Food Tips | आयुर्वेद सांगतंय मधासोबत ‘या’ गोष्टी खाऊ नका एकत्र, अन्यथा आरोग्याला होऊ शकते हानी!

आपल्याला आहारामध्ये विविध प्रकारच्या गोष्टी खायला आवडतात. ऐकून थोडेसे विचित्र वाटेल, परंतु अशा बर्‍याच गोष्टी आहेत, ज्या आपण एकत्र खाऊ शकत नाही.

Food Tips | आयुर्वेद सांगतंय मधासोबत ‘या’ गोष्टी खाऊ नका एकत्र, अन्यथा आरोग्याला होऊ शकते हानी!
लिंबू आणि मध
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 2:45 PM

मुंबई : आयुर्वेदानुसार, असे बरेच पदार्थ आहेत जे एकत्र खाणे आपल्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते. आयुर्वेदानुसार, अन्न आणि ते खाण्याचा वेळ योग्य प्रकारे पाळणे, खूप फायदेशीर सिद्ध झाले आहे. आपण खात असलेले अन्न शरीरात जाते आणि आपल्याला बर्‍याच प्रकारे नुकसान पोहोचवते (Do not eat this food with honey it is harmful for body).

आपल्याला आहारामध्ये विविध प्रकारच्या गोष्टी खायला आवडतात. ऐकून थोडेसे विचित्र वाटेल, परंतु अशा बर्‍याच गोष्टी आहेत, ज्या आपण एकत्र खाऊ शकत नाही. बरेचदा आपल्या घरातील लोक किंवा तज्ज्ञ काही पदार्थ एकत्र खाऊ नका, असा सल्ला देतात. याचा अर्थ असा की, अन्नामध्ये अशा बर्‍याच गोष्टी आहेत, ज्या एकाच वेळी किंवा एकत्र खाऊ नयेत. आज आपण अशाच काही खाद्यपदार्थाविषयी चर्चा करणार आहोत, ज्या मधासोबत एकत्र कधीही खाऊ नयेत…

तूप आणि मध

तूप आणि मध कधीही एकत्र खाऊ नये. पाण्यात मध आणि तूप मिसळणे देखील हानिकारक असू शकते. तूप किंवा तेल किंवा बटरमध्ये मध मिसळला तर ते आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरते. एक म्हणजे मध स्वतःच गरम पदार्थ आहे. तो आणखी कोणत्याही गरम गोष्टीसह खाऊ नये, अन्यथा आपल्याला पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

मांस-मासे आणि मध

मांस आणि माशांसह मध खाऊ नये. त्यांच्याबरोबर मध सेवन केल्यास आपल्या शरीरात टॉक्सिक घटक वाढतात. याचा परिणाम डोळ्यांवर आणि कानांवरही होऊ शकतो. यामुळे आपल्या दृष्टीदोष किंवा बहिरेपणा देखील येऊ शकतो (Do not eat this food with honey it is harmful for body).

मध आणि मुळा

मुळा कधीही मधासोबत खाऊ नये. यामुळे आपल्या शरीरातील टॉक्सिन भरपूर प्रमाणात वाढतात. यामुळे आपल्या शरीराचे अवयव खराब होण्याची शक्यता वाढते. म्हणून मुळ्याचे सेवन करताना कधीही मध खाऊ नये.

मध आणि दही

मध कधीही दह्यामध्ये मिसळून खाऊ नये. यामुळे गॅस, अॅलर्जी आणि त्वचेशी संबंधित कोणत्याही समस्या देखील उद्भवू शकतात. तसेच, साखरेसह कधीच मध खाऊ नये. साखरेसह मध खाणे म्हणजे एखादा विषारी घटक खाण्याप्रमाणे असेल.

‘हे’ पदार्थ एकत्र खाऊ नका!

– काळी मिरी कधीही माशांबरोबर खाऊ नये. मासे खाल्ल्यावर काळी मिरी खाल्ल्याने नुकसान होण्याची शक्यता वाढते.

– पालक कधीच तिळ घालून खाऊ नये. असे केल्याने अतिसाराचा धोका वाढतो.

– तूप दहा दिवस कांस्य भांड्यात ठेवले असेल, तर ते तूप खाऊ नये.

– पिवळे मशरूम मोहरीच्या तेलात शिजवून खाऊ नये.

– तूप, तेल, खरबूज, पेरू, काकडी, बेरी आणि शेंगदाणे कधीही थंड पाण्यासोबत खाऊ नयेत.

(टीप : कोणत्याही गोष्टींचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Do not eat this food with honey it is harmful for body)

हेही वाचा :

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.