कोरोना पॉझिटीव्ह आईदेखील करू शकते नवजात बाळाला स्तनपान, जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात…

सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने (Corona Second Wave) संपूर्ण देश पुन्हा एकदा हादरला आहे. अशा परिस्थितीत नवजात मुलांच्या मातांना आपल्या बाळाची काळजी घेण्याची चिंता सतत सतावत राहते.

कोरोना पॉझिटीव्ह आईदेखील करू शकते नवजात बाळाला स्तनपान, जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात...
कोरोना काळात स्तनपान किती सुरक्षित?
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 3:56 PM

मुंबई : सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने (Corona Second Wave) संपूर्ण देश पुन्हा एकदा हादरला आहे. अशा परिस्थितीत नवजात मुलांच्या मातांना आपल्या बाळाची काळजी घेण्याची चिंता सतत सतावत राहते. तिच्या मनातला सर्वात मोठा प्रश्न हा असतो की, ती आपल्या मुलाला स्तनपान देऊ शकेल की नाही? जर ती बाळाला स्तनपान करत असेल तर, ते तिच्या बाळासाठी किती सुरक्षित आहे. स्तनपान देणाऱ्या मातांनी काय करावे, हे तज्ज्ञाकडून जाणून घेऊया (Corona Positive Mothers can feed her baby but keep these things in mind).

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे मुख्य डॉक्टर टेड्रोस एडहॉनम जिब्रियासस म्हणतात की, कोरोना पॉझिटिव्ह मातांनी आपल्या नवजात बाळाचे स्तनपान चालूच ठेवले पाहिजे. यासाठी ते अनेक युक्तिवादही करतात. ते म्हणतात की, स्तनपान देण्याचे फायदे मुलांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या जोखमीपेक्षा जास्त असतात.

लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका कमी!

जगभरातील सर्व अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की, कोरोनाचा धोका लहान मुलांमध्ये खूपच कमी आहे. त्याच वेळी, असे बरेच रोग आहेत, ज्यामुळे नवजात मुलांना जास्त धोका असतो. परंतु, सहा महिने स्तनपान करून मुलांना या आजारांपासून दूर ठेवता येते. सध्याच्या पुराव्यांच्या आधारे, डब्ल्यूएचओचे असे म्हणणे आहे की, माता सुरक्षितता मापदंडांसह आपल्या मुलांना स्तनपान देऊ शकतात.

आईला बाळापासून दूर ठेवले जाते

आग्रा येथील सरोजिनी नायडू मेडिकल कॉलेजमधील महिला आणि प्रसूतिशास्त्रज्ञ डॉ. निधि सांगतात की, कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर मातांना आपल्या मुलांपासून दूर ठेवले जात असल्याचे दिसून आले आहे. अशा आईंना वेगळ्या टिकाणी ठेवले जाते आहे, ज्यामुळे त्या बाळांना स्तनपान देण्यापासून वंचित राहतात.

डॉ.निधी म्हणतात की, जर आईदेखील कोरोना पॉझिटिव्ह असेल, तर तिचे कुटुंब बाळाची काळजी घेऊ शकते. परंतु, या काळात मुलास आईचे दूध दिलेच पाहिजे. यासाठी आईचे दूध मुलास स्वतंत्रपणे दिले जाऊ शकते किंवा कोरोना प्रोटोकॉलचे पालन करून, आई मास्क आणि हातमोजे घालून मुलाला स्तनपान करू शकते.

जर, आईची प्रकृती गंभीर असेल आणि तिला रुग्णालयात दाखल केले असेल, आणि जर तिला योग्य स्तनपान होत असेल, तसेच जर तिचे दूध मुलासाठी पुरेसे असेल, तर डॉक्टर ते दूध काढून, बाळापर्यंत सुरक्षितपणे पोहचवू शकतात (Corona Positive Mothers can feed her baby but keep these things in mind).

स्तनपानात विषाणू नाही

जागतिक आरोग्य संघटनेच्या रीप्रोडक्टिव्ह हेल्थविषयक सल्लागार डॉ. अंशु बॅनर्जी यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आईच्या दुधात म्हणजेच स्तनपानामध्ये थेट व्हायरस सापडला आहे की नाही, हे आतापर्यंत डॉक्टर किंवा संशोधकांना सापडलेले नाही. अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात स्तनपानामध्ये विषाणूचे आरएनएचे तुकडे आढळले आहेत (कोरोना विषाणू आरएनए, प्रोटीन रेणूपासून बनलेला आहे) परंतु, अद्यापपर्यंत स्तनपानामध्ये जिवंत विषाणू आढळला नाही. या कारणास्तव, आईपासून मुलाला कोरोना संसर्ग होण्याचा धोका सिद्ध झालेला नाही.

स्तनपान करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या.

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) म्हटले आहे की, कोरोना पॉझिटिव्ह मातांनी प्रथम आपले हात साबणाने चांगले धुवावे आणि नवजात मुलाला स्तनपान देताना तोंडावर एन95चा मास्क लावावा. स्तनपान दिल्यानंतर, जे सदस्य पॉझिटीव्ह नाहीत किंवा त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत, अशा सदस्यांनी बाळाची काळजी घ्यावी.

सुरुवातीला, वैद्यकीय अभ्यासात असेही समोर आले आहे की, आईचे दूध नवजात मुलास कोरोना विषाणूपासून वाचवते. त्याशिवाय कोव्हिड पॉझिटिव्ह मुलांसाठी बर्‍याच रुग्णालयांमध्ये स्वतंत्र एनआयसीयू आणि ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात आले आहे. मात्र, हे नक्कीच आश्चर्यकारक आहे की, एकमेकांशी संपर्कामुळे पसरलेला कोरोना विषाणू आईपासून तिच्या नवजात बाळापर्यंत अजिबात पोहोचत नाही.

(Corona Positive Mothers can feed her baby but keep these things in mind)

(टीप : कोणत्याही कृतीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

हेही वाचा :

रेमडेसिव्हीर जीवनरक्षक औषध नाही, उपलब्ध नसल्यास पर्याय काय? डॉक्टर अमोल कोल्हे यांचा खास व्हिडीओ

Corona Help Line Numbers | कोरोना काळात मदतीची आवश्यकता? पाहा भारतातील हेल्पलाईन क्रमांकाची राज्य-वार यादी

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.