एक रुपयात चिक्कीपण येत नाही, अख्खा दरवाजा स्वच्छ करा; काय आहे आयडिया?

| Updated on: Jan 15, 2024 | 6:51 PM

आपण घर घेतो. घर सजवतो. घर घेतल्यावर चांगला भारीवाला दरवाजाही लावतो. आधीच डोअर असतो. पण एक सेफ्टी डोअरही लावतो. दरवाजा घेताना त्याच्यावरील डिझाईन, कलर हे निवडण्यात बराच वेळ घालवतो आणि एकदाचा दरवाजा घेतो. पण दरवाजा घेतल्यानंतर त्याच्याकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष करत असतो. दरवाजा स्वच्छ ठेवत नाही. मग दरवाजा घाण होतो. त्यामुळे आपण परत नवा दरवाजा घेण्याचा विचार करू लागतो.

एक रुपयात चिक्कीपण येत नाही, अख्खा दरवाजा स्वच्छ करा; काय आहे आयडिया?
cleaning-a-door
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई | 15 जानेवारी 2024 : आपण आपल्या घरासाठी अनेक प्रकारच्या गोष्टींचा वापर करत असतो. घरातील अनेक वस्तू साफ करण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टी वापरतो. पण तरीही त्या वस्तू स्वच्छ होत नाही. आता घराचे दरवाजेच पाहा. किती तरी वेळा घराचे दरवाजे स्वच्छ ठेवले जातात. दरवाजे साफ करण्यासाठी बराच वेळ खर्ची पडतो. पण मनाजोगते दरवाजे स्वच्छ होतच नाहीत. त्यामुळे एक तर मेहनत वाया जाते आणि पदरी निराशा येते. याचा सर्वाधिक त्रास गृहिणींना होतो.

तुम्ही दरवाजा साफ केला तरी तो लगेच घाणही होतो. त्यामुळे तुमची ही अडचण समजून आम्ही तुम्हाला एक युक्ती सांगणार आहोत. फक्त एक रुपयात दरवाजा कसा स्वच्छ करायचा हे सांगणार आहोत. एक रुपयात चिक्कीही येत नाही. तुमचा अख्खा दरवाजा साफ होईल. इतकी भारी ही आयडिया आहे. घराचा दरवाजा साफ करण्यासाठी महागडे प्रोडक्ट खरेदी करण्यापेक्षा तुम्ही एक रुपयाचा शॅम्पू खरेदी करा. शॅम्पू केसांसहीत घराच्या दरवाजाचीही स्वच्छता करतो. कदाचित अनेकांना ही गोष्ट माहीत नसेल. पण ही गोष्ट खरी आहे.

ही ट्रीक वापरा अन्

फक्त एक रुपयात दरवाजा स्वच्छ करायचा असेलत र तुम्हाला आधी पाणी उकळावं लागेल. त्यात हा एक रुपयांचा शॅम्पू टाका. त्यानंतर एक मोठा चमचा व्हिनेगर आणि बेकिंग सोडाही त्यात टाका. त्यानंतर एक सॉक्स घ्या. तो या मिश्रणात भिजवा आणि त्याने दरवाजा पुसून काढा. अशा प्रकारे दरवाजा स्वच्छ केल्यावर तो पुन्हा कधीच खराब होणार नाही. नेहमीच नव्या दरवाज्यासारखा तो चमकत राहील.

या वस्तूने दरवाजा स्वच्छ नको

तुम्ही दरवाजा स्वच्छ कसा करायचा हे शिकला आहात. आता कोणत्या गोष्टींनी दरवाजा स्वच्छ करू नये याचीही माहिती जाणून घ्या. कधीही लोखंडाच्या स्क्रबने दरवाजा स्वच्छ करू नका. नाही तर दरवाजावरची डिझाईन पुसली जाते. शिवाय दरवाजा खडबडीत होतो आणि दिसायलाही विद्रूप दिसतो. तसेच दरवाज्यावर खुणा पडतात आणि कलरही निघून जातो.