Depression | डिप्रेशनचे संकेत असू शकतात जीवनातील ‘हे’ बदल, जाणून घ्या नेमकं काय आहे नैराश्य?

नोकरी गमावणे, घटस्फोट घेणे, एखाद्याचा मृत्यू, कौटुंबिक इतिहास, गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदल, दीर्घकालीन आजार, सामाजिक भेदभाव आणि जास्त मद्यपान इत्यादी काही तणावग्रस्त घटना नैराश्यास कारणीभूत ठरू शकतात.

Depression | डिप्रेशनचे संकेत असू शकतात जीवनातील ‘हे’ बदल, जाणून घ्या नेमकं काय आहे नैराश्य?
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 3:55 PM

मुंबई : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी वेळ एकदा तरी येते जेव्हा एखादी व्यक्ती खूप निराश होते आणि नैराश्यात जाते. काही दुःख किंवा एखाद्या वाईट घटनेमुळे काही काळ हे घडणे सामान्य गोष्ट असू शकते. परंतु, जर ही परिस्थिती बर्‍याच दिवसांपर्यंत अशीच राहिली तर, ती नैराश्याचे लक्षण असू शकते. यावर वेळेवर नियंत्रिण न आणल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. मानसिक आरोग्य तज्ज्ञ प्रकृती पोद्दार यांच्याकडून जाणून घेऊया नैराश्य अर्थात डिप्रेशनशी संबंधित विशेष माहिती…( Depression symptoms, causes and precautions)

‘ही’ असू शकतात नैराश्याची कारणे

नैराश्याचे नेमके कारण स्पष्ट नाही. परंतु, नोकरी गमावणे, घटस्फोट घेणे, एखाद्याचा मृत्यू, कौटुंबिक इतिहास, गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदल, दीर्घकालीन आजार, सामाजिक भेदभाव आणि जास्त मद्यपान इत्यादी काही तणावग्रस्त घटना नैराश्यास कारणीभूत ठरू शकतात. यामुळे डिप्रेशन येऊ शकते.

अशी असू शकतात लक्षणे..

डिप्रेशन दरम्यानची काही लक्षणे आधीच दिसू लागतात. निद्रानाश, दुःखाबद्दल वाढलेली संवेदनशीलता, वजन वाढणे किंवा कमी होणे, थकवा, चिडचिडेपणा, एकटे राहण्याची इच्छा इत्यादी लक्षणांचा यात समावेश होतो. हे संकेत वेळेत समजून घेतल्यास परिस्थिती व्यवस्थित हाताळता येते.

आकडे काय म्हणतात?

दि लॅसेन्टच्या म्हणण्यानुसार 2017मध्ये भारतात 197.3 दशलक्ष लोक मानसिक आजाराने ग्रासित होते. त्यापैकी 45.7 दशलक्ष नैराश्याने ग्रस्त होते आणि 44.9 दशलक्ष लोक चिंताग्रस्त होते. त्याच वेळी, सर्व संशोधने असे दर्शवतात, की भारतातील सर्व आर्थिक नुकसानीचे एक प्रमुख कारण मानसिक आरोग्य आहे (Depression symptoms, causes and precautions).

नैराश्यापासून करा स्वतःचा बचाव…

– जेव्हा जेव्हा एकटे राहण्याची कल्पना मनात येते तेव्हा मित्रांसह वेळ घालवा.

– पुरेशी झोप आणि पौष्टिक आहार घ्या.

– आपल्या दिनचर्येमध्ये व्यायाम, योगा आणि ध्यान यांचा समावेश करा.

– आपल्यातल्या कमतरता पाहण्याऐवजी आपले सामर्थ्य ओळखा, यासाठी आपण थेरपिस्टचीही मदत घेऊ शकता.

– जर, आपण यावर औषधे घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.

– डॉक्टरांचे थेरपी सेशन चुकवू नका आणि आपल्यास जे वाटते ते डॉक्टरांना प्रामाणिकपणे सांगा.

नैराश्यात समुपदेशनाचा खास उपयोग होतो. पण, समुपदेशकांशी केवळ गप्पा मारून निराशा कमी होते, हा खूप मोठा गरसमज आहे. समुपदेशन म्हणजे एक प्रकारचे शिक्षणच असते, त्यात रुग्णालाही मेहनत घ्यावी लागते. नैराश्याचे प्रमाण कमी असेल, योग्य प्रशिक्षित समुपदेशक असेल आणि सांगितलेले बदल करण्याची रुग्णात क्षमता असेल तर समुपदेशनाचा चांगला उपयोग होतो. औषध आणि समुपदेशन, दोन्ही एकत्र घेणे योग्य उपाय ठरतो.

(Depression symptoms, causes and precautions)

हेही वाचा :

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.