Dengue Diet: डेंग्यूच्या रुग्णांनी ‘ हे ‘ पदार्थ खाणे टाळावे, अन्यथा होऊ शकतो त्रास
डेंग्यू झालेल्या रुग्णांना खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास ते हानिकारक ठरू शकते. डेंग्यूच्या रुग्णांनी काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
बदलत्या ऋतूमानानुसार डेंग्यू (dengue) होण्याचा धोका खप वाढतो. डेंग्यू हा आजार डास चावल्याने होतो. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाला ताप येणे, अंग दुखी, डोकेदुखी, थकवा, अशी लक्षणं जाणवतात. त्याचबरोबर ताप (fever) ओसरल्यानंतर लालसरपणा येणं, हाता पायाला खाज सुटणे असा त्रास होतो. तसेच पित्ताशयाला सूज येऊन रुग्णाला धाप लागते. डेंग्यू झालेल्या रूग्णाच्या पांढऱ्या पेशीही कमी होतात.
डेंग्यूची लक्षणं जाणवताच त्वरित वैद्यकीय उपचार (medical treatment) घेणं गरजेचे आहे. तसेच खाण्या-पिण्याची योग्य काळजी घेणेही गरजेचे आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास ते हानिकारक ठरू शकते. डेंग्यूच्या रुग्णांनी काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे. ते कोणते हे जाणून घेऊया..
तळलेले पदार्थ –
डेंग्यूच्या रुग्णांनी तेलकट आणि तळलेल्या पदार्थांचे सेवन करू नये. या पदार्थांमुळे ब्लड प्रेशर लेव्हल वाढते. तसेच बॅड कोलेस्ट्रॉलमध्येही वाढ होते. त्यामुळे रुग्ण बरा होण्यात खूप त्रास होतो. डेंग्यूच्या रुग्णांनी साधं, पौष्टिक जेवण जेवलं पाहिजे.
कॅफेन –
डेंग्यूच्या रुग्णांनी कॅफेनयुक्त पेयांपासून दूर रहावे. कॅफेनयुक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे थकवा जाणवतो. हृदयाचे ठोके वाढू लागतात. स्नायूंच्या समस्या उद्भवू लागतात. अशा परिस्थितीत पपईच्या पानांच्या रसाचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते.
मांसाहार –
डेंग्यूच्या रुग्णांनी मांसाहारी पदार्थ खाऊ नयेत. ते पदार्थ पचवणं खूप कठीण असतं. त्यामुळे पेशंटला खूप त्रास होऊ शकतो. पचनासंदर्भातील समस्यादेखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे मांसाहारापासून दूर रहावे.
मसालेदार जेवण –
डेंग्यूच्या रुग्णांनी मसालेदार अन्नापासून दूर रहावे. मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यास त्याचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. यामुळे पोटात ॲसिड जमा होते. यामुळे अल्सरची समस्यादेखील उद्भवू शकते. त्यामुळे मसालेदार पदार्थ खाणे टाळा.