Diwali Shopping 2023 : दिवाळीची खरेदी करा ‘या’ ठिकाणी, ऑनलाईनपेक्षा स्वस्त आणि सर्वात स्वस्त फटाके
काही अशा बाजारपेठा आहेत जिथे कमी किमतीत तुमची खरेदी होऊ शकते. अगदी ऑनलाईन खरेदी पेक्षा देखील तुम्हाला चांगल्या वस्तू अगदी कमी किमतीत मिळतील. तर आता ही बाजारपेठा कोणत्या आहेत याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
मुंबई : काही दिवसांवरच दिवाळी हा सण येऊन ठेपला आहे. दिवाळी म्हटलं की खरेदीची आलीच. मग फटाके, मिठाई, फराळ, कपडे अशा अनेक गोष्टींची खरेदी केली जाते. त्यामुळे लोक दिवाळीची तयारी महिनाभर आधीच करतात. यामध्ये विशेष म्हणजे महिला दिवाळीच्या खरेदीसाठी खूप उत्सुक असतात. मग पाहुण्यांना भेटवस्तू देणे असो किंवा कपडे असो किंवा घर सजावटीसाठी काही वस्तू असो अशा प्रत्येक गोष्टींची खरेदी करण्यासाठी महिला उत्सुक असतात. त्यामुळे बहुतेक महिला दिवाळीच्या खरेदीसाठी ऑनलाईन साईट्स वरती वस्तू पाहत असतात. पण ऑनलाईन खरेदी पेक्षा स्वतः बाहेर जाऊन खरेदी करण्यात काही वेगळीच मजा असते.
चांदणी चौक – दिल्लीतील चांदणी चौक हे मार्केट खूपच प्रसिद्ध आहेत. या मार्केटमध्ये तुम्हाला परवडणाऱ्या आणि स्वस्त अशा वस्तू मिळतील. तर दिवाळीसाठी तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही चांदणी चौकातील दरिबा कलान या मार्केटमध्ये जाऊ शकता. या मार्केटमध्ये तुम्हाला कपडे, घराच्या सजावटीच्या वस्तू अगदी परवडणाऱ्या दरात मिळतील.
सरोजिनी मार्केट – जर तुम्हाला दिवाळीसाठी खरेदी करायची असेल तर दिल्लीतील सरोजिनी मार्केट हे खूप उत्तम असे मार्केट आहे. येथे तुम्हाला फुले, कपडे, तोरण, कंदील अशा अनेक वस्तू अगदी परवडणाऱ्या दरात मिळतील. तसेच तुम्हाला या मार्केटमध्ये वेगवेगळ्या नवनवीन अशा व्हरायटीज देखील पाहायला मिळतील.
अट्टा मार्केट – नोएडामधील अट्टा मार्केट हे देखील दिवाळीसाठी एकदम उत्तम असे मार्केट आहे. जर तुम्हाला दिवाळीसाठी घर सजवण्यासाठी काही वस्तू घ्यायच्या असतील तर हे मार्केट उत्तम आहे. या मार्केटमध्ये रांगोळी, लाईट्स, घर सजवण्याच्या काही वस्तू अगदी स्वस्तात मिळतात. तसेच याच मार्केटच्या शेजारील इंदिरा मार्केट देखील दिवाळीच्या खरेदीसाठी एकदम उत्तम असे मार्केट आहे.
करोल बाग मार्केट- दिल्लीमधील करोल बाग हे मार्केट देखील दिवाळीच्या खरेदीसाठी खूप प्रसिद्ध आहे. येथे इतर बाजारांपेक्षा कमी भावामध्ये सर्व वस्तू मिळतात. मग कपडे, फटाके, रांगोळी अशा अनेक गोष्टी या बाजारात अगदी स्वस्तात मिळतात. त्यामुळे जर तुम्हाला दिवाळीसाठी खरेदी करायची असेल तर करोल बाग मध्ये नक्कीच तुम्ही खरेदी करा.
भगीरथी पॅलेस मार्केट – चांदणी चौक या मार्केट पासून थोडेसे पुढे असलेले भगीरथी पॅलेस मार्केट हे देखील दिवाळीच्या खरेदीसाठी बेस्ट आहे. तुम्हाला रांगोळी, कंदील, पणत्या अशा गोष्टी घ्यायच्या असतील तर भगीरथी पॅलेस हे मार्केट खूप उत्तम आहे. भगीरथी मार्केट हे इलेक्ट्रिक मार्केट या नावाने देखील प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या लाइटिंग्स अगदी परवडणाऱ्या दरात मिळतील. तसेच झुंबर, दिवे अशा वस्तू देखील नवनवीन व्हरायटीजमध्ये मिळतील.