मुंबई : कोरोना व्हायरसच्या काळात लोकांच्या जीवनशैलीत खूपबदल झालेले आपल्या लक्षात येईल. खाणे, पिणे देखील बदलले आहे. लोक आता जागरूक झाले आहेत, आणि कोरोनापासून दुर राहण्यासाठी लोक मास्कचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. कोरोनापासून दूर राहायचे असेलतर मास्क सर्वात उत्तम पर्याय आहे. परंतु यामध्ये आपल्याला एक गोष्ट माहित असणे आवश्यक आहे. ती म्हणजे चांगल्या प्रतीचा मास्क 70% पर्यंत संक्रमणाचा धोका कमी करतो. आज बाजारात बरेच प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत, जे लोक वापरत आहेत. (Consistent use of the same mask can cause side effects)
नुकत्याच झालेल्या संशोधनात असे आढळले आहे की, एकच मास्क तुम्ही सारखा वापर असाल तर ते अतिशय धोकादायक आहे. जेव्हा आपण तोच मास्क पुन्हा पुन्हा वापरतो तेव्हा तो सैल होतो. संशोधकांनी सांगितले की, आपण जेव्हा बाहेर फिरतो त्यावेळी घामामुळे तो मास्क खराब होता. पुन्हा पुन्हा तो मास्क वापर असतोल तर त्याचे फॅब्रिक कसे आहे ते तपासून पहा. सतत एकच मास्क घातल्यास ते खराब होऊ शकते. आणि त्यांची गुणवत्ता कमी होते.
आपण पुन्हा डिस्पोजेबल मास्क वापरत असल्यास, हे करू नका. म्हणून नेहमी नवीन मास्क वापरणे कधीही चांगले आहे. अधिक प्रवास करणारे आणि वैद्यकीय संस्थांमध्ये काम करणार्या लोकांनी सतत मास्क बदलला पाहिजे. आपल्या आरोग्याबद्दल खरोखर काळजी असल्यास आपण जवळ शक्यतो जास्त मास्कसोबत ठेवावे. मास्क जर धुतल्यामुळे लुज पडला असेलतर शक्यतो असा मास्क वापरू नये.
शालिमार बागच्या मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही टायफॉईडशी संबंधित प्रकरणांमध्ये सुमारे 50 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. तर, इंटरनल मेडिसिन सल्लागार डॉ. पारुल कक्कर यांनी सांगितले की, या हंगामात इतर तापांचे प्रमाण वाढले आहे.
राजेंद्र प्लेस येथील बीएलके हॉस्पिटलमध्येही टायफॉईड आणि इन्फ्लूएन्झाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. ‘दरवर्षी टायफॉईडचे प्रमाण वाढत असते आणि पावसाळ्याच्या अखेरीस हे प्रमाण कमी होते. परंतु या वर्षी तसे झाले नाही’, अशी कबूली इंटरनल मेडिसिन विभागाचे प्रमुख आणि वरिष्ठ संचालक राजिंदरकुमार सिंघल यांनी दिली आहे.
टायफॉईड आणि इन्फ्लूएन्झाच्या प्रकरणांत घट होण्यामागे डॉक्टरांनी दोन महत्त्वाची कारणे सांगितली आहेत. पहिले कारण असे की, कोव्हिड-19 (Corona Virus) साथीच्या रोगामुळे स्वच्छतेत खूप वाढ झाली आहे. तर दुसरे कारण म्हणजे लोक फक्त घरगुती अन्न खात आहेत. डॉ. कक्कर म्हणाल्या की, ‘साथीच्या रोगामुळे आपल्या जीवनशैलीत, अन्न व सामाजिक शिष्टाचारांत बदल झाले आहेत. यातील काही बदल फायद्याचे ठरले, ज्यामुळे यावर्षी टायफॉईड आणि हेपेटायटीसचे प्रमाण कमी झाले आहे’.
संबंधित बातम्या :
भारतात 10 वर्षांनी BMI चे नियम बदलले, महिला आणि पुरुषांसाठी फिटनेसचं नवं वजन काय?
फिट राहण्यासाठी आता जिममध्ये जाण्याची गरज नाही
(Consistent use of the same mask can cause side effects)