या देशाने दारू पिण्यात मोडलाय वर्ल्ड रेकॉर्ड, कोरोनानंतर तर कहरच, पाहा कोणता आहे तो देश!
तुम्हाला माहितीये का की एक असा देश आहे जिथे लोक मोठ्या प्रमाणात दारूचं सेवन करत आहेत. या देशाने दारू पिण्यात वर्ल्ड रेकॉर्ड मोडला असा म्हणायला काही हरकत नाही.
मुंबई : दारू पिणाऱ्यांची काही कमी नाही, जिथे जाल तिथे दारू पिणारी लोकं दिसतीलच. मग पार्टी करायची असो, टेन्शन आलं असेल, कुठे फिरायला गेल्यावर लोक दारू पिताना दिसतातच. पण तुम्हाला माहितीये का की एक असा देश आहे जिथे लोक मोठ्या प्रमाणात दारूचं सेवन करत आहेत. या देशाने दारू पिण्यात वर्ल्ड रेकॉर्ड मोडला असा म्हणायला काही हरकत नाही. तर या देशाबद्दल जाणून घ्या.
दारू पिणाऱ्यांची संख्या जास्त असलेला देश म्हणजे दक्षिण कोरिया. दक्षिण कोरियात दारू पिण्याचं कल्चरच सुरू झालं आहे. कारण या देशात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ड्युटीचे तास खूप जास्त आहेत. त्यामुळे, कामानंतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात दारू पितात. तसेच तणाव दूर करण्याचा हा त्यांचा स्वतःचा मार्ग आहे. त्यामुळे या देशात दारू पिणं अगदी सामान्य झालं आहे.
दक्षिण कोरियातील लोक दारू पिण्यासाठी ओळखले जातात. ताज्या आकडेवारीनुसार याची पुष्टी होते. या देशात वाईन, व्हिस्की आणि बिअरच्या आयातीत वाढ झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर दक्षिण कोरियातील लोकांची दारू पिण्याची पद्धतही बदलली आहे. या देशात दारू पिणे हा एक सामाजिक उपक्रम मानला जात असून आता लोक घराघरात दारू पित आहेत.
व्हिस्कीच्या आयातीत मोठी वाढ
कोरिया कस्टम सर्व्हिसच्या आकडेवारीनुसार, देशातील व्हिस्कीच्या आयातीत या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुमारे 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारी ते मार्च या दरम्यान येथे 8,443 टन व्हिस्कीची आयात करण्यात आली आहे. याच कारण म्हणजे दक्षिण कोरियातील तरुणांनी व्हिस्कीला अधिक पसंती दिल्यामुळे ही वाढ करण्यात आली आहे. तसेच व्हिस्कीचा खप वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्याची स्वस्तता आणि सहज उपलब्धता.
सर्वाधिक बिअर दक्षिण कोरियामध्ये विकली जाते
आकडेवारीनुसार, दक्षिण कोरियामध्ये आजही बिअरला सर्वाधिक पसंती असल्याचं दिसून येत आहे. व्हिस्कीच्या तुलनेत बिअरची विक्री जानेवारी ते मार्च या कालावधीत जवळपास सात पटीने जास्त होती. तसेच कोरिया कस्टम सेवा आकडेवारी दर्शवते की 2022 मध्ये, दक्षिण कोरियाने $581.2 दशलक्ष किमतीची वाईन आयात केली होती.
कोविडनंतर दारू पिण्याची सवय बदलली
2020 मध्ये जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. तसेच कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी देशात कडक निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे दक्षिण कोरियात लोकांना घरात दारू पिण्याची सवय लागली. कोरिया ग्रामीण आर्थिक संस्थेच्या अहवालात असे दिसून आले की, 2021 मध्ये दोन किंवा अधिक लोक असलेल्या कुटुंबांपेक्षा एकल कुटुंबातील सदस्यांनी दारूवर जास्त पैसे खर्च केले आहेत. त्यामुळे येथे लोकांना घरातच दारू पिण्याची सवय मोठ्या प्रमाणात लागली.