तुमच्या आहारात ‘या’ 5 प्रकारच्या चटण्यांचा करा समावेश, आरोग्यासाठीही फायदेशीर
घरी केलेल्या चटण्या केवळ आपल्या जेवणाची चव वाढवतातच असे नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. तुम्ही तुमच्या आहारात या चटण्यांचा समावेश करू शकता. तसेच या चटण्या तुम्ही घरी सहज बनवू शकता आणि ते बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या.

आपल्या भारतीय जेवणांमध्ये अनेक पदार्थ तयार केले जातात. ज्यामध्ये चटण्यांचा देखील समावेश असतो. तसेच आपल्यापैकी अनेकांना जेवताना चटणीचे सेवन करायला आवडतेच. कारण हे केवळ जेवणाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. तुम्हीही अनेक प्रकारच्या चटण्यांबद्दल ऐकले असेल. बहुतेकदा पुदिना व कोथिंबीरीच्या चटण्या घरी सहज बनवल्या जातात. तर नारळ आणि शेंगदाण्याच्या चटण्या देखील खुप लोकप्रिय आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यांची चव वेगवेगळी असतेच पण त्यात शरीर निरोगी ठेवण्यास मदत करणारे पोषक घटक देखील असतात. चला जाणून घेऊया अशा काही चटण्यांबद्दल ज्या बनवायलाही सोप्या आहेत आणि जर त्या मर्यादित प्रमाणात खाल्ल्या तर आरोग्यासाठी फायदेशीर देखील ठरू शकतात.
कोथिंबीर चटणी
कोथिंबीर चटणी ही सर्वात प्रसिद्ध आणि सामान्य चटण्यांपैकी एक आहे. लोकांना ही चटणी जास्त खायला आवडते. त्यातच कोथिंबीरमध्ये असलेले जीवनसत्त्वे ए, सी, के आणि बी व्यतिरिक्त कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक देखील आढळतात. कोथिंबीर चटणी बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम कोथिंबीरची पाने स्वच्छ धुवून घ्या. यानंतर, मिक्सरमध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची आणि जिरे घेऊन चांगले बारीक पेस्ट करा. यानंतर गरजेनुसार मीठ घाला. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यात लिंबाचा रस किंवा दही मिक्स करू शकता.
आवळा चटणी
आवळा आरोग्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. अशा परिस्थितीत तुम्ही त्याची चटणी बनवून तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. यासाठी आवळा पाण्याने स्वच्छ धुवा. आता त्याच्या बिया वेगळ्या करा आणि त्याचे लहान तुकडे करा. तसेच हिरव्या मिरच्या आणि आले यांचेही लहान तुकडे करा. यानंतर, चिरलेला आवळा, आले, हिरवी मिरची आणि जिरे, मीठ आणि कोथिंबीरीचे पाने थोडेसे पाण्यात मिक्स करा आणि मिक्सरमध्ये बारीक करा. काही वेळातच आवळा चटणी खाण्यास तयार आहे.




टोमॅटो चटणी
टोमॅटो, हिरवी मिरची, आले आणि लसूण चांगले धुवून त्यांचे लहान तुकडे करा. एका कढईत तेल गरम करा, त्यात जिरे घाला आणि ते तडतडू द्या. नंतर त्यात चिरलेले टोमॅटो, हिरवी मिरची, आले आणि लसूण घाला आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा. आता मिश्रण थंड होऊ द्या आणि त्यानंतर ते मिक्सरमध्ये टाका आणि बारीक करा. तिथे टोमॅटोची चटणी तयार आहे.
पुदिन्याची चटणी
पुदिन्याची पाने नीट धुवून स्वच्छ घ्या. पुदिना, हिरवी मिरची, आले आणि भाजलेले जिरे मिक्सरमध्ये टाका आणि बारीक करा. यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला. तिथे, पुदिन्याची चटणी तयार आहे. याशिवाय पुदिना चटणी तयार करताना कोथिंबीर मिक्स करून तुम्ही चटणी बनवू शकता.
नारळ आणि कढीपत्त्याची चटणी
ही चटणी बनवण्यासाठी, नारळाचे छोटे तुकडे करा. यानंतर, कोथिंबीर आणि कढीपत्ता धुवून चांगले स्वच्छ करा. आता एका मिक्सरच्या भाड्यांमध्ये नारळाचे तेल, हिरवी कोथिंबीर, चणा डाळ, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि मीठ मिक्स करून त्यात थोडे पाणी घाला आणि बारीक करा. आता ते तयार झालेली चटणी एका भांड्यात काढा. फोडणी तयार करण्यासाठी, एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात हिंग, मोहरी आणि कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या घालून फोडणी तयार करा. यानंतर ते चटणीमध्ये तडका द्या. अशा तऱ्हेने नारळ आणि कढीपत्त्याची चटणी तयार आहे. या चटण्या चवी सोबत आरोग्याला देखील लाभदायक असतात.