मुंबई : भारतात कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसचे संकट दिवसेंदिवस अधिक भीषण बनत चालले आहे. म्युकरमायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगस. हा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना अधिक प्रमाणात होत असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. हा आजारही कोरोनाप्रमाणेच देशातील विविध राज्यांमध्ये पसरला आहे. अनेक राज्यांमध्ये या आजाराची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वच राज्यांना खबरदारी बाळगण्याच्या दृष्टीने अॅलर्ट जारी केला आहे. तसेच या आजारालाही महामारी घोषित करण्याचे निर्देश दिले आहे. जेणेकरून राज्यांमध्ये औषधांचा पुरेशा प्रमाणात साठा व इतर बाबतीत खबरदारी बाळगून हा आजार वेळीच आटोक्यात आणता येईल. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगसचे प्रमाण अधिक आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी सावधानगिरीचा सल्ला दिला आहे. मधुमेहाच्या रुग्णांना कोरोनामुक्तीनंतर ब्लॅक फंगस होण्याचा धोका आहे. (Corona-free diabetic patients should take care of this, Experts advise to prevent black fungus infection)
ब्लॅक फंगस हा एक दुर्मिळ परंतु जीवघेणा बुरशीजन्य संसर्ग आहे. जो भारतातील बऱ्याच राज्यांत साथीचा रोग जाहीर झाला आहे. वरिष्ठ डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी ब्लॅक फंगस या बुरशीजन्य संसर्गाची लागण होऊ नये म्हणून अतिसंवेदनशील लोकांसाठी अनेक सावधगिरी बाळगण्याची शिफारस केली आहे. कोरोनातून बरे झालेल्या मधुमेहाच्या रुग्णांना स्टेरॉइड्सच्या उपचारानंतर म्युकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगसचा संसर्ग होण्याचा धोका असतो. एका अहवालात या वैद्यकीय अभ्यासाचा हवाला देण्यात आला आहे की ब्लॅक फंगसच्या संसर्गाचे 80 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण हे कोरोनातून बरे झालेले मधुमेहाचे रुग्ण आहेत. ब्लॅक फंगसच्या संसर्गाचा धोका असलेल्या अवयव प्रत्यारोपण आणि कर्करोगग्रस्तांना रोगप्रतिकारक औषधे दिली जातात.
ब्लॅक फंगस अर्थात काळ्या बुरशीचे प्रमाण रक्तप्रवाहातील अतिरिक्त साखरेच्या पातळीमुळे वाढते. या माध्यमातून शरीराच्या अवयवांना संक्रमित करते. त्यामुळे आपल्या शरीरात साखरेची पातळी नियंत्रित कशी राहील, याकडे गांभीर्याने लक्ष द्या.
आपण किंवा आपल्या जवळची व्यक्ती मधुमेहग्रस्त असल्यास व अलिकडेच कुणाला कोरोनाचा संसर्ग झाला असल्या शरीरातील साखरेच्या पातळीवर नियमित नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा रुग्णांना रोज न चुकता साखरेची पातळी तपासणे गरजेचे आहे.
मध्यम ते गंभीर कोरोना संक्रमणामध्ये केल्या जाणाऱ्या उपचारामध्ये स्टेरॉयडच्या औषधांचा समावेश असतो. ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वैद्यकीय अभ्यासानुसार, डॉक्टरांनी मधुमेहाच्या रूग्णांवरील कोरोनाच्या उपचारांचा स्टेरॉयडशी संबंध जोडला आहे. जर नंतर ब्लॅक फंगसचा संसर्ग झाल्यास मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते.
गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश त्रेहान यांच्या म्हणण्यानुसार, ब्लॅक फंगसवर नियंत्रण मिळवण्याची गुरुकिल्ली म्हणजे स्टेरॉयड्सचा योग्य वापर आणि मधुमेहावर चांगले नियंत्रण ठेवणे. तज्ज्ञांनी दिलेल्या या वैद्यकीय सल्ल्यांचे पालन करून तुम्ही ब्लॅक फंगसचा धोका दूर ठेवू शकता व स्वत:ला संसर्गापासून वाचवू शकता. (Corona-free diabetic patients should take care of this, Experts advise to prevent black fungus infection)
Mahindra वाहनधारकांसाठी खुशखबर! कोरोनाच्या परिस्थितीत ग्राहकांसाठी कंपनीचा मोठा निर्णय#Mahindra #MahindraAndMahindra #CoronaPandemic #COVIDEmergencyIndia https://t.co/s4CZDDvXMx
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 22, 2021
इतर बातम्या
Puzzle Photo: या फोटोत दडलेत अनेक प्राणी, पण उंट आहे कुठे?; हुशार असाल तर शोधून दाखवाच!
‘मला रं गड्या भीती कशाची!’ 101 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात