Parenting Tips : 12 वर्षांवरील मुलांना ‘ही’ 5 कामं करायला जरूर शिकवा; बनवा आत्मनिर्भर!

तुमचं मूल 12 वर्षांच्या वरील वयोगटातील असेल तर त्यांना स्वत:ची कामं स्वत: करायला शिकवण्याची योग्य वेळ आहे. जेणेकरून भविष्यात त्यांना कोणावरही अवलंबून रहावे लागणार नाही.

Parenting Tips : 12 वर्षांवरील मुलांना 'ही' 5 कामं करायला जरूर शिकवा; बनवा आत्मनिर्भर!
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 3:46 PM

Essential Life Skills for Child : प्रत्येक पालकांची (Parents wants happiness of kids) इच्छा असते की त्यांची मुलं नेहमी खुश, आनंदी राहावीत. त्यासाठी ते त्यांनी मागितलेली प्रत्येक गोष्ट त्यांना आणून देतात, त्यांना कोणत्याच गोष्टीची कमी भासू देत नाहीत. मात्र आयुष्य नेहमी तसेच राहत नाही. मुलं हळुहळू मोठी होऊ लागतात. त्यांना जर सतत तुमची सवय लागली तर मोठेपणी ते त्यांच्यासाठी खूप कठीण होऊ शकते. ते सतत तुमच्यावर किंवा इतर कोणावर तरी अवलंबून राहतील. त्यामुळे त्यांना स्वत:ची कामं (Doing work on their own) स्वत: करायला शिकवून आत्मनिर्भर करणे गरजेचे आहे. सुरूवातीपासूनच मुलांना काही गोष्टी समजावणे, शिकवणे गरजेचे आहे. भलेही त्या गोष्टी आत्ता छोट्या वाटत असतील, पण भविष्यात त्याचा मोठा फायदा होतो. तुमचं मूल जर 12 वर्षावरील वयोगटातील असेल तर त्यांना त्यांची काही कामे (Work) सांगणे, सामान सांगणे अशा गोष्टी करू द्याव्यात. भविष्यात या गोष्टी त्यांना उपयोगी पडतील.

सायकल चालवणे व घरातील साहित्य आणणे –

12व्या वर्षानंतर मुलांना घरातील छोट्या-छोट्या गोष्टी, साहित्य आणायला सांगितले पाहिजे. सायकलवरून जाऊन ते सामाना आणू शकतील. दूध, फळं, भाज्या, किराणा सामानातील एखादी वस्तू, ते सहज आणू शकतील. यामुळे त्यांना चांगली वस्तू कशी निवडावी याची पारख होईल, तसेच प्रत्येक गोष्टीची किंमत किती आहे हे कळेल, त्यामुळे काय गरजेचे, चैनीच्या वस्तू कोणत्या हे कळू शकेल. भविष्यात वायफळ खर्च टळेल. तसेच पैशांचा हिशोब करता येईल. यातूनच ते बऱ्याच गोष्टी शिकतील व त्यांची समज वाढेल.

ऑनलाइन कॅब बुक करणे –

आजकालची मुलं टेक्नोसॅव्ही आहेत, त्यांना मोबाइल, टॅब, कॉम्प्युटर सहज वापरता येतो. पण ते फक्त मनोरंजनापुरतं मर्यादित असतं. त्यांना रोजच्या जीवनातील काही गोष्टीही करता आल्या पाहिजेत, जसे, ऑनलाइल टॅक्सी किंवा कॅब बुक करणे. यामुळे त्यांना गरज पडल्यास वृद्ध व्यक्तींना मदत करता येईल. किंवा स्वत: बाहेर गेल्यास घरी कसे यायचे हे समजेल. तसेच घराचा पत्ताही लक्षात राहील. भविष्यात शिक्षण किंवा नोकरीसाठी एकटं रहायची वेल आल्यास या गोष्टी उपयोगी पडतात आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढतो.

हे सुद्धा वाचा

स्वत:चे कपडे धुणे व इस्त्री करणे –

स्वत:चे कपडे धुणे व त्यांना इस्त्री करणे, ही अशी कामे आहेत, जी प्रत्येक व्यक्तीला आलीच पाहिजेत. स्वच्छतेच्या दृष्टीकोनातूनही ते अतिशय महत्त्वाचे ठरते. त्यामुळे मुलांनाही ही कामे शिकवणे गरजेचे आहे. त्यांना स्वत:च कपडे धुवायला शिकवावे. तसेच त्या कपड्यांना इस्त्री करायलाही शिकवावी. जेणेकरून भविष्यात गरज पडल्यास त्यांना इतर कोणावरही अवलंबून रहावे लागणार नाही व त्यांचे कोणतेही काम अडणार नाही.

स्वत:ची खोली आणि स्वत: च्या गोष्टी स्वच्छ व नीट ठेवणे –

नीटनेटकेपणाचा गुण प्रत्येक व्यक्तीत असावा. प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या वस्तू जागच्याजागी, नीट ठेवायला शिकली, तर घरकाम खूप सोपे होईल. त्यामुळे मुलांना स्वत:ची खोली नीट, स्वच्छ आवरून ठेवणे, घेतलेली वस्तू जागच्या जागी ठेवण्याची ठेवमे, त्यांची काळजी घेणे, हे शिकवावे.

स्वत:साठी जेवण बनवणे –

12 वर्षांच्या मुलाला जेवण बनवायला शिकवणे, हे ऐकायला थोडे विचित्र वाटू शकेल, पण ही आजच्या काळाची गरज आहे. त्यांना स्वयंपाकघरातील छोट्या-छोट्या गोष्टी शिकवण्यापासून सुरूवात करा. प्रत्येक व्यक्तीला स्वत:चे पोट भरेल एवढा बेसिक स्वयंपाक तरी करता आला पाहिजे. मुलांना वरण-भात लावणे, भाजी चिरणे, अशा गोष्टी हळूहळू शिकवाव्यात. भविष्यात गरज पडल्यास ते स्वत:चे पोट भरण्यापुरतं तरी अन्न शिजवू शकतील आणि उपाशी राहण्याची वेळ येणार नाही.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.