High Blood Pressure | केवळ मीठच नव्हे, उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी चुकनही खाऊ नयेत ‘या’ गोष्टी!

उच्च रक्तदाब (High Blood Pressure) हा मुख्यतः जीवनशैली संबंधित रोग आहे, जो औषधोपचार, आहार आणि व्यायामाद्वारे बरा करता येत नाही, परंतु तो नियंत्रणात ठेवता येतो.

High Blood Pressure | केवळ मीठच नव्हे, उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी चुकनही खाऊ नयेत ‘या’ गोष्टी!
रक्तदाब
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 6:07 PM

मुंबई : उच्च रक्तदाब (High Blood Pressure) हा मुख्यतः जीवनशैली संबंधित रोग आहे, जो औषधोपचार, आहार आणि व्यायामाद्वारे बरा करता येत नाही, परंतु तो नियंत्रणात ठेवता येतो. जर आपण आपल्या आहारात खारट, गोड पदार्थ आणि संपृक्त चरबीचे जास्त सेवन केले, तर आपला रक्तदाब वाढण्याची शक्यता जास्त आहे. दररोजच्या आहारातून काही गोष्टी काढून तुम्ही रक्तदाब निरोगी ठेवू शकता. अमेरिकन हार्ट असोसिएशन सूचित करते की, उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांनी भरपूर प्रमाणात फळे, भाज्या, धान्य आणि पातळ चरबीयुक्त प्रथिने खावीत (Do not eat or drink these food if you have high blood pressure problem).

उच्चरक्तदाब हृदयविकाराचा धोका वाढवतो!

भारतातील शहरी लोकसंख्येपैकी 34 टक्के लोक उच्च रक्तदाब या समस्येने ग्रस्त आहेत, ज्यास हायपरटेन्शन देखील म्हणतात, तर अमेरिकेच्या 45 टक्के लोकांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या आहे. उच्च रक्तदाब वेळेवर नियंत्रित न केल्यास हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या अनेक हृदयासंबंधित समस्यांचा धोका वाढतो. म्हणून, उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. चला तर, जाणून घेऊया या गोष्टींबद्दल…

जास्त मीठ आणि सोडियम असलेले पदार्थ.

रक्तातील द्रवपदार्थाच्या संतुलनावर परिणाम होतो, म्हणून उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढवण्यासाठी सोडियम जबाबदार असल्याचे मानले जाते. आपण दररोज वापरलेल्या पांढर्‍या मीठात 40 टक्के सोडियम असते. म्हणून, अशा प्रकारचे जेवण ज्यामध्ये मीठ आणि सोडियम जास्त आहेत, ते चुकूनही हाय बीपीच्या रूग्णांनी घेऊ नये. चिप्स, पिझ्झा, सँडविच, ब्रेड आणि रोल्स, कॅन केलेले सूप, प्रक्रिया केलेले आणि फ्रोजन फूड इत्यादी पदार्थ टाळावेत.

चीज खाणे टाळा.

चीज हे दुधाचे उत्पादन आहे, ज्यात प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. परंतु, त्यातही सोडियमचे प्रमाण जास्त असते. चीजच्या केवळ 2 स्लाईसमध्ये 512 मिलीग्रामपर्यंत सोडियम आढळतो. यात संतृप्त चरबी देखील जास्त असते. तर, चीज खाण्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल दोन्ही वाढू शकतात (Do not eat or drink these food if you have high blood pressure problem).

लोणचे खाऊ नये.

दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही अन्नात जास्त प्रमाणात मीठ वापरले जाते. असे केल्याने, हे अन्न बर्‍याच दिवसांसाठी खाण्यायोग्य राहते. लोणच्यामध्ये उपस्थित भाज्या जितक्या जास्त प्रमाणात मसाले आणि द्रवामध्ये राहतात, तितकेच त्यात सोडियमचे प्रमाण वाढत असते.

साखरेशी संबंधित गोष्टी देखील टाळा.

मीठच नाही, तर साखर देखील आपला रक्तदाब वाढवू शकते. संशोधनात असे दिसून आले आहे की, साखरेचा जास्त प्रमाणात वापर केल्याने, विशेषत: गोड पेये घेतल्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि लठ्ठपणा हा उच्च रक्तदाबचा धोकादायक घटक आहे. अमेरिकन हेल्थ असोसिएशन सूचित करते की, महिलांनी दररोज 25 ग्रॅमपेक्षा जास्त साखर आणि पुरुषांनी 36 ग्रॅमपेक्षा जास्त साखर खाऊ नये.

अल्कोहोल देखील टाळा.

जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने देखील रक्तदाब वाढू शकतो. जर, आपण आधीच रक्तदाबचे रुग्ण असाल, तर डॉक्टरांना न विचारता अल्कोहोल पिऊ नका. ज्या लोकांना उच्च रक्तदाब नाही, जर ते मर्यादित प्रमाणात मद्यपान करतात तर, त्यांचा हाय बीपीचा धोका कमी होतो. इतकेच नाही तर हाय बीपीचे रुग्ण जर अल्कोहोल पित असतील, तर त्यांच्यावर रक्तदाबाच्या औषधाचा परिणामही कमी होतो.

(टीप : कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Do not eat or drink these food if you have high blood pressure problem)

हेही वाचा :

Migraine | मायग्रेनमुळेही होऊ शकते मान दुखीची समस्या, ‘या’ लक्षणांना करू नका नजर अंदाज!

FOOD | संत्र्यापेक्षाही जास्त व्हिटामिन सी असणारे ‘हे’ पदार्थ, आहारात आवर्जून करा समावेश!

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.