एकदा उकळवलेले दूध पुन्हा उकळवण्याची चूक करताय? होऊ शकते मोठे नुकसान!

दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात बरीच जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्यातून आपल्याला पोषण मिळते आणि शरीर मजबूत बनण्यात मदत होते.

एकदा उकळवलेले दूध पुन्हा उकळवण्याची चूक करताय? होऊ शकते मोठे नुकसान!
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 4:39 PM

मुंबई :दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात बरीच जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्यातून आपल्याला पोषण मिळते आणि शरीर मजबूत बनण्यात मदत होते. परंतु, आपण दूध उकळताना अनेकदा चूक करतो, त्यामुळे आपल्याला दूध पिण्याचा पुरेपूर फायदा मिळू शकत नाही. वास्तविक, आपण स्वयंपाकघरातील महिलांना बर्‍याच वेळा स्वयंपाकघरात दूध उकळताना पाहिले असेल. दूध उकळण्यास सुरुवात झाल्यानंतर त्या गॅस मंद करतात आणि दुधाला बर्‍याच वेळासाठी उकळी येऊ देतात. दूध योग्य प्रकारे उकळले पाहिजे जेणेकरून त्यामध्ये असलेले सूक्ष्मजंतू नष्ट होतील, असे आपल्याला लहानपणापासूनच शिकवले जाते (Do not boil milk for more than one time know the reason).

याशिवाय दुधात चांगली मलई आहे, ज्याच्या मदतीने घरच्या घरी सहज तूप बनवू शकतात, या विचाराने स्त्रिया आणखी काहीवेळ दूध उकळू देतात. त्याच वेळी, काही स्त्रियांना असे वाटते की, भरपूर वेळ दूध उकळवल्याने त्यातील पोषकद्रव्ये वाढतात. परंतु, आपणसुद्धा असाच काहीतरी विचार विचार करून, दिवसातून अनेक वेळा दूध उकळवत असाल, तर मग तुम्ही मोठी चूक करत आहात.

दूध उकळण्याची कारणे :

वास्तविक दूध बराच काळ उकळवल्याने किंवा बऱ्याच वेळा उकळवून घेतले तर, त्यातील पोषकद्रव्य नष्ट होऊ लागतात, हे बऱ्याच संशोधनात सिद्ध झाले आहे. असे दूध प्यायल्याने शरीराला काहीच फायदा होत नाही. दूध उकळण्याचा योग्य मार्ग म्हणजे ते गरम होत असताना, चमच्याने सतत ढवळत राहाणे. सतत ढवळल्यानंतर दूध उकळले की गॅस बंद करावा.

पुन्हा पुन्हा दूध उकळण्याची चूक करू नका. जितक्या जास्त वेळा ते उकळले जाईल, तितके त्यातील पोषक घटक  नष्ट होतात. म्हणून दूध शक्यतो फक्त एकदाच उकळण्याचा प्रयत्न करा. जर जास्त आवश्यकता असेल तर केवळ साधारण गरम करा, उकळू नका (Do not boil milk for more than one time know the reason).

दूध सेवन करताना ‘या’ गोष्टीही लक्षात ठेवा!

– जर तुम्ही जेवणानंतर नियमित दूध पित असाल, तर अर्धा पोटीच जेवा. अन्यथा पचनक्रिया संबंधित त्रास उदभवू शकतात.

– कांदा आणि वांग्यासोबत कधीही दुधाचे सेवन करु नये. यामधील घटक एकमेकांत मिसळून त्वचेच्या आजारांना कारणीभूत ठरू शकतात.

– कधीही मासे किंवा मांस खाल्ल्यानंतर दूधाचे सेवन करू नये. यामुळे त्वचेवर पांढरे डाग किंवा ल्युकोडर्मा सारखे आजार होऊ शकतात.

– जेवण झाल्यावर लगेच दूध पिऊ नये. खाल्लेले अन्न पचण्यास काही वेळ लागतो आणि पटकन दूध प्यायल्याने पोटात जळजळ होऊ शकते.

(Do not boil milk for more than one time know the reason)

हेही वाचा :

एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.