Chocolate Day 2021 | बॉलिवूडकर म्हणतात ‘चॉकलेटसाठी काहीही…’, फिटनेसच्या बाबतीतही तडजोडीला तयार!

| Updated on: Feb 08, 2021 | 2:42 PM

‘व्हॅलेंटाईन वीक’मध्ये उद्या अर्थात 9 फेब्रुवारी रोजी ‘चॉकलेट डे’ (Chocolate day 2021) आहे. प्रेमाची सुरूवात काहीतरी गोड खाऊन व्हावी आणि यासाठी चॉकलेटपेक्षा अधिक चांगले काय असू शकते...

Chocolate Day 2021 | बॉलिवूडकर म्हणतात ‘चॉकलेटसाठी काहीही...’, फिटनेसच्या बाबतीतही तडजोडीला तयार!
चॉकलेट डे
Follow us on

मुंबई :व्हॅलेंटाईन वीक’मध्ये उद्या अर्थात 9 फेब्रुवारी रोजी ‘चॉकलेट डे’ (Chocolate day 2021) आहे. प्रेमाची सुरूवात काहीतरी गोड खाऊन व्हावी आणि यासाठी चॉकलेटपेक्षा अधिक चांगले काय असू शकते… या दिवशी तुम्ही चॉकलेट देऊन आपल्या प्रेमात अधिक गोडवा आणू शकता. चॉकलेट ही एक गोष्ट आहे जी प्रत्येकाला आवडते. फिटनेस फ्रीक असलेल्या बर्‍याच सेलेब्सनाही त्यांच्या चॉकलेट खाण्याच्या सवयीमुळे फिटनेसशी तडजोड करावी लागते (Chocolate Day 2021 Special fitness freak Bollywood celebs who love to eat chocolate).

आज आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत जे चॉकलेट खाण्यासाठी काहीही करू शकतात. बऱ्याच सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर चॉकलेटबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे. या यादीमध्ये दीपिका, करिना आणि रणवीर सिंह यांच्यासारख्या फिटनेस फ्रीक कलाकारांचादेखील समावेश आहे.

दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोणला डार्क चॉकलेट खाणे खूप आवडते. तिने अनेकदा सोशल मीडियावरुन चॉकलेटवरचे प्रेम व्यक्त केले आहे. दीपिकाने एकदा सांगितले होते की, तिला हॉट चॉकलेट खूप आवडते. दीपिका अनेकदा चॉकलेटचे फोटो शेअर करत असते.

करिना कपूर खान

बेबो बॉलिवूडमधील सर्वात तंदुरुस्त अभिनेत्री आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती बरीच कठोर कसरत करत असते, पण चॉकलेट पाहून तिला स्वत:वर नियंत्रण ठेवता येत नाही. लॉकडाऊनमध्येही करिनाने चॉकलेट केकचा खूप आनंद लुटला. अनेक वेळा करिश्मानेही करिनासाठी केक्स पाठवले होते.

रणवीर सिंह

पत्नी दीपिकाप्रमाणेच पती रणवीर सिंहही चॉकलेटचा चाहता आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, चॉकलेटसाठी तो काहीही करू शकतो. त्याच्या फिटनेस प्रशिक्षकांनाही रणवीरची ही सवय मोडता आलेली नाही (Chocolate Day 2021 Special fitness freak Bollywood celebs who love to eat chocolate).

सोनम कपूर

सोनम कपूर एक हार्डकोर चॉकलेट प्रेमी आहे, याचा पुरावा म्हणजे ती स्वत: स्वतःसाठी भरपूर चॉकलेट चिप्सच्या कुकीज बनवत असते. सोनमला संधी मिळताच ती चॉकलेट खायला सुरु करते.

आलिया भट्ट

आलिया भट्ट देखील चॉकलेट प्रेमी आहे. तिचा फिटनेस बघून तुम्ही असा अंदाज लावू शकत नाही की, ती खूप चॉकलेट खाते. एवढेच नव्हे तर नुकत्याच एका मुलाखतीत चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना आलिया म्हणाली की, तिला बटाटे आणि चॉकलेट खायला खूप आवडते.

डायना पेंटी

अभिनेत्री डायना पेंटीला सर्व प्रकारचे चॉकलेट खायला आवडतात. तिला चॉकलेट तसेच चॉकलेट ड्रिंक्स देखील आवडतात. डायनाचे चॉकलेटवरचे प्रेम तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही पाहायला मिळते. डायनाने अनेक वेळा चॉकलेट खातानाचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

(Chocolate Day 2021 Special fitness freak Bollywood celebs who love to eat chocolate)

हेही वाचा :