Digital Eyestrain | ऑनलाईन अभ्यासामुळे डोळ्यांवर ताण, मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्या वाढल्या!
डोळे लाल होणे, डोळ्यांनी अस्पष्ट दिसणे, नजर कमजोर होणे यासारख्या समस्या देखील वाढल्या आहेत. यालाच वैद्यकीय भाषेत ‘डिजिटल आयस्ट्रेन’ (Digital Eyestrain) म्हणतात.
मुंबई : कोरोना विषाणू संसर्गामुळे मुलांचे शालेय वर्ग आता ‘डिजिटल’ (Online Classes) झाले आहेत. त्यामुळे त्यांचा बहुतेक वेळ आता संगणक, मोबाईल किंवा टॅब्लेटच्या समोर जातो. यामुळे डोळ्यांवर ताण पडत आहे. डोळे लाल होणे, डोळ्यांनी अस्पष्ट दिसणे, नजर कमजोर होणे यासारख्या समस्या देखील वाढल्या आहेत. यालाच वैद्यकीय भाषेत ‘डिजिटल आयस्ट्रेन’ (Digital Eyestrain) म्हणतात. ‘डिजिटल आय स्ट्रेन’ कसा ओळखावा आणि कसा टाळावा हे याबाबत जागरूक असणे गरजेचे आहे (Childrens Facing Digital Eyestrain due to Online classes).
डिजिटल उपकरणे योग्य प्रकारे हाताळली जात नसल्याने डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत. जसे की, स्क्रीनकडे सतत पाहणे, मोबाईल अथवा टॅब्लेट चुकीच्या पद्धतीने पकडणे यामुळे उपकरणांतून निघणारा प्रकाश थेट डोळ्यात जातो. संगणकातून निघणारा निळा प्रकाश डोळ्यांसाठी हानिकारक असतो.
‘डिजिटल आयस्ट्रेन’विषयी डॉक्टर सांगतात…
शार्प साइट ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या वरिष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. शीतल किशनपुरिया यांच्या मते, पालकांनी मुलांच्या डिजिटल उपकरणांच्या वापरावर लक्ष ठेवले पाहिजे. ‘डिजिटल आयस्ट्रेन’नुसार डोळे दुखणे, चुरचुरणे,पाठ- मान-डोके दुखणे यासारख्या समस्या दिसत असल्यास त्यावर लक्षात ठेवले पाहिजे. लहान मुलांचे डोळे पूर्णपणे विकसित झालेले नसतात, त्यामुळे ते लवकर ‘मायोपिया’ला बळी पडू शकतात. (Childrens Facing Digital Eyestrain due to Online classes)
‘डिजिटल आयस्ट्रेन’ची लक्षणे
‘डिजिटल आयस्ट्रेन’च्या (Digital Eyestrain) लक्षणांमध्ये सुरुवातीला डोळ्यांवर ताण पडून ते चुरचुरायला लागतात. डोळ्यांत पाणी येते, डोळे दुखतात, डोळ्यांना अस्पष्ट दिसू लागते. यासह, डोकेदुखी आणि तणाव देखील वाढायला लागतो. यामुळे कधीकधी चिडचिडेपणा देखील येतो. ‘डिजिटल आयस्ट्रेन’मध्ये सुरुवातीला या समस्या कमी जाणवतात. परंतु, पुढे त्या वाढत जातात आणि पाठदुखी, मान दुखी आणि झोपेच्या समस्यादेखील उद्भवू शकतात.
‘डिजिटल आयस्ट्रेन’ टाळण्याचे उपाय
‘डिजिटल आयस्ट्रेन’ (Digital Eyestrain) टाळण्यासाठी अथवा त्यावरील उपचारांबाद्द्ल सांगताना नेत्रतज्ज्ञ डॉ. शीतल किशनपुरीया म्हणतात की, लहान मुलांना शक्यतो डिजिटल स्क्रीनपासून दूर ठेवले पाहिजे. तर, मध्यमवयीन मुलांना एका तासासाठीच डिजिटल उपकरणांचा वापर करू द्यावा. मुलांसह मोठ्यांनीही डिजिटल उपकरणे वापरताना योग्य प्रकारे बसले पाहिजे. झोपून मोबाईल अथवा टॅब्लेट वापरू नये. संगणक अथवा लॅपटॉपसमोर बसताना शक्यतो खुर्ची, टेबल वापरावे.
याव्यतिरिक्त स्क्रीन आणि आपल्या डोळ्यांमध्ये किमान एक हात म्हणजे 20 इंच अंतर ठेवले पाहिजे. स्क्रीन ब्राईटनेस नेहमी कमी ठेवावा. 20-20चा नियमही पाळावा. या नियमानुसार दर 20 मिनिटांनी ब्रेक घ्यावा, स्क्रीनच्या उजेडापासून बाजूला होत डोळे बंद करावेत. याशिवाय फाँटचा आकार वाढविणे, वारंवार डोळे मिचकावणे, अँटी-ग्लेअर चष्मा वापरणेदेखील फायदेशीर ठरते.
(Childrens Facing Digital Eyestrain due to Online classes)
संबंधित बातम्या :
World Heart Day 2020 | ‘या’ पाच गोष्टी ठेवतील तुमच्या हृदयाला निरोगी!
Depression | नैराश्य म्हणजे नेमकं काय? नैराश्याने आत्महत्येचा विचार का येतो?