तुमची शिंक सांगते तुमच्या स्वभावाचं रहस्य, तुम्ही कसे शिंकता?

शिंका हा केवळ शरीराचा प्रतिक्रिया नाही तर व्यक्तिमत्त्वाचाही आरसा असू शकतो. जोरात शिंकणे, शिंकण्यापूर्वी माफी मागणे, वारंवार शिंकणे किंवा शिंक थांबवण्याचा प्रयत्न या सर्व सवयी तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू उलगडतात. उदाहरणार्थ, जोरात शिंकणारे लोक लोकांचे लक्ष वेधण्यास इच्छुक असतात, तर शांतपणे शिंकणारे लोक अंतर्मुख असतात. हा लेख तुमच्या शिंकण्याच्या सवयी आणि तुमच्या स्वभावातील संबंध स्पष्ट करतो.

तुमची शिंक सांगते तुमच्या स्वभावाचं रहस्य, तुम्ही कसे शिंकता?
प्रतिकात्मक छायाचित्रImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 01, 2025 | 3:23 PM

सर्दी पडसे झाल्याने अनेकजण आपल्याला शिंकताना दिसतात. हिवाळ्यात तर वारंवार शिंका येतात. शिंकेचा संबंध जसा आरोग्याशी आहेत. तसाच तो आपल्या व्यक्तिमत्त्वाशीही आहे. ब्रिटनचे प्रसिद्ध बॉडी लैंग्वेज एक्सपर्ट रॉबिन केरमोड यांनी त्यांच्या पुस्तकात शिंकण्याच्या विविध प्रकारांच्या आधारे व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू सांगितले आहेत. तुम्ही कशा प्रकारे शिंकता? तुमचा स्वभाव कसा आहे? हे आपण आता पाहणार आहोत. बघा तुमचा स्वभाव खरंच शिंकेसारखाच आहे का?

जोरात आवाज काढून शिंकणे

काही लोकांना शिंकताना जोरात आवाज काढून शिंकण्याची सवय असते. तुम्हालाही जोरात आवाज काढून शिंकायची सवय असेल तर तुम्हाला लोकांना तुमच्याकडे आकर्षित करायला आवडते असा त्याचा अर्थ होतो. आपल्याकडे लोकांनी बघावं अशी सुप्त इच्छा तुमची असते. तसेच आपल्या कल्पनांकडे लोकांना आकर्षित करायलाही तुम्हाला आवडते.

शिंकण्यापूर्वी ‘सॉरी’ किंवा ‘एक्सक्यूज मी’ म्हणणे

तुम्हाला शिंकण्यापूर्वी किंवा नंतर ‘सॉरी’ किंवा ‘एक्सक्यूज मी’ म्हणायची सवय असेल तर तुमचा स्वभाव शांत, सभ्य आणि अंतर्मुख आहे, असा त्याचा अर्थ होतो. अशा व्यक्तींना इतरांच्या आयुष्यात हस्तक्षेप करायला आवडत नाही.

हे सुद्धा वाचा

वारंवार शिंकणे

तुम्ही वारंवार शिंकत असाल तर याचा अर्थ तुम्ही लोकांचं लक्ष सतत तुमच्याकडे वेधू इच्छिता. कदाचित लोकं आपली दखल घेत नाही किंवा दुर्लक्ष करतात असं तुम्हाला वाटत असतं. त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होतो. म्हणूनच तुम्ही लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करता.

शिंका थांबवणारे…

काही लोकांना शिंक आल्यावर ते शिंक थांबवण्याचा प्रयत्न करतात. असं करणारे लोक हे अंतर्मुख स्वभावाचे असतात. त्यांना गर्दीपासून दूर राहून स्वत:ची जागा निर्माण करायला आवडते. इतरांपासून वेगळं राहायला यांना आडतं. हे लोक आपल्याच दुनियेत मग्न असतात.

नाक आणि तोंडावर रुमाल ठेवणारे

जे लोक शिंकताना नाक आणि तोंड रुमाल किंवा हाताने झाकतात, ते लोक इतरांच्या आनंदाची काळजी घेतात. हे लोक नियम आणि कायद्यांच्या चौकटीत राहून आपले सर्व कार्य करत असतात. असे लोक स्वभावाने खूप माणुसकी असलेले आणि मनमिळावू असतात.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.