निरोगी राहण्यास मदत करतील. येत्या वर्षभरात तुम्हालाही निरोगी राहण्यासाठी तुमच्या काही सवयी बदलायच्या असतील, तर हे नक्की वाचा. चला जाणून घेऊया कोणत्या सवयी बदलून तुम्ही निरोगी राहू शकता.

वेळेवर झोपणे

आजकाल लोकांच्या झोपण्याच्या आणि खाण्याच्या वेळा पूर्णपणे बदलल्या आहेत. बरेच लोकं रात्री उशिरा जेवतात आणि झोपायला बराच उशीर होतो. अशा स्थितीत हे देखील आजारांचे मोठे कारण बनू शकते. त्यामुळे सर्वप्रथम सर्व कामे वेळेवर करण्याची सवय लावा. लवकर जेवा आणि लवकर झोपा. कमीत कमी 8 तासांची झोप घ्या.

स्ट्रेस मॅनेज करा

आजच्या काळात, प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कारणाने चिंतित किंवा स्ट्रेसमध्ये असतो. पण काही लोकांना जास्तच काळजी करण्याची सवय असते. त्यामुळे मानसिक आरोग्याच्या समस् निर्माण होऊ शकतात. म्हणून, तुमचा स्ट्रेस व्यवस्थापित करण्यासाठी, तुम्ही ध्यान आणि माइंडफुलनेस यासारख्या स्ट्रेस मॅनेजमेंट तंत्रांचा अवलंब केला पाहिजे.

व्यायाम करणे फायदेशीर

शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी शरीर सक्रिय ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी रोज व्यायाम करण्याची सवय लावावी. यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक, व्यायाम, योग किंवा डान्स क्लास यासारखे उपक्रम करू शकता. व्यायामाने शरीरा आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहते.

खाण्या-पिण्याच्या चांगल्या सवयी

आजकाल लहान मुले असो वा तरुण, जंक फूड आणि पॅक फूड खाणे सर्वांनाच आवडते. पण ते आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरू शकते. त्यामुळे या नवीन वर्षापासून घरचे बनवलेले अन्न आणि सकस अन्न खाण्याची सवय लावा.

वाचन करणे

वाचन हा सगळ्यात उत्तम छंद आहे. दिवसातला काही वेळ चांगलं काही वाचण्यात घालवावा. त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. यासोबतच तुमचे विचार आणि तुमचे पुढील दिवसाचे वेळापत्रक डायरीत लिहीण्याची सवय लावावी. या चांगल्या सवयींमुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.