तासन् तास बसून काम केल्याने मधुमेहासह अनेक आजारांना निमंत्रण, ‘या’ उपायांनी मिळेल आराम!
एका अभ्यासानुसार, दीर्घकाळापर्यंत एकाच जागी बसून काम केल्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि ऑस्टिओप्रोसिस सारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.
मुंबई : जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या साथीच्या दरम्यान, बरेच लोक ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. रोगाचा प्रतिबंध करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. परंतु, त्याच वेळी सतत तासनतास एकाच ठिकाणी बसून काम करणे आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही. एका अभ्यासानुसार, दीर्घकाळापर्यंत एकाच जागी बसून काम केल्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि ऑस्टिओप्रोसिस सारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. तज्ज्ञांचे म्हणण्यानुसार काही गोष्टींची काळजी घेतल्यास या रोगांचा धोका कमी केला जाऊ शकतो (Continue sitting for Work From Home causes diabetes and high blood pressure).
उंच टेबल वापरा
खुर्चीवर बरेच तास बसून काम करणे कंबर आणि मानेसाठी चांगले नाही. यासाठी, आपण उभे टेबल किंवा जास्त उंचीचे टेबल अथवा काउंटर वापरल्यास ते मणक्याच्या आणि डोळ्यांचा दृष्टीने चांगले ठरेल. आपल्याला सुरुवातीपासून काही त्रास असू शकतात. परंतु, ही पद्धत आपल्याला बर्याच रोगांपासून वाचवू शकते.
खुर्चीऐवजी एक्सरसाईज बॉल वापरा
जिम किंवा फिटनेस सेंटरमध्ये तुम्ही अनेकदा खुर्चीऐवजी बॉलवर बसलेले लोक पाहिले असतील. तासन् तास बसून काम करताना हा चेंडू वापरणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. हा बॉल शरीराची मुद्रा, कोर स्नायू आणि पेल्विक स्थिरता सुधारण्यासाठी मदत करू शकतो.
कामादरम्यान ब्रेक
ऑफिस प्रमाणेच घरीदेखील कामाच्या दरम्यान ब्रेक घेणे कधीही विसरू नका. फोन अटेंड किंवा पाण्याची बाटली भरण्याच्या बहाण्याने दर 45 मिनिटांनी थोडे चालण्याची सवय लावा. या ब्रेकमध्ये, स्ट्रेचिंग, चालणे आणि मोर्चिंगसारखे बरेच सोपे व्यायाम देखील केले जाऊ शकतात.
बसण्याची पद्धत
काम करत असताना आपल्या बसण्याच्या स्थितीकडे देखील लक्ष द्या. खुर्चीवर बसतांना मणका सरळ रेषेत असावा. खांदा मागच्या बाजूस ताठ, तर पायाचा पंजा जमिनीवर टेकलेला असावा. पाय जमिनीला टेकत नसल्यास, आपण पायांच्या खाली एक लहान स्टूल देखील ठेवू शकता. नेहमी ताठ, 90 डिग्री कोनात बसावे (Continue sitting for Work From Home causes diabetes and high blood pressure).
हृदयाची काळजी घ्या
8-9 तासांच्या दीर्घ कामानंतर आपली शारीरिक क्रिया मंद होते, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. दररोज एक तासासाठी कमी तीव्रतेचा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचा व्यायाम करा. लिफ्टऐवजी पायर्यांचा वापर करा. जवळपास कामासाठी जाण्यासाठी वाहनाऐवजी चालण्याची सवय लावा.
पुरेशी झोप आणि पाणी
दररोज किमान 6-8 तासांची पुरेशी झोप घ्या. याशिवाय शरीर हायड्रेट राहण्यासाठी भरपूर पाणी प्या. कमी पाणी प्यायल्याने हिवाळ्यात डिहायड्रेशनचा धोका वाढतो. या दोन्ही गोष्टी आपल्या शरीराच्या योग्य कार्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.
आहार
केवळ आरोग्यदायी गोष्टी खाण्याची सवय लावा. आपल्या आहारात प्रथिने, नैसर्गिक फॅट आणि शरीरास ऊर्जा देणारे कार्बोहायड्रेट समाविष्ट करा. याशिवाय हिरव्या पालेभाज्या आणि फायबरयुक्त फळंही नियमित खा.
या गोष्टी खाण्यचे टाळा
जास्त साखर किंवा जास्त सोडियमयुक्त पदार्थ खाणे टाळा. या प्रकारच्या पदार्थांमुळे लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि इतर अनेक चयापचय विकार होऊ शकतात. तसेच, तळलेले किंवा जास्त मसालेदार खाणे देखील टाळा. याव्यतिरिक्त अल्कोहोल, सिगारेट किंवा जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन टाळा.
(Continue sitting for Work From Home causes diabetes and high blood pressure)
हेही वाचा :
2021 मध्येही नवी संकटं येणार, जग कसं तोंड देणार? WHO कडून ‘या’ 10 उपाययोजनांचा सल्लाhttps://t.co/uxndFaXH8Q#WHO #Corona #CoronaEffect
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 26, 2020