Coffee Hair Mask | मजबूत आणि मुलायम केस हवेत? वापरा ‘कॉफी हेअर मास्क’
चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारी उत्तेजक द्रव्य रक्त परिसंचरण वाढवतात आणि केसांच्या फॉलिसेल्सला बूस्ट करतात.
मुंबई : आपले केस खूप दाट आणि लांब सडक असावेत, अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. जर, आपले केस लांब आणि दाट असतील, तर आपल्या सौंदर्यामध्ये आणखी भर पडते. केस सुंदर आणि मजबूत होण्यासाठी महिला हेअर स्पा, हेअर मास्क आणि केसांच्या आणखी काही उपचार पद्धतींचा वापर करतात. परंतु, या केमिकलयुक्त या सर्व घटकांचा आपल्या केसांवर दुष्परिणाम देखील होतो (Coffee Hair Mask For thick and shiny hair).
या सर्वांमुळे आपले केस खूप कमकुवत होऊ लागतात. काही दिवसांत केस निर्जीव दिसून तुटण्यास सुरुवात होतात. जर, तुम्ही अशा समस्या टाळू इच्छित असाल तर, घरगुती ‘कॉफी हेअर मास्क’ आपल्या केसांच्या मजबुतीसाठी एक चांगला पर्याय आहे. कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात कॅफिन असते, जे केसांना मजबूत देऊन, केस लांब आणि जाड बनवण्यात खूप प्रभावी ठरते.
चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारी उत्तेजक द्रव्य रक्त परिसंचरण वाढवतात आणि केसांच्या फॉलिसेल्सला बूस्ट करतात, ज्यामुळे आपले केस वेगाने वाढू लागतात. कॉफी हेअर मास्कचा नियमित वापर केल्याने केसांच्या कोशिका मजबूत होतात. तसेच केस मऊ, लांब आणि दाट होतात. आपण नियमित कॉफी हेअर मास्क वापरू शकत नसाल, तर आठवड्यातून किमान दोन वेळा तरी याचा उपयोग केला पाहिजे.
कॉफीच हेअर मास्क तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :
– 2 चमचे ग्राऊंड कॉफी
– 1 कप पाणी
(Coffee Hair Mask For thick and shiny hair)
कसा वापराल हा कॉफी हेअर मास्क?
– केसांवर हेअर मास्क लावण्यासाठी सर्व प्रथम ग्राऊंड कॉफीपासून, एक ते दीड कप कडक कॉफी बनवा आणि काही वेळ ती थंड होऊ द्या.
– केसांवर कॉफी मास्क लावण्यापूर्वी शॅम्पूने धुवून केस व्यवस्थित कोरडे करून घ्या.
– त्यानंतर कॉफीचे थंड झालेले मिश्रण टाळूपासून केसांपर्यंत व्यवस्थित लावा.
– जेव्हा कॉफी केसांमध्ये पूर्णपणे शोषली जाईल, तेव्हा केसांना 5 मिनिटांसाठी मसाज करा आणि शॉवर कॅपने केस काही वेळासाठी झाकून ठेवा.
– कॉफी केसांवर अर्धा तासांपर्यंत राहू द्या. अर्ध्या तासानंतर केस पुन्हा स्वच्छ धुवा.
(टीप : कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टर किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
(Coffee Hair Mask For thick and shiny hair)
हेही वाचा :
Hair Care | कृत्रिम हेअर कलरमुळे होईल केसांचे नुकसान, ट्राय करा ‘हा’ नैसर्गिक हेअर मास्क!#HairCare | #NaturalHairColour | #HairCareTips https://t.co/8ldfBB1pFs
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 4, 2021